१८० कोटी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२१ निधी वितरित निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण १८ मार्च २०२१ रोजीचा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफ करते. या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना २०२१ चा फायदा राज्यातील पारंपारिक शेती करणार्‍या शेतकऱ्यांना होणार आहे. या महाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीसह राज्यातील अल्प भूधारक आणि इतर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो पाहुयात काय आहे, हा कर्जमुक्ती योजना २०२१ चा नवीन शासन निर्णय.

shetkari karjmaukti yojana 2021

दिनांक १ एप्रिल २०१५ ते दिनांक ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना२०१९ ही कर्जमुक्ती योजना शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली.कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना राज्य सरकारला द्यावयाचा आहे. सदर प्रयोजनासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णयान्वये १०५० कोटी रुपये संदर्भ क्रमांक ४ च्या शासन निर्णयान्वये २३३४ कोटी रुपये संदर्भ क्रमांक पाच च्या शासन निर्णयान्वये १३०६ कोटी रुपये संदर्भ क्रमांक सहा च्या शासन निर्णयान्वये ३७८.३० कोटी रुपये संदर्भ क्रमांक सात च्या शासन निर्णयान्वये ५८५.३२ कोटी रुपये संदर्भ क्रमांक आठ च्या शासन निर्णयान्वये २६८.६८ कोटी संदर्भ क्रमांक नऊ च्या शासन निर्णयान्वये ७४१.५० कोटी रुपये व संदर्भ क्रमांक दहा च्या शासन निर्णयान्वये रुपये ९०० कोटी या प्रमाणे निधी वितरित करण्यात आलेला आहे.सदर योजनेसाठी आणखी निधी वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने खालील प्रमाणेनिर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय-

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०१९ या योजनेअंतर्गत २०२०-२१ साठी वितरीत निधी वगळता १८० कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तरी हा शासन निर्णय सविस्तर पणे पाहण्यासाठी खालील GR पहा या बटनावर क्लिक करून संपूर्ण शासन निर्णय तुम्ही पाहू शकता.

Recent Posts

Leave a Comment

Translate »