नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मृदा आरोग्य कार्ड योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य कोणते आहे, या योजनेची कार्यपद्धती काय आहे, या योजनेचे शेतकऱ्याला कोणते लाभ असणार आहेत, या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा तसेच अधिक माहिती साठी किंवा शंका कुशंका दूर करण्यासाठी कुठे संपर्क करावा या सर्व घटकांची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो जर तुम्हला ही तुमच्या शेतातील माती परीक्षण करून घ्यायचे असेल. तर नक्की या योजनेसाठी अर्ज करूनतुमच्या शेतातील माती परीक्षण करून घ्या.
मृदा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारने फेब्रुवारी २०१५ पासून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. दिनांक १९ फेब्रुवारी २०१५ सुरतगड राजस्थान येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत शासनामार्फत शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड सर्वांना देण्याची योजना राबविण्यात आली. यामध्ये पिकानुसार शिफारस आवश्यक पोषक तत्वे व त्या शेती नुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल. सर्व मातीच्या नमुन्याची चाचणी देखील देशभरातील विविध मृदा चाचणी प्रयोगशाळेत केल्या जातात. त्या चाचण्यांनंतर तज्ञांमार्फत त्या मातीची ताकद व दुबळेपणा पोषक सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता तपासली जाते व अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करतात. या तपासणीचे निकाल व शिफारसी या काळामध्ये नोंदविले जातील सुमारे १४ करोड शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड वितरित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

मृदा आरोग्य कार्ड योजनेची उद्दिष्टे –
- या योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना चाचणी केलेल्या माहितीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल.
- मृदा चाचणी करून प्रयोग शाळांच्या कार्याला बळकटी देणे.
- जमिनीची सुपीकता मोजण्याचे समान सामान मानक तयार करणे.
- मृदा परीक्षण करून पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन करणे.
- जमिनीला खते देताना पोषकद्रव्ये कळावेत यासाठी शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी मृदा कार्ड सॉरी आरोग्य कार्ड बनवून देणे.
या योजनेकरता शासनाने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आणि आरोग्य कार्ड जारी करण्यासाठी रुपये शंभर करोड ची तरतूद केलेली आहे
मृदा आरोग्य कार्डाची माहिती-
- माती आरोग्य
- शेतीच्या उत्पादक क्षमता
- पौष्टिक उपस्थिती आणि पौष्टिक कमतरता
- पाण्याचा अंश
- इतर पोषक उपस्थित
- शेतांची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शक सूचना.
मृदा आरोग्य कार्ड योजनेत अर्ज कुठे करावा?
सदर योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी अर्जदारास मृदा आरोग्य कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाइटला म्हणजेच https://soilhealth.dac.gov.in/ द्यावी लागेल. आणि ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
मृदा आरोग्य पत्रिका योजना शासन निर्णय –
मित्रांनो मृदा आरोग्य पत्रिका योजना सन २०२०-२१ मध्ये राबवण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय काय आहे तो पाहुयात .
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका योजना सन २०२० मध्ये होण्याकरता केंद्र हिस्सा ६० टक्के म्हणजेच रुपये ४ कोटी ३० लाख ५७ हजार व त्यास अनुसरून राज्य हिस्सा ४०टक्के म्हणजेच २ कोटी ८९ लाख चारशे असा एकूण ७ कोटी २२ लाख ६१ हजार एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
Soil Health And Soil Health Card –
- पशु किसान क्रेडिट कार्ड अप्लाई 2023
- PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2023
- Online 2023-24 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती
- (PMJDY)प्रधानमंत्री जन धन योजना 2023 बँक खाते मराठी माहिती :फायदे, Form
- (पोखरा अंतर्गत) ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज 2023