Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या परिस्थितीत किती विमा सरकारकडून मिळणार आहे, तसेच कोणत्या कारणास्तव विमा दिला जाणार आहे. तसेच कधी विम्याचा लाभ घेता येणार नाही. विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ,पात्रता , मिळणारी रक्कम आणि लागू असणाऱ्या अटी , शासन निर्णय कोणत्या कारणास्तव लाभ मिळणार, अर्ज कुठे करायचा , कोणत्या विमा कंपनी द्वारे विमा मिळेल यांची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana चे उद्दिष्टय –
हि योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात अली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकाराव लागत. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.
शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात . जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. त्यामुळे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता , महाराष्ट्र सरकारने हि योजना २००५-०६ सुरु केली तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते ते बदलून ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली.
कोणत्या अपघात बाबीवर किती विमा वितरित केला जाईल ?
- जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.
- जर शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख एवढा विमा देण्यात येईल.
- जर शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेकऱ्याच्या कुटुंबाला २
लाख एवढी रक्कम विम्याच्या स्वरूपात दिली जाईल. - जर अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख विमा दिला जाईल.
शेतकऱ्याला विमा लाभ केव्हा देय असेल –
योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीसाठी प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी हि योजना लागू असेल. या कालावधीत शेतकऱ्याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असेल.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. तसेच यापूर्वी शेतकऱ्याने अथवा त्याच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास किंवा आधीच विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध असणार आंही .या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. असे शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे.
शेतकरी लाभार्थी कधी या योजनेस पात्र असणार नाही ?
सदर योजनेस जर शेतकरी किंवा शेतकऱ्याचे कुटुंब लाभ घेण्यासाठी पात्र असेल. परंतु त्यांनी इतर शासनाच्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल. तर तो शेतकरी किंवा त्याचे कुटुंब गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत कोणत्याही लाभास पात्र नसतील, याची नोंद घ्यावी.
विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.
या शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासून ३६५ दिवसांपर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय किंवाआदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्यासाठी पात्रता कोणती?
महाराष्ट्र तील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल, लाभार्थी चे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा शासन निर्णय –
विमा कंपनीस व विमा सल्लागार कंपनीस १२ महिने कालावधीकरिता होणारी एकूण विमा हप्ता आणि विमा ब्रोकरेज रक्कम रु.९८,०५,७५,८३४ ( अठ्ठयान्नव कोटी पाच लाख पंच्याहत्तर हजार आठशे चौतीस) मंजूर करून वितरित करण्याला मान्यता दिली आहे.
विमा कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष रु.३२.२३ इतका विमा हप्ता दराने(विना ब्राकरेज) व जायका
इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर या विमा सल्लागार कंपनीमार्फत ०.०८ टक्के इतका विमा ब्रोकरेज
दराने राबववण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी शासन निर्णय २७ एप्रिल २०२१
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत विहितधारक खातेदार शेतकरी व यांच्या कुटुंबियांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय ३१ ऑगस्ट २०२० घेण्यात आला होता. सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास, सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थीस लाभास पात्र ठरणार नाही. असा निर्णय २७ एप्रिल २०२१ रोजी च्या बैठकीत घेण्यात आला.
या योजनेची संपूर्ण माहिती-
विमा हप्ता किती भरायचा?
शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही. कारण सरकार शेतकऱ्याच्या वतीने विमा कंपनीस प्रति शेतकरी रु. ३२.२३ रुपये विमा कंपनीस भरते.
संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना संपूर्ण माहिती
अर्ज करण्यास लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
अ. दावा दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
i ) पूर्वसूचनेचे अर्ज कागदपत्रे –
- ७/१२ आणि ८-अ प्रमाणपत्र यांची मूळ प्रत
- मृत्यूचे प्रमाणपत्र
- अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल.
- वयाचा दाखला ( उपलब्ध नसल्यास शपथपत्र)
- घटना स्थळ पंचनामा
लाभ मिळवण्यासाठी सदरचा दावा अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत नोंदवण्यात यावा. म्हणजे शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल.
ii. खातेदार लाभार्थी शेतकऱ्याचे राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले रेशन कार्ड (शिधापत्रिका)
ब. प्रस्तावासोबत सादर करावी लागणारी कागदपत्रे
ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव ७/१२ वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.६ ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.
i) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपा नुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागद पत्रे.
ii) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग) (मुळ प्रत.)
iii) शेतकरी लाभार्थ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं.६- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.
१) उंचावरून पडून झालेला मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
२) विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.
३) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
४) जंतू नाशक अथवा अन्य कारणा मुळे विषबाधा- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
५) अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे- अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतीम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
६) दंगल- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
७) रस्ता/रेल्वे अपघात- इन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना PDF- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2024
८) सर्प दंश/ विंचू दंश- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.
९) पाण्यामध्ये बुडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
१०) जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होवुन मृत्यू- औष धोपचाराची कागदपत्रे.
११) जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवुन मृत्यू-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल
१२) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
१३) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्ये संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.
१४) अन्य कोणतेही अपघात- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
१५) खून- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र.
या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा. आणि या योजनेची चौकशी करून अर्ज करा. आणि इतर काही या योजने संबंधी माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करा. आम्ही तुम्हला हवी ती माहिती पुरवण्याची प्रयत्न करू.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?
या योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. शेतकऱ्याला दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात येईल.
- Old Age Pension List 2024: पात्रता, दस्तावेज़ |वृद्धावस्था पेंशन योजना
- प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme scheme)2021-2025
- Tejaswini Yojana Maharashtra PDF । तेजस्विनी योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती
- जुनी विहीर दुरुस्ती योजना 2024: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
- महाराष्ट्र विधवा पेंशन योजना नोंदणी 2024 Form PDF