नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२१ संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य कोणती आहे, या योजनेअंतर्गत किती निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना मिळतो, यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी, ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा, महत्वपूर्ण सूचना कोणत्या या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्ही हि या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र असाल, तर नक्कीच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या.
डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेचे उद्दिष्ट –
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देणे जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे पुढे जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील पैशाअभावी त्यांचे शिक्षण हे अपूर्ण राहणार नाही. यासाठी हि योजना अमलात आणलेली आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसंबंधी महत्वपूर्ण सूचना –
AY 20-21 साठी अर्ज स्वीकृती नवीन किंवा नुतनीकरण ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 19-20 च्या पुन्हा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ३० जून २०२१ असणार आहे. म्हणून लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
१६ कोटी शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान वितरीत शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी आवश्यक पात्रता –
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, अशासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान, विनाअनुदान, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व कृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील खाजगी अभिमत विद्यापीठे किंवा स्वयंअर्थसहाय्यित खाजगी विद्यापीठे बघून व्यवसायिक व बीगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेता येणार आहे. सदर योजना ही बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे अशा विद्यार्थ्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अटी –
- राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेस पात्र विद्यार्थी सदर योजनेसाठी ही अर्ज करण्यास पात्र आहेत.
- विद्यार्थ्याने शासकीय खाजगी किंवा नियम शासकीय वस्तीग्रह मध्ये प्रवेश घेतला असल्यास, त्या विद्यार्थ्याने त्या बाबतचा पुरावा हा अर्जासोबत सादर करणे हे आवश्यक असणार आहे.
- खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्याने स्वतःची राहण्याची सोय केली असल्यास, अशा विद्यार्थ्यास नोंदणीकृत अथवा रोटर आईस भाडे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे हे आवश्यक असणार आहे,
- एखाद्या विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या, त्याच गावातील किंवा शहरांमधील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्यास निर्वाहभत्ता हा अनुज्ञेय राहणार नाही.
- या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील केवळ दोन अपत्यं पर्यंतच मर्यादित असणार आहे.
- एखाद्या विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता मिळत असल्यास, असा विद्यार्थी या योजनेखाली लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहे.
- विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रम कालावधी करताच निर्वाहभत्ता देण्यात येईल. तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला किंवा काही कारणामुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही, तर त्या वर्षापुरता निर्वाहभत्ता लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
- या योजनेअंतर्गत रुपये १ लाख रुपये पर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाहभत्ता लाभ देण्याकरिता संख्येची कोणतीही मर्यादा राहणार नाही. मात्र रुपये १ लाख ते ८ लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाला करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या ही ५०० इतकीच निश्चित केली गेलेली आहे. त्यापैकी ३३ टक्के इतक्या जागा विद्यार्थिनी करता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु पुरेशा विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता उपयोगात आणल्या जातात.
- प्रत्येक जिल्ह्यातील कोटा हा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निश्चित करण्यात येतो.
सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply
निर्वाह भत्ता योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- अधिवास प्रमाणपत्र
- पालकांचे अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असल्याचे प्रमाणपत्र वर्षाचे संबंधित तहसील अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- कॅप संबंधित कागदपत्रे
- गॅप असल्यास गॅप संबंधित कागदपत्रे
- दोन मुलांचे कुटुंब घोषणा पत्र
- वसतिगृह दस्तऐवज (खाजगी वसतिगृह किंवा पेइंग गेस्टच्या बाबतीत, मालकाशी करार करणे आवश्यक असेल.
दीनदयाल उपाध्याय स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र
निर्वाह भत्ता योजनेचे लाभाचे स्वरूप –
निर्वाह भत्ता योजनेच्या लाभाचे स्वरूप हे खालील तक्त्यात दाखवले गेलेले आहे ते खालील प्रमाणे असणार आहे ते खालील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे असणार आहे

scholarship योजनेसाठी अर्ज कुठे करायचा (fill scholarship form) –
Important links –
- ऑफिशिअल वेबसाईट – https://mahadbtmahait.gov.in/Home/Index
- ऑनलाइन अर्ज – https://mahadbtmahait.gov.in/Login/Login