नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षांमध्ये मृग व आंबिया बहारकरिता अधिसूचना फळपिकांना लागू करण्याबाबतचा दिनांक १८ जून २०२१ महाराष्ट्र सरकार मंत्रमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत फळपीक विमा योजना (Fruit crop insurance plan) –
कृषी क्षेत्राच्या उत्पादनवाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजार मूल्य हे अधिक असल्याकारणाने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हे यातून मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे आणि तोटाही मोठ्या प्रमाणे असल्यामुळे हि बाब शासनाने विचारात घेऊन शेतकऱ्यांसाठी फळपिकांना हवामान धोक्यापासून विमासंरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य हे अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. ही बाब लक्षात घेतली त्यासाठी राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही राबवण्यात येत आहे. विविध हवामानाने धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये घट सोसावी लागते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला देखील तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळ पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबवणे शासना च्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने शासने खालील शासन निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
कोणत्या पिकांसाठी फळपीक विमा विमा कंपनी कडून मिळेल?For which crops can I get fruit crop insurance from the insurance company?
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, द्राक्ष, सीताफळ या आठ पिकांसाठी २६ जिल्ह्यामध्ये तसेच आंबिया १२ पीकामध्ये काजू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, द्राक्ष प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी आणि पपई या फळ पिकांसाठी राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबवण्याचा प्रस्ताव या फळपीक विमा योजनेअंतर्गत आहे.
शासन निर्णय १८ जून २०२१ फळपिक विमा योजना –
प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ तीन वर्षांसाठी मृग बहरामध्ये असलेली आठ फळपिके आणि आंबिया बहार मध्ये असलेल्या नऊ फळपिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. आहे सदर योजना सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळात निर्धारित केलेल्या हवामान धोक्या नुसार लागू करण्यात येत आहे. सदर योजना कार्यान्वित करणाऱ्या विमा कंपन्या यांना केलेल्या अधिसूचना विमा क्षेत्र घटक काम करता प्रकल्पांतर्गत कार्यान्वित केलेल्या अधिसूचित संदर्भ हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी फळपीक निहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करतील. नुकसान भरपाई चे कोणतेही दायित्व शासनावर राहणार नाही.
असा हा 18 जून 2019 रोजी मंत्रिमंडळ बैठक आत घेतलेला शंभर पानांचा शासन निर्णय आहे.
विमा कंपन्या आणि संबंधित जिल्हे खालील प्रमाणे असतील.
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Reliance General Insurance Company Limited) -अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, नंदुरबार, रत्नागिरी, नागपूर.
- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (HDFC Ergo General Insurance Company Limited) -बीड, औरंगाबाद, अकोला, वर्धा, हिंगोली, ठाणे, सांगली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर.
- भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड (Indian Agricultural Insurance Company Limited) -रायगड, जळगाव, उस्मानाबाद, बुलढाणा, नांदेड, पुणे.
फळपीक विमा योजना माहिती २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष्यासाठी
- खावटी अनुदान योजना महाराष्ट्र (रजिस्ट्रेशन, पात्रता, GR, लाभ,अर्ज) संपूर्ण माहिती
- Lakhpati Didi Yojana 2024 Online Apply: महिलाओं के लिए ₹5 लाख तक का ब्याज मुक्त ऋण पूरी जानकारी
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपूर्ण माहिती | Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
- Abua Awas Yojana List [New]: अबुआ आवास योजना की दूसरी सूची 2024
- Maiya Samman Yojana Jharkhand Online Apply Step By Step