कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना 2022 माहिती

आदिवासी विकास योजना महाराष्ट्र: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना 2022 ची माहिती पाहणार आहोत. हि योजना राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरु करण्यात आली.
तसेच भूमिहीन शेतमजूरांसाठी हक्काची जमीन मिळावी म्हणून अमलात आणली गेली. या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतमजुरांना जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या नावे केली जाते. परित्यक्त्या किंवा विधवा स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते. चला तर मग मित्रांनो, पाहुयात काय आहेत या योजनेच्या अटी, पात्रता, लाभ,कागदपत्रे अर्ज कुठे करावा या सर्व गोष्टींची माहिती.

samaj kalyan maharashtra

भूमिहीन योजना 2022 लाभ-

या योजनेअंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून त्याच्या नवे करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ५०% रक्कम बिनव्याजी कर्ज तर ५०% रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.

भूमिहीन योजना शासन निर्णय २०२१ –

नवीन आर्थिक वर्ष्याच्या अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेली सुधारित तरतुदीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये १२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी पन्नास लक्ष फक्त) खर्च करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

भूमिहीन योजनेच्या अटी –

 • लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
 • योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी १८ व जास्तीती जात वय ६० वर्षे निश्चित केले आहे.
 • विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीयांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.
 • जमीन खरेदी करताना तीन लाख रूपये प्रती एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.
 • या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही किंवा विकता येत नाही.
 • महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, अश्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभधारकाने जमीन स्वत: कसणे गरजेचे असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक असणार आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी १० वर्षे मुदतीसाठी असणार आहे.
 • कर्जफेडीची सुरूवात कर्ज मंजुरीनंतर २ वर्षांनंतर सुरू होणार आहे.
 • कुटूंबाने विहीत मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून १० वर्ष्यात कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.

 भूमिहीन योजना महाराष्ट्र 2022 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –

 • अर्ज विहीत नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा.
 • अर्जदाराने अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र
 • रहिवाशी दाखला
 • रेशन कार्ड झेरॉक्स,
 • आधार कार्ड झेरॉक्स,
 • निवडणूक कार्ड प्रत
 • भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार दाखला
 • मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
 • वय ६० वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
 • लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
 • शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.

भूमिहीन योजना महाराष्ट्र 2022 अर्ज कुठे करावा –

वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यास पात्र असल्यास संबंधित जिल्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा.

Leave a Reply