पोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे १०० टक्के अनुदान योजना माहिती

शेततळे योजना 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत सामुदायिक शेततळे यासाठी अनुदान देण्यात येते, त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहेत या अनुदानाची उद्दिष्ट्य, लाभार्थी पात्रता कोणती असणार आहे, किती आकारमानाच्या शेततळ्याला किती अनुदान शासन देणार आहे, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत, मित्रांनो या योजनेअंतर्गत समुदायिक शेत तळ्यावर १०० टक्के अनुदान लाभर्त्यांना मिळणार आहे. त्यामुळे लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर संपूर्ण लेख वाचा.

राज्यातील कोरडवाहू शेतीची जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत (पोकरा अंतर्गत) सामुदायिक शेततळ्यासाठी अनुदानाची योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याचे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांना पाणी टंचाईच्या काळात पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँक अर्थसहाय्यित नवीन पाणी साठवण म्हणजेच सामुदायिक शेततळे घटक राबविणे प्रस्तावित केले आहे.

सामुदायिक शेततळे लाभ घेण्यासाठीच्या पात्रता व अटी कोणत्या?

 • ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी समूह या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार आहे.
 • सामुदायिक शेततळे हे दोन किंवा अधिक शेतकरी लाभार्थ्याने करणे आवश्यक असणार आहे.
 • लाभार्थी समूहाकडे जेवढे क्षेत्र असेल, तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमतेचे सामुदायिक शेततळ्याचा लाभ त्या संबंधित शेतकरी समूहाला घेता येईल.
 • सामुदायिक शेततळ्यातील पाणी वापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल शेतकरी लाभार्थींमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करणे आवश्यक असणार आहे.
 • लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. त्यांचे जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असणे आवश्यक आहेत.

अर्ज कुठे करावा?

इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

सामुदायिक शेततळे नोंदणी व अर्ज आवश्यक कागदपत्रे –

 • ७/१२ उतारा
 • ८-अ प्रमाणपत्र

मापदंड –

या घटकांतर्गत खालील पैकी एका आकारमानाच्या शेतजमिनीची शेत तळे करण्यासाठी मुभा आहे, आणि त्यासाठी १०० टक्के अनुदान देय असणारे आहे खालील तक्त्यात आकारमान, पाणीउ साठवण क्षमता, जमीन आकारमान क्षेत्र आणि अनुदान रक्कम नमूद केलेली आहे.

pocra schmes samudayik shet tale yojana

सामुदायिक शेततळ्यामध्ये पाण्याचा पसारा कमी ठेवल्यामुळे बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी पूर्ण भरलेल्या शेततळ्यातील पाण्याची उंची ५ मीटर असावी. तसेच शेततळ्यामध्ये जमिनीचे क्षेत्र कमीत कमी व्यापले जावे याची नोंद घ्यावी.

pocra schmes samudayik shet tale yojana, nanaji deshmukh krushi sanjivani yojana, पोकरा अंतर्गत सामुदायिक शेततळे,

अंमलबजावणीची कार्यपद्धती कशी असणार आहे?

 • इच्छुक शेतकरी समूहाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
 • पूर्वसंमती मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत काम पूर्ण करून घ्यावे लागेल अन्यथा पूर्वसंमती आपोआप रद्द होईल, याची नोंद शेतकरी समूहाने घ्यावी.
 • शेतकरी समूह लाभार्त्यांनी कृषी सहाय्य्क/ कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून शेततळे उभारण्याच्या निकषाबद्दल सूचनांचे मार्गदर्शन घेणूनच सदर कमला सुरुवात करायची आहे.
 • लाभार्थी समूहाने स्वतः स्वखर्चाने प्रथम शेततळ्याचे काम मार्गदर्शक सूचना मध्ये दिलेल्या आराखड्याप्रमाणे व तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्पाचे काम पूर्ण करून घ्यावे. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
 • खोदकाम झाल्यावर प्लास्टिक अस्तरीकरण शेततळ्याच्या आतील बाजूने  शेतकारी समूहाने करून घ्यावे.
 • सेवा पुरवठा दाराकडे बिलाच्या छायांकित प्रति शेतकऱ्याने स्वतःची स्वाक्षरी करून साक्षांकित करून अपलोड ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड कराव्यात.
 • मंजूर आकारमानापेक्षा मोठे शेततळे शेतकऱ्याने केल्यास त्याच्या खुदाई आणि अस्तरीकरणाचा खर्च त्या शेतकरीला समूहाला स्वतः करावा लागेल. मंजूर आकारमानाचाच खर्च अनुदानित रकमेत देण्यात येईल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply