शेततळे योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये शेततळे अनुदान योजना 2024 चे उद्दिष्ट्य, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकष, लाभार्थी लागू असणाऱ्या अटी,अर्ज कुठे करायचा, अनुदान किती असणार, शासन निर्णय, शेततळ्याचे आकारमान, इत्यादी सर्व घटकांची माहित पाहणार आहोत.
Shettale Anudan Yojana Maharashtra
मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट्य –
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्य यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे. तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागेल त्याला शेततळे योजना जाहीर केली. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे.
मागेल त्याला शेततळे लाभार्थी पात्रता-
- ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे.
- यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नाही. असे लाभार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
- लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक असणार आहे.
शेततळे लाभार्थी निवड –
- लाभार्थी शेतकरी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असल्यास किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल अश्या कुटुंबाला म्हणजेच त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादी देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येते.
- याव्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येते.
मागेल त्याला शेततळे अनुदान देय रक्कम-
शेतकऱ्यांच्या उपरोक्त नमूद आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम आयुक्त कृषी यांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्वरीत निश्चित करावी व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित कराव्यात. तथापि अनुदानाची कमाल रक्कम रुपये पन्नास हजार इतकी राहील रुपये पन्नास हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याने स्वतः खर्च करणे आवश्यक असणार आहे.
मागेल त्याला शेततळे शेततळ्याचे आकारमान-
या योजनेअंतर्गत खालील आकारमानापैकी एका प्रकारची शेततळे घेण्यास मुभा राहील. आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित काम खालील प्रमाणे असणार आहे.
जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रित रित्या सामुदायिक शेततळे घेता येईल. या शेततळ्याचे आकारमान अनुज्ञेय आकारमानाच्या प्रमाणात राहील. तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर पाण्याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करावा व तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.
शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी-
- कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या जागीच शेततळे घेणे लाभार्थी शेतकऱ्याला बंधनकारक असणार आहे.
- कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
- लाभार्थीने स्वतःचा राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँक मधील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकची झेरॉक्स सहित सादर करणे गरजेचे असणार आहे.
- कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
- शेततळ्याची निगा राखण्याची तसेच वेळेप्रसांगीं दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची असणार आहे.
- पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही, यासाठी व्यवस्था स्वतः लाभार्त्याने करावी.
- लाभार्थ्याच्या सातबारा या उतारावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील.
- शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असणार आहे.
- शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसानभरपाई अनुज्ञेय राहणार नाही. याची नोंद लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावी.
- मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे लाभार्थीस बंधनकारक राहील.
- इनलेट व आउटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्यास कडे शेततळ्यांमध्ये पाणी उचलून टाकण्याची आवश्यकता व त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच अशा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.
मागेल त्याला शेततळे आवश्यक कागदपत्रे-
- जमिनीचा ७/१२ उतारा
- ८-अ प्रमाणपत्र
- दारिद्र रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला
अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संपर्काचे ठिकाण महा-ई-सेवा केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी यांना भेट द्यावी. इच्छुक शेतकऱ्यांचे विहित नुमन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे. सदर योजनेसाठी करावयाचे अर्ज https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.ऑनलाईन अर्जांची पावती इच्छुक लाभार्थ्यांनी स्वत:कडे ठेवावी.
योजनेशी निगडित महत्वाची संकेतस्थळे –
- मागेल त्याला शेततळे योजना अधिकृत संकेतस्थळ – https://aaplesarkar.maharashtra.gov.in
- अर्ज करण्यासाठी लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा. – egs.mahaonline.gov.in/Login/Login
- खावटी अनुदान योजना महाराष्ट्र (रजिस्ट्रेशन, पात्रता, GR, लाभ,अर्ज) संपूर्ण माहिती
- Lakhpati Didi Yojana 2024 Online Apply: महिलाओं के लिए ₹5 लाख तक का ब्याज मुक्त ऋण पूरी जानकारी
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपूर्ण माहिती | Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
- Abua Awas Yojana List [New]: अबुआ आवास योजना की दूसरी सूची 2024
- Maiya Samman Yojana Jharkhand Online Apply Step By Step