संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना २०२१ संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो. आज आपण संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काय आहे हि संजय गांधी निराधार योजना, योजनेची उद्दिष्ट कोणती, लाभ कोण शकणार, लाभ किती असणार, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे करायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हला आज या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हीही निराधार आहेत किंवा तुमच्या जवळचा कोण निराधार आहे. तर नक्कीच तुम्ही त्यांना या योजनेबद्दल सांगून त्यांचे जीवन सुखकर बनऊ शकता. त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

काय आहे संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना २०२१ ?

राज्यातील निराधार, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, वृद्ध व्यक्ती. अंध, अत्याचारित महिला, अपंग, शारीरिक, विधवा, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ६५ वर्षाखालील वयाच्या निराधार लोकांना मदत दिली जाईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छित इच्छुक लाभार्थी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन योजनेचा फॉर्म मिळवू शकता. या योजनेंतर्गत गरीब महिला, अनाथ मुले व कोणत्याही आजाराने ग्रासलेल्या लोकांना मदत दिली जाईल.ही एक विशेष पेन्शन योजना आहे जी केवळ निराधारांना मदत करेल.

maharashtra samaj kalyan vibhag official portal
Contents hide

संजय गांधी निराधार योजनेची उद्दीष्टे कोणती?

या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे गरीब लोकांना मदत करणे. निराधार लोकांना या योजनेतून मासिक पेन्शन मिळणार आहे. निराधार लोकांना आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. जेणेकरून ते त्यांचे आयुष्य आरामात जगू शकतील. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पेन्शन च्या मदतीने राज्यातील निराधार लोकांना खूप मोठी मदत मिळणार आहे. राज्यातील निराधारांना आर्थिक पाठबळ संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या रूपात मिळणार आहे. या योजनेंतर्गत सरकार निराधार लोकांना मासिक पेन्शन देईल. मासिक पेन्शनमुळे हे लोक त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवू शकतात.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२१ उद्दिष्ट्ये,पात्रता,लाभ, कागदपत्रे, फार्म PDF

संजय गांधी निराधार योजना २०२१ चे लाभार्थी कोण ?

 • ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला
 • मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती
 • वृद्ध व्यक्ती
 • अंध
 • विधवा
 • वेश्या व्यवसायातून मुक्त महिला
 • घटस्फोटीत महिला
 • निराधार पुरुष व महिला
 • अनाथ मुले
 • अपंगातील सर्व प्रवर्ग
 • कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, एड्स यासारख्या आजाराने पीडित महिला व पुरुष
 • निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह )
 • घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या
 • अत्याचारित महिला
 • तृतीयपंथी
 • देवदासी
 • ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री
 • तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी
 • सिकलसेलग्रस्त

संजय गांधी पेन्शन योजनेच्या लाभाचे स्वरूप कोणते?

 • लाभार्त्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतात
 • जर लाभार्त्याच्या कुटुंबात एका पेक्षा जास्त पात्र अर्जदार असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह देण्यात येतात.

संजय गांधी निराधार पेन्शन योजना पात्रतेचे अटी आणि शर्ती कोणत्या?

 • कमीत कमी १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.
 • अर्जदाराचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन संजय गांधी निराधार योजनेची कागदपत्रे कोणती?

 • महाराष्ट्र निवासी प्रमाणपत्र
 • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
 • वय प्रमाणपत्र
 • बीपीएल प्रमाणपत्र
 • कौटुंबिक उत्पन्न सिद्ध करण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
 • मोठा आजार झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र

संजय गांधी निराधार पेन्शन योजना २०२१ मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया काय ?

इच्छुक ज्या लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळवायचे आहेत त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीनुसार या योजनेत अर्ज करू शकताः –

 • सर्व प्रथम दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संजय गांधी निराधार योजना फॉर्मचा अर्ज डाउनलोड करा.
 • फॉर्म डाउनलोड
 • संजय गांधी निराधार योजना २०२१ फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
 • आता हा फॉर्म घेऊन तहसीलदारांकडे जावा.
 • अर्जाची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
 • राज्य सरकार लाभार्थ्यांची यादी जाहीर करेल आणि निराधार व ज्यांना बहुतेक पेन्शनची आवश्यकता आहे अशा लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात येईल.
 • सर्व लाभार्थ्यांना पेन्शनची रक्कम तहसीलदारांच्या माध्यमातून वितरीत केली जाईल
 • संजय गांधी निराधार अनुदान पेन्शन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जबाबदार आहे. अधिक माहितीसाठी अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार यांच्याशी संपर्क करावा.

 

Recent Posts

Leave a Comment

Translate »