शबरी घरकुल योजना 2024: नमस्कार मित्रांनो, आज आपण शबरी आदिवासी घरकुल योजना 2024 महाराष्ट्र संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य, लाभ, अनुदान, पात्रता, कागदपत्रे, संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत. तुम्हीही अनुसूचित जमाती मधील आदिवासी प्रवर्गात मोडत असाल, आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेयचा असेल, तर हा लेख नक्की संपूर्ण वाचा.
आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र 2024
शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र या आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी भव्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी घराचे २६९ चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्ट्याने अमलात आणली गेली आहे. या आदिवासी लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यात स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी आदिवासी समुदाय पात्र आहे आणि त्यांना लाभ दिला जातो. आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी देण्यात येते.
कोऱ्या कागदावर असा भरा फॉर्म !! शबरी घरकुल योजना 2024
शबरी आदिवासी घरकुल योजना उद्दिष्ट्य काय?
आदिवासी घरकुल योजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची राहण्यासाठी पक्की घरे नाहीत, त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देणे. आदिवासी लोक हे मातीच्या घरात, झोपडित आणि तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळते. सदर घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. तसेच मनरेगा माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार देखील उपलब्ध होतोत.
शबरी आदिवासी घरकुल योजना Latest GR –
- शबरी आदिवासी घरकुल योजना २०२२-२३ उद्दिष्ट्य निश्चित करण्याबाबत शासन निर्णय GR – GR PDF
- शबरी आवास योजना शासन निर्णय GR दिनांक १६ जुलै २०२१
- शबरी घरकुल योजना 2024 अर्ज PDF + GR
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट किती असेल, हे ठरवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याचे शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत किती उद्दिष्ट आहे, आणि आपल्या जिल्ह्याचे घरकुल योजनेचे सन २०२१-२२ उद्दिष्ट किती आहे ते तपासा.
आदिवासी आवास योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे?
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी एक लाख, नगर परिषदांसाठी दीड लाख आणि महानगरपालिकासाठी दोन लाख असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसावे.
- पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची घर बांधण्यासाठी जमिन किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
- निराधा,र दुर्गम भागातील आदिवासी, विधवा या लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल.
शबरी आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जागेचा सातबारा उतारा आणि ७-अ प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा
- जागा उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र
- ग्रामसभेचा ठराव
- तहसिलदाराकडील उत्पन्न प्रमाणपत्र
१०३ कोटी प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र वितरित अर्ज कागदपत्रे पात्रता माहिती
आवास योजनेअंतर्गत किती रक्कम मर्यादेपर्यंत लाभ देय आहे?
- ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये १ लाख ३२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.
- नक्षलग्रस्त तसेच डोंगरा क्षेत्रासाठी १ लाख ४२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.
- महानगरपालिका क्षेत्राकरिता घराची किंमत मर्यादा रुपये २ लाख एवढी असेल.
शबरी आवास योजना अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पत्त्यावर संपर्क करावा आणि या योजने संबंधित अधिक माहिती मिळवावी.
- CM Kisan Kalyan Yojana MP: ₹2000 की पहली किस्त किसानों के खातों में
- महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र: ऑनलाइन अर्ज(rojgar.mahaswayam.gov.in)
- मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना Online Registration | सुमंगला योजना लिस्ट 2024
- डिजिटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड, फेरफार, 7 12, 8- अ PDF ऑनलाइन डाउनलोड करा घरबसल्या
- जननी शिशु सुरक्षा योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र Portal, Benefits, Apply
मला खुप गरज हाय माझा घर हा विटाचा आहे आनी खूप वर्ष जाले त्य मुले माझा घर खचत आलेला आहे त्य मुले मला खुप गरज आहे घरकुल ची अणी घर ची परिस्थिति पन वाईट आहे त्य मुले मलाखुप आहे