नमस्कार मित्रांनो आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या दोन्ही योजनांसंबंधितचा २८ जून २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत हा शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
MAHADBT Scholarship Hostel Bhatta Yojana 2021
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता देण्यात येतो. सन २०१९-२० मधील जागेवर प्रवेश फेरीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात आलेली नव्हती. सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुज्ञेय असल्याबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना कळविण्यात आलेले आहे. तसेच यानुसार पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता अनुदान आणि डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेकरिता सहाय्यक अनुदान या बाबी अंतर्गत वितरित अनुदानासाठी चा शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१ रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.
३११ कोटी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना निधी वितरित ४ ऑगस्ट २०२१
शासन निर्णय शिष्यवृत्ती योजना व वसतीगृह योजना दिनांक २८ जून २०२१ महाराष्ट्र
राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती या योजनांतर्गत महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयान्वये सन २०१९-२० मधील जागेवरील प्रवेश फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी एकूण १६ कोटी इतके अनुदान वितरित करण्यास २८ जून २०२१ च्या शासन निर्णयात मंजुरी देण्यात आलेली आहे.
अर्ज सुरु डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२१ संपूर्ण माहिती
शिष्यवृत्ती योजना व वसतीगृह योजना शासन परिपत्रक अटी व शर्ती –
- या वितरित केलेल्या निधीत कोणत्याही कारणास्तव अखर्चित किंवा शिल्लक निधी इतर बाबींसाठी परस्पर खर्च करू नये.
- सदरचे अनुदान हे रुपये १६ कोटी अनुदानातून सन २०१९-२० मधील प्रलंबित देयकांचा खर्च भागविण्यात यावा. त्यानंतर अनुदान शिल्लक राहत असेल, तर त्याचा उपयोग हा आर्थिक चालू वर्षातील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती करता अनुदान उपयोगात आणावा. असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे.
- सदरची मंजूर रक्कम ही राज्यातील कृषी विद्यापीठांतील पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यात यावी. ती रक्कम वितरित करण्याची व्यवस्था संचालक शिक्षण महाराष्ट्र, कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचेकडून करण्यात यावी.
- शासन आदेश व विहित कार्यपद्धतीनुसार सक्षम अधिकाऱ्यांची प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेतल्यानंतर विहित मर्यादेत खर्च करण्यात यावे. केवळ अर्थसंकल्पिय तरतूद आहे किंवा अनुदान वितरित केले आहे म्हणून खर्च करू नये. असे या शासन निर्णयांमध्ये नमूद केलेले आहे.