नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेविषयीचा १२ एप्रिल २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत.चला तर मग मित्रांनो पाहुयात काय आहे हि योजना, त्याच्या अटी , पात्रता, आवश्यक कागदपत्रे, योजनेची कार्यपद्धती या बद्दल सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी साजरी होत आहे. या दिवशी या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याचा दृष्टीने वीज जोडणी विशेष मोहीम दिनांक १४ एप्रिल २०२१ ते दिनांक ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचे उद्दिष्ट –
दिनांक १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणाद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासननाने १२ एप्रिल २०२१ रोजी घेतला आहे.
याशिवाय सदर योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगांमध्ये वीजपुरवठा संबंधित असणाऱ्या तक्रारी किंवा समस्यांचे निवारण करण्याबाबत ही समावेश करण्यात येणार आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना अटी व पात्रता-
- या योजनेतील घरगुती वीज जोडणी जोडणी करणाऱ्या लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी व पात्रता खालील प्रमाणे असणार आहे.
- लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकारी कार्याचा जाती प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.
आवश्यक कागदपत्रे –
महावितरण कंपनीस वीज जोडणी करता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यात वर नमून यानुसार अर्जा करिता खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागतील.
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना योजनेची कार्यपद्धती –
- लाभार्थी अर्जदाराने महावितरणाच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करावा.
- अर्जदाराने शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
- लाभार्थ्याने रुपये ५००/- इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील सदर रक्कम ५ समान मासिक हप्ता मध्येच भरण्याची सुविधा असेल.
- अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर मा. महाराष्ट्र विद्युतनियमक आयोगाचा यासंदर्भातील अस्तित्वात असणाऱ्या तरतुदीचा अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
- महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार वीज जोडणी नाही, अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येणार आहे.
- तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणी करता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा ठिकाणी महावितरणाद्वारे निधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधी मधून प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
- याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगांमधील वीज समस्याचे प्राधान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक महामंडळातील किंवा जिल्हा स्तरावर अधीक्षक अभियंता अध्यक्षतेखाली यांच्या कार्यक्षेत्रात करिता कृषी दलाची स्थापना करण्यात येईल.
- Gopal Credit Card Registration 2024: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- Gopal Credit Card Yojana Rajasthan 2024 सम्पूर्ण जानकारी
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2024
- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 या जिल्ह्यांना मिळणार!! Nuksan Bharpai 2024 GR
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2024 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana