अर्ज सुरु २०२२ बांधकाम कामगार योजना माहिती | बांधकाम कामगार योजना फायदे

नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम बांधवांसाठी कामगार योजनेची माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात कोणते बांधकाम कामगार या लाभास पात्र असतील, कोणता लाभ मिळेल, अनुदान किती मिळेल, आवश्यक कागदपत्रे कोणती असतील, बांधकाम कामगार नोंदणी 2022 कशी करायची? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी कामगार बांधवांना घेता येणार आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरु झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी योजनेच्या लाभाचा अवश्य लाभ घ्यावा.

बांधकाम कामगार योजना फॉर्म 2021
Contents hide
2 बांधकाम कामगार योजना फायदे

बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोणाला घेता येणार ?

बांधकाम कामगार योजना 2022 चा लाभ हा नवीन इमारत बांधण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत जे जे मजूर त्यामध्ये काम करतात, अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. ते कामगार खालील प्रमाणे असतील.

 • खुदाई कामगार
 • फर्णिचर, सुतार कामगार
 • गवंडी कामगार
 • फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)
 • पेंटींग कामगार
 • सेंट्रींग कामगार
 • वेल्डिंग
 • फॉब्रीकेटर्स

 

बांधकाम कामगार योजना फायदे

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालील योजनांचा लाभ घेता येईल. 

A. नोंदणीकृत बांधकाम कामगारास बांधकाम करताना लागणारे साहित्य खरेदीस तीन वर्षातून एकदा ५,०००/- रुपये  दिले जातील.

B. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या घरातील पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/- रुपये दिले जातील.

C. बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत

 • नैसर्गिक प्रसुतीसाठी – १५,०००/-
 • शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – २०,०००/-

D. बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रतीवर्षी –

 • १ ली ते ७ वी पर्यंत प्रतीवर्षी २,५००/- रुपये दिले जातील.
 • ८ वी ते १० वी पर्यंत प्रतीवर्षी ५,०००/-रुपये दिले जातील.
 • ११ वी १२ वी पर्यंत प्रतीवर्षी १०,०००/- रुपये दिले जातील.
 • पदविका अभ्यासक्रम साठी – २०,०००/-रुपये दिले जातील.
 • अभियांत्रिकी पदवीसाठी – ६०,०००/-
 • वैद्यकीय पदवीसाठी – १,००,०००
 • MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती केली जाईल.

E. कामगाराने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,०००/- मुदत बंद ठेव. 

 •  बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी – १,००,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -६,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास – २,००,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -१०,०००/- अर्थसाहाय्य
 • बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे -२४,०००/- अर्थसाहाय्य
 • नोंदणीकृत कामगाराचा कामावर जर मूत्यु झाला तर त्याच्या कुटुंबाला – ५,००,०००/- अर्थसाहाय्य
 • घर बांधणी साठी-४,५०,०००/- अर्थसहाय्य (केंद्र शासन- २,००००० /- कल्याणकारी मंडळ- २,५०,०००/-) अर्थसाहाय्य

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू केली जाईल आणि त्याचा लाभ घेता येईल.

PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2022

बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

 • नोंदणी अर्ज
 • पासपोर्ट आकारातील २ फोटो
 • रेशन कार्ड झेरॉक्स
 • आधार किंवा मतदान कार्ड
 • बँक पासबुक झेरॉक्स
 • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
 • नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )
 • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

बांधकाम कामगार नोंदणी 2022 कशी करायची? Online Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

Recent Posts

Leave a Comment

Translate »