नवीन विहीर योजना माहिती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकराअंतर्गत)

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हला या योजनेचा लाभ घेयचा असेल,हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. म्हणून संपूर्ण लेख नक्की वाचा. या लेखात आपण विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट्य, लाभार्थी निवडीच्या अटी, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, अंमलबजावणी कार्यपद्धती, योजनेचा हेतू कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.

हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम होऊन दिसून येत आहे. भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदलाविषयी कृती आराखडा मध्ये नमूद केले गेले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत असून, भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच राज्यात कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे.

Contents hide
2 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नवीन विहीर योजनेचे उद्दिष्ट्य –

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना सन 2021-2025 संपूर्ण माहिती

nanaji deshmukh krushi sanjivani yojana image

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नवीन विहीर योजनेचे उद्दिष्ट्य –

 • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
 • संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादनात वाढ करणे हा योजनेचा हेतू आहे.

नवीन विहीरी अनुदानसाठी लाभार्थी निवडीच्या अटी आणि पात्रता –

 • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जमाती/ जाती , महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येणार आहे.
 • विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र हे ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • ज्या शेतकऱ्याकडे संरक्षित शेती सिंचनाची सोय नाही,अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
 • या आधी या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार नाही.
 • लाभार्थी निवड करताना प्रास्ताविक नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्रोत यातील अंतर ५०० मीटरपेक्षा जास्त असल्याची खात्री करावी.
 • महाराष्ट्र भूजल अधिनियम अधिनियम २००९ नुसार पिण्याच्या पाण्याच्या श्रोताव्यतिरिक्त प्रास्ताविक विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीचे अंतर १५० मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • गावातील अस्तित्वातील व प्रास्ताविक असे एकूण सिंचन विहिरींची घंटा लागवडी योग्य क्षेत्रच्या ८ विहिरी प्रतिचौरस किलोमीटर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींसाठी स्थळ निश्चितीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
 • अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई असणार आहे.
 • नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता या कामांसाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.

नवीन विहिरी साठी योग्य किंवा अयोग्य जागा ठरवण्यासाठी मार्गदर्शक सूचना  –

अ. नवीन विहिरी साठी योग्य जागा

 • दोन नाल्यांच्या जोडा मधील जागा ज्या ठिकाणी मातीचा थर किमान ३० सेंटिमीटर व कच्चा खडकाची किंवा मुरमाची जाडी ही किमान ५ मीटर आहे.
 • नदीच्या किंवा नाल्याच्या लगतचा उथळ गाळाच्या प्रदेशात रेती ग्रेवल इत्यादी मिश्रित असलेल्या जागेत नवीन विहीर बांधावी.
 • भौगोलिक दृष्ट्या सखल भाग ज्या ठिकाणी जेथे किमान ३० सेंटीमीटर पर्यंतचा मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरूम म्हणजेच झिजलेला खडक आढळतो.
 • नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे, तेथे परंतु सदर उंच भागावर चिकन माती नसावी.
 • घनदाट व गर्द पानाच्या झाडांच्या प्रदेशात.
 • वाळू रेती व गारगोटीच्या थर असलेल्या जुन्या नदीच्या प्रवाहाच्या पट्ट्यात नवीन विहिरी साठी योग्य जागा असणार आहे, तेथे नवीन विहीर घेण्यात यावी.
 • नदी किंवा नाल्याच्या तीव्र वळणाच्या ठिकाणी आतील भागात नवीन विहिरी साठी योग्य जागा असणार आहे, तेथे विहीर घेण्यात यावी.
 • अचानक दमट वाटणाऱ्या अथवा ओलाव्याचा असणाऱ्या जागेत नवीन विहिरी साठी योग्य जागा असणार आहे.

आ. नवीन विहिरीसाठी अयोग्य जागा

 • ज्या ठिकाणी जमिनीवर असा पक्का खडक सुरू होतो.
 • डोंगराळ भाग व डोंगराच्या पायथ्यापासून साधारण १५० मीटर अंतराचा भाग हा नवीन विहिरीसाठी अयोग्य असणार आहे.
 • ज्या ठिकाणी मुरूम किंवा कच्चा खडकाची खोली ५ मीटर पेक्षा कमी आहे.
 • ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे मातीच्या थराची जाडी किमान ३० सेंटीमीटर पेक्षा कमी आहे.
 • खारवट जमिनी चा भाग व खारपान पट्टा हा नवीन विहिरी साठी अयोग्य असणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना 2022 माहिती

पोकारांतर्गत नवीन विहीरी साठी अनुदान किती –

 • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीसाठवण निर्मिती म्हणजे नवीन विहिरी ची निर्मिती या घटकांतर्गत या घटकासाठी १०० टक्के अनुदान हे असणार आहे. ते दोन टप्प्यात देण्यात येईल, ते खालील प्रमाणे –
 • पहिला टप्पा – विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोत कामावरील खर्च
 • दुसरा टप्पा – विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम
 • १०० टक्के अनुदान रुपये २.५० लाख अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.

नवीन विहीरी अनुदानसाठी आवश्यक कागदपत्रे –

 • ७/१२ उतारा
 • ८-अ प्रमाणपत्र

नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती

नवीन विहीरी अनुदानसाठी अर्ज कुठे करावा –

या योजनेस पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published.