नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण इलेक्ट्रिक रिक्षा योजना महाराष्ट्र 2024 संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती आहे ते पाहणार आहोत. Electric Rickshaw Subsidy योजना काय आहे, या योजनेअंतर्गत कुणाला लाभ मिळणार आहे, रिक्षासाठी नोंदणी फॉर्म कुठे भरायचा, त्याची संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, अंमलबजावणी प्रक्रिया काय असणार आहे, आवश्यक कागदपत्र कोणती, कोणत्या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे (How to Apply For Electric Vehicle Subsidy). ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या लेखामध्ये पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन इच्छिता किंवा अर्ज करायचा आहे तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Electric Rickshaw Subsidy Yojana Maharashtra 2024
E इलेक्ट्रिक रिक्षा योजना ही महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित म्हणजेच महाप्रीत मार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध लाभार्थ्यांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महापरीत बॅटरी स्वीपिंग यंत्रणे सह प्रगत लिथियम आयन बॅटरी यांनी युक्त स्मार्ट इलेक्ट्रिक ऑटो म्हणजेच E Ricksha देण्याची योजना आहे ती राबवत आहे.
त्यांनी या योजनेत सहभागी होऊन नोंदणी फॉर्म भरून स्वतःची नोंदणी करून घ्यावी आणि या योजनेअंतर्गत रिक्षा चा लाभ घ्यावा. इच्छुक लाभार्थी मर्यादित यांच्याकडून कर्ज सहाय्य घेऊ शकतात किंवा इतर कोणत्याही बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. इलेक्ट्रिक रिक्षाचा नोंदणी फॉर्म हा महामंडळाच्या व महाप्रीत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्याची लिंक आपल्याला खालील इम्पॉर्टंट लिंकच्या टेबलमध्ये दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा त्याची देखील लिंक खाली दिली जाणार आहे. तो अर्ज कशाप्रकारे सादर करायचा ते देखील या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट्य काय ?
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे प्रगत लिथियम आयन बॅटऱ्यांसह फिट इलेक्ट्रिक स्मार्ट ऍटो द्वारे स्वयंरोजगार निर्माण करणे हे असणार आहे. या योजनेत बॅटरी भाडेतत्त्वावर असेल. वाहन फ्रेम-II मंजूर असले पाहिजे किंवा वाहन वितरण करण्यापूर्वी ते मंजूर केले पाहिजे. लाभार्थी वाहन खरेदी करताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत किंवा त्यांच्यासाठी योग्य असेल तो अन्य आर्थिक पर्याय निवडून वाहन खरेदी करू शकतात.
इलेक्ट्रिक रिक्षा योजनेची वैशिष्ट्य, फायदे आणि त्यामध्ये समाविष्ट असलेले वाहन कोणती?
- इलेक्ट्रिक पॅसेंजर ऑटो स्मार्ट इलेक्ट्रिक रिक्षा (L-5 मॉडेल) ज्यामध्ये महापरीतद्वारे विकसित केलेले मोबाईलचे ॲप असणार आहे.
- हे ॲप ग्राहकांना ऑनलाइन बुकिंगची सुविधा देईल.
- त्यामुळे लाभार्थ्यांना व्यवसाय किमान मूल्यमापनावर चालवण्यास मदत होईल.
- त्याचप्रमाणे मागणी आणि पुरवठ्यावर आधारित परिवर्तनीय दलाची सुविधा देखील दिली जाणार आहे.
- या ॲपमध्ये वॉलेट सुविधा पेमेंट गेट वे असणार आहे. ज्यामुळे मालकाला ऑनलाईन पेमेंट करता येईल.
- बॅटरी चार्ज करण्यासाठी किंवा स्वॅपिंगसाठी ऑनलाईन पेमेंट करता येईल.
- कर्जाच्या दैनंदिन परत फेडीची पेमेंट देखील या ठिकाणी या ॲप मध्ये शक्य होणार आहे.
- या ॲप मध्ये नेवीगेशन सुविधा, बॅटरी कंडिशन मॉनिटरिंग, जीपीएस ट्रॅकिंग आणि ऑटो लॉकिंग सर्विस पॉप अप आणि इतर अनेक कार्यक्षमता असणारी वैशिष्ट्य असणार आहेत. ज्यामुळे व्यवसाय सुलभ आणि स्मार्ट होणार आहे.
E रिक्षा योजना पात्रता
महाराष्ट्र शासन आदेशाद्वारे प्रमाणित असेल तसे महात्मा फुले नवीन करणे ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित चे सर्व अनुसूचित जाती आणि नवबौद्ध पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
इलेक्ट्रिक रिक्षा ची माहिती आणि वैशिष्ट्ये
- स्मार्ट इलेक्ट्रिक ऑटो 6000 व 60 व्होल्ट पॉवर क्षमतेचे प्रगत लिथियम बॅटरी सह आयन फॉस्फेट फिट केलेले सर्विस मॉडेल असणार आहे.
- स्मार्ट ॲटोच्या मोटर रेटिंगद्वारे एका पूर्ण बॅटरी चार्जमध्ये सरासरी 70 ते 80 किलोमीटर पेक्षा जास्त कार्यक्षमता देऊ शकते.
- सर्व स्मार्ट इलेक्ट्रिक ऑटो जीपीएस आणि जीपीआरएसने सुसज्ज असणार आहेत.
- बुकिंग, ट्रॅकिंग साठी मोबाईल ॲप दिले जाणार आहे.
- पेमेंट गेट वे मध्ये फोन पे, पेटीएम इत्यादी डिजिटल पेमेंट सह सक्षम केले जाणार आहे.
Electric Rickshaw Subsidy आवश्यक कागदपत्र
- स्कॅन केलेला फोटो
- स्कॅन केलेली सही
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन
- इनकम सर्टिफिकेट
How to Apply For Electric Vehicle Subsidy
1- Step – Electric Rickshaw Registration
- सर्वप्रथम तुम्हाला एनबीआर महाप्रीत https://nbrmahapreit.in/home च्या वेबसाईट वरती जावे लागणार आहे.
- पोर्टलच्या डॅशबोर्ड वरती गेल्यावर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात Sign Up चा ऑप्शन दिसेल त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्वतःला त्या पोर्टल वरती रजिस्टर करायचा आहे.
- रजिस्टर करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नुसार तुमचं नाव, मोबाईल नंबर आधार कार्ड नुसार, तुमची जन्मतारीख, पत्ता, तालुका, गाव, युजर नेम, पासवर्ड, ईमेल आयडी, आधार नंबर, राज्य, जिल्हा, तुमची कास्ट इत्यादी सर्व माहिती भरून तुम्हाला रजिस्टर या बटणावरती क्लिक करायचं आहे.
- जो रजिस्ट्रेशन युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही भरलेला आहे तो तुम्हाला सेफ ठिकाणी सेव करून ठेवायचा आहे.
- अश्याप्रकारे तुमचे रेजिस्ट्रेशन यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
2-step – Electric Rickshaw Application Details
- आता रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही वापरलेल्या युजरनेम आणि पासवर्ड ने त्या पोर्टल वरती लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन करण्यासाठी तुम्हाला डॅशबोर्ड वरती जायचं आहे आणि उजव्या कोपऱ्यात Sign In च्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुमचा dashboard पुढे तुमच्यासमोर ओपन होईल.
- ज्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, इन्कम किंवा डोमेसिअल इन्फॉर्मेशन, पात्रता, शैक्षणिक पात्रता, तुम्ही राहता कुठे त्याचा रेसिडेन्शियल इन्फॉर्मेशन, आणि इतर इन्फॉर्मेशन तुम्हाला फील करायची आहे. जेणेकरून या माहितीचा तुम्हाला फ्युचरमध्ये देखील उपयोग होईल.
- सगळ्या स्टेप्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षासाठी अर्ज करायचा आहे.
- ज्यावेळेस तुम्ही ती पूर्ण माहिती भराल, त्यावेळेस तुम्हाला एक मेल प्राप्त होईल आणि त्यानुसार तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कर्ज योजना, जॉब ,ट्रेनिंग, बिझनेस इत्यादीचे जे फॉर्म आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी भरू शकणार आहात.
- त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक रिक्षासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
3-Step – Electric Rickshaw Yojana Maharashtra Online Apply
- आता इलेक्ट्रिक रिक्षासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला डॅशबोर्ड वरती यायचं आहे.
- युजर डॅशबोर्ड वरती ज्याची लिंक खाली दिली गेलेली आहे आणि तुम्हाला E रिक्षा स्कीम च्या खाली Apply या निळ्या बटनावरती क्लिक करायचं आहे.
- तुमच्यासमोर एक फॉर्म उघडला जाईल.
- तो फॉर्म तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, लोन अकाउंट नंबर, जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे की नाही त्याची माहिती, आधार कार्ड तुम्हाला आधार कार्डचा पीडीएफ त्या ठिकाणी लागणार आहे.
- एम पी बी सी डी सी लोन डॉक्युमेंट, ऑपरेशनल डिस्ट्रिक्ट लोन स्कीम, नेम, ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्याचा नंबर, राशन कार्ड, तुमचा फोटो, ड्रायव्हिंग लायसन चा फोटो, सिग्नेचर चा फोटो, इनकम सर्टिफिकेट इत्यादी संपूर्ण माहिती भरून तुम्हाला भरायचा आहे. खालील सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुमचा फॉर्म इलेक्ट्रिक रिक्षासाठी यशस्वीरित्या भरला जाणार आहे.
- तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या PDF मध्ये अर्जाची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप फोटोसहित खाली दिली गेली आहे. तुम्ही तिंतून देखील मदत घेऊ शकता.
Electric Rickshaw Yojana Important Links
Official Website | View |
Registration Link | Register |
Sign In Link | Login |
Online Apply PDF Link | |
Electric Rickshaw Online Apply Link | Apply |
या योजनेची अंमलबजावणी प्रकिया ?
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लाभार्थ्यांची जिल्हा निहाय यादी अंतिम केली जाते.
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या धोरणानुसार वरील योजनेमध्ये समावेशासाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करेल आणि धोरणानुसार मागासवर्गीय लोकांसाठी मार्जिन मनी योजना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
- त्यामध्ये बँकाचे कर्ज 75% महामंडळाचे कर्ज 20% आणि उर्वरित 5% अर्जदार लाभार्थ्यांकडून घेतले जातील किंवा लाभार्थ्याच्या इच्छेनुसार लाभार्थी इतर कोणताही आर्थिक पर्याय त्या ठिकाणी निवडू शकतो.
संपर्क
अद्याप तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल वरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या प्रश्नांचेआणि शंका कुशंकांचे निरसन करू शकता.
- मोबाईल नंबर – 8591922605
- ई-मेल – info@mpbcdc.in
Reference – https://www.nbrmahapreit.in/
- सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2 ऑनलाइन अर्ज Link, फॉर्म, फायदे
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF, Online रजिस्ट्रेशन, Official Website
- ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link