नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही द्राक्ष बागायत शेतकरी आहात, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. एप्रिल छाटणी जवळच येत आहे. छाटणीनंतर कितव्या दिवशी कोणते खत/औषध फवाराचे हा प्रश्न तुम्हला नक्की पडला असेल, तसेच एप्रिल छाटणीचे पूर्वनियोजन कसे करायचे? खरड छाटणी नंतर विरळनी चे महत्व अणि काडी संख्या नियोजन कसे करायचे? आणि योग्य मार्गदर्शनाची गरज नक्कीच असेल, म्ह्णूनच हा लेख तुम्हला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.
चला तर मग मित्रांनो पाहुयात, छाटणीनंतरचे फवारणी वेळापत्रक कसे असणार आहे. मित्रांनो हे वेळापत्रक प्लान्ट नुट्रीशियन शाखेमार्फत टेस्टेड आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला अश्या पद्धतीने नियोजन केल्यास लाभ होणार आहे. छाटणीनंतरच्या २० व्या दिवशीपासून ते ८० व्या दिवसापर्यंत ८ फवारण्या कश्या करायच्या कोणते खत किती प्रमाणात फवारायचे त्याचे वेळापत्रक पाहणार आहोत.
एप्रिल छाटणीचे पूर्वनियोजन कसे करायचे?
जमिनिच्या प्रकारानुसार एप्रिल छाटणीचे पूर्वनियोजन आणि विस्त्रांती कालावधी किती ठेवायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा.
हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती
द्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक –
- १. छाटणीनंतर पहिली फवारणी २० व्या दिवशी म्हणजेच झाडाच्या पानांची अवस्था ३ ते ४ पानांवर असते, तेव्हा करायची आहे . त्यासाठी बासफोलीअर अल्गी (२ मिली), न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७:००(२.५० ग्राम), फेट्रिलॉन कॉम्बी-२ (०.५० ग्राम) ही खते प्रति लिटर पाण्यात दिलेल्या प्रमाणत मिसळून फवारणी करावी.
- २. बासफोलीअर झिंक(०.३७५ ग्राम), बासफोलीअर बोरो(०.५० मिली), बासफोलीअर कव्हर(२.० मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून छाटणीनंतरच्या २५ व्या दिवशी फवारणी करावी
- ३. त्यानंतर तिसरी फवारणी ही छाटणीनंतरच्या ३० व्या दिवशी मॅक्सफ्लो मॅग्नम(१ मिली), बासफोलीअर कोलर(२.५ ग्राम)/ अमिफॉल (२.५ मिली), सिलॉन (२ मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- ४. छाटणीनंतर ३५ व्या दिवशी बासफोलीअर झिंक(०.३७५ ग्राम), बासफोलीअर बोरो(०.५० मिली), बासफोलीअर कव्हर(२.० मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हि फवारणीदुसऱ्या फवारणी प्रमाणेच असेल.
डाळिंब पीक फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक
५. फेट्रिलॉन कॉम्बी-२ (०.५० ग्राम), न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ६:२७:०० (२.५० ग्राम), फिलग्रीन २०० (२ मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून ४० व्या दिवशी फवारणी करावी.
६. त्यानंतर ६ वी फवारणी ही ६० व्या दिवशी मॅक्सफ्लो मॅग्नम(१ मिली), बासफोलीअर कोलर(२.५ ग्राम)/ अमिफॉल (२.५ मिली), सिलॉन (२ मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी तिसऱ्या फवारणीप्रमाणे असेल.
७. छाटणीनंतरच्या ७० व्या दिवशी मॅक्सफ्लो मॅग्नम(१ मिली), बासफोलीअर कोलर(२.५ ग्राम)/ अमिफॉल (२.५ मिली), इनटेक (२ मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
८. शेवटची फवारणी ही छाटणीनंतरच्या ८० व्या दिवशी करावी, आणि ती फिलग्रीन २०० (२ मिली ), बासफोलीअर कोलर(२.५ ग्राम)/अमिफॉल (२.५ मिली) ही खते प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.
कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.
अश्याप्रकारे द्राक्ष बाग छाटणीनंतरच्या ८ फवारण्या कराव्यात, वरील सर्व फवारणी खते ही तुम्ही ऑनलाईन मागवू शकता अथवा जवळच्या कृषी खत विक्रेत्याकडून घेऊ शकता. तुमचे काही आणखी शंका असतील, तर तुम्ही https://www.plantnutrition.in/ यावर जाऊ शकता तसेच काही प्रश्न असतील, तर खालील संपर्क करून तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
मित्रांनो, तुम्हला हि माहिती कशी वाटली याची प्रतिक्रिया नक्की कंमेंटद्वारेआमच्यापर्यंत पोहचवा. तुम्हला आणखी कोणत्या पिकासाठी नियोजन माहिती हवी असेल, तर तेही आमच्यापर्यंत कंमेंटद्वारे पोहचवा. ती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.