नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी जी कर्ज योजना आहे, त्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये ह्या कर्ज योजनेचा फायदा कुणाला करता घेता येणार आहे, त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे कोणती, कोण पात्र असणार आहे, कर्जाची रक्कम किती असणार आहे, त्यावर व्याजदर किती असणार आहेत, परतफेड किती वर्षापर्यंत करायची, विमा आणि इतर जे आवश्यकता आहे त्याचप्रमाणे अर्ज कुठं करायचा, यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी कर्ज योजना (Farmer Farm House Loan Scheme)
एक शेतकरी म्हणून तुम्हाला शेतामध्ये फार्म हाऊसची गरज ही कायम असते .फार्म हाऊस हे केवळ निवासस्थान नाही, तर तुम्हाला ते उत्पादन साठवण्यासाठी ,गुरे राखण्यासाठी किंवा शेतीची उपकरणे व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या शेतजमिनीवर फार्म हौसे बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. तुमचे फार्म हाऊस बांधण्याचे कर्ज घेण्यासाठी चे मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केले जाणार आहे.
कृषी मुदत कर्ज (ATL) म्हणजे काय?
कृषी मुदत कर्ज विशेष करून शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतीवर फार्म हाऊस बांधायचे आहे त्यासाठी दिले जाणारे कर्ज आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतात आरामदायी निवासस्थान आणि आश्रय घेऊ शकणार आहेत. जे इतर महत्त्वाची काम जसे की कृषी उत्पादनाची साठवण, शेतीची अवजारे, गुराचे गोठे आणि धान्य सुकवण्यासाठीआवश्यक असणारी जागा आहे ती या फार्म हाऊस योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे.
या योजनेसाठी कोण पात्र आहे
या कर्जासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला काही निकष पूर्ण करणे गरजेचे आहे जे की खालील प्रमाणे आहेत.
- तुमच्याकडे अडीच एकर बागायती जमीन असणे गरजेचे आहे.
- तुमच्याकडे तुमच्या शेतातून किंवा इतर श्रोतांमधून पुरेसे उत्पन्न येणे गरजेचे आहे.
- बँकेकडे मागील तीन वर्षाचा चांगला ट्रेक रेकॉर्ड असलेले विद्यमान कर्जदार किंवा इतर बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कृषी कर्ज घेतलेले असू नये किंवा त्यांचे नवीन कर्जदार असू नये.
- हे कर्ज मिळवण्यासाठी कर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त म्हणजेच कमाल 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार 75 वर्षाचा होण्यापूर्वी कर्ज परिपक्व झाले पाहिजे
शेतमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्र माहिती
आवश्यक कागदपत्रे
तुमच्या कर्जाच्या अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहेत
- अर्ज फॉर्म
- जमीन अभिलेख ज्यामध्ये सातबारा, आठ अ आणि सहा डी उतारे
- उत्पन्नाचा पुरावा
- कोणतेही बँकेचे शेती कर्ज कर्ज नाही याचे प्रमाणपत्र
- जमिनीसाठी कायदेशीर शोध अहवाल
- कोटेशन योजना अंदाज परवानगी आणि लेआउट
कर्जाची रक्कम किती असणार आहे?
- तुम्हाला बांधकाम खर्चाच्या किमान 25 टक्के रक्कम ही स्वतः भरावी लागणार आहे. कर्जाच्या रकमेवर आधारित व्याजदर खालील प्रमाणे बदलतात.
- 10 लाख रु. पर्यंत: 1 वर्ष MCLR + BSS@0.50% + 2.00%
- 10 लाख वरील रु. : 1 वर्ष MCLR + BSS@0.50% + 3.00%
अर्ज कुठे करावा?
परतफेड कालावधी
- कर्ज सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला तुमची शेतजमी आणि फार्म हाऊस घाण ठेवावे लागेल.
- या व्यतिरिक्त पुरेशी संपत्ती असलेले दोन हमीदार आवश्यक आहेत.
- कर्ज परतफडीचा कालावधी पंधरा वर्षापर्यंत वाढू शकतो. ज्यामध्ये 18 महिन्यापर्यंतच्या स्थगिती कालावधीचा समावेश आहे.
- परतफेडीचे वेळापत्रक तुमच्या उत्पन्नाच्या चक्रानुसार वार्षिक सहामही किंवा त्रे मासिक किंवा मासिक देखील तुम्ही ठेवू शकता.
- तुम्ही कर्जासह तयार केलेल्या मालमत्तेचा अनपेक्षित घटनांपासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण मूल्यासाठी विमा उतरवला गेला पाहिजे.
शेतकरी मित्रांनो फार्म हाऊस बांधल्याने तुमची शेतीचे कामे लक्षणीय रित्या वाढू शकतात आणि तुमच्या जमिनीवर राहण्यासाठी आरामदायी जागा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या योजनेअंतर्गत फार्म हाऊस साठी कर्ज घेऊ शकता आणि या पावसाळ्यामध्ये तुमच्या शेतात एक फार्म हाऊस बंधू शकता.
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला आणि यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा.
- Latest पीक विमा योजना GR अनुदान मंजूर! पहा कोणत्या हंगामासाठी किती कोटी अनुदान मंजूर!!
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना परीक्षा आणि प्रशिक्षण याबद्दल संपूर्ण माहिती
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024