नमस्कार मित्रांनो आपण रमाई आवास योजना या घरकुल योजनेसंबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये हि योजना काय आहे, योजनेचा उद्दिष्ट काय, लाभ कोण घेऊ शकतो, आवश्यक कागदपत्रे कोणती, Ramai Awas Yojana Official website, रमाई घरकुल योजना महाराष्ट्र list, फॉर्म pdf, शासन निर्णय, कागदपत्रे, रमाई घरकुल योजना किती पैसे मिळतात, नियम व अटी, घरकुल मंजूर यादी, Ramai Awas Yojana Online Registration, अर्ज कुठे करायचा या संबंधित सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
रमाई आवास योजना 2024
ही योजना समाज कल्याण कार्यालयाकडून राबवली जाते. या योजनेसाठी राज्य सरकार निधी देतो. समाज कल्याणच्या या योजनेमुळे जे गरीब अनुसूचित जाती आणि नवबौद्धना पक्की घरं या योजनेअंतर्गत दिली जातात आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला जातो.
योजनेचा उद्दिष्ट काय?
या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध लोकांना पक्क घर उभा करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या योजनेअंतर्गत हे लोक स्वतःच्या जागेवर 269 स्क्वेअर फिट घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं.
रमाई घरकुल योजना किती पैसे मिळतात?
या योजने अंतर्गत नवीन पक्के घर बांधण्यासाठी ४ टप्प्यांमध्ये अनुदान दिले जाते. हे अनुदान साधारणतः १,५३,४२०/- ( एक लाख त्रेप्पन हजार चारशे वीस) इतके दिले जाते . हे अनुदान बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्याने लाभार्त्याच्या बँक खात्यावर जमा केले जाते.
योजनेसाठी लाभार्थी पात्रता
- लाभार्थी हा एससी आणि नवबौद्ध असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा वर्ष राहिलेला असणे गरजेचे आहे.
- जर अर्जदार ग्रामीण क्षेत्रांमध्ये असेल तर त्याचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत, जर नगरपालिका क्षेत्रामध्ये असेल तर दीड लाख रुपये पर्यंत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल तर दोन लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न गरजेचं आहे. तरच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
- एका कुटुंबांमधील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
- घर बांधण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे.
- याआधी अर्जदारांनी कोणत्याही इतर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असू नये.
- जर अर्जदार बीपीएल असतील तर त्यांना लाभ प्राधान्याने दिला जाईल.
घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही काय करावे?
ज्या बेकरांकडे स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नाही त्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ देणे अशक्य होते. त्यासाठी केंद्र शासनाची योजना आहे पंडित दीनदलाय उपाध्याय जागा खरेदी या योजने अंतर्गत सर्वप्रथम लाभ घेणे गरजेचे आहे. ज्यामध्ये पन्नास हजार किंवा प्रत्यक्ष जमिनीची किंमत यापैकी जी रक्कम कमी आहे ती, या योजनेतून मंजूर केली जाते. यावर अर्जदार लाभार्थी त्याचे घर बांधू शकतो. अशा प्रकारे एका गरीब कुटुंबाला स्वतःचे घर उपलब्ध होण्यासाठी मदत होते.
रमाई घरकुल योजना कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे
- चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार
- पक्के घर नसल्याचे ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- सामाजिक, आर्थिक इ जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या निकशाबाहेरील आहे याचे ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- पॅनकार्ड
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- BPL प्रमाणपत्र
- असेसमेंट पावती.
- घरपट्टी पावती
- घर बांधायचे जागेत हिस्सेदारी असल्यास त्यांचे संमती पत्र
- जन्माचा दाखला
- लाभ न घेतलेले प्रमाणपत्र
- पूर ग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
- लाभार्थी पीडित असल्यास त्याचा दाखला
- 100/- रुपये च्या स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रतिज्ञापत्र
- लाभार्थ्यांचे बँक अकाउंट
- पासपोर्ट आकाराचे फोटो
रमाई घरकुल योजना लाभ
अर्जदाराच्या क्षेत्रनिहाय त्याला लाभ दिले जातील जे खालील तक्त्यामध्ये दर्शवले गेलेले आहे.
ग्रामीण क्षेत्र | रु. 100000 (लाभार्थी हिस्सा शून्य) |
नगरपालिका क्षेत्र | रु. 150000 (लाभार्थींचा वाटा 7.5%) |
महानगरपालिका | रु.200000 (लाभार्थींचा वाटा 10%) |
अर्ज कुठे करायचा | Ramai awas Yojana Online Registration
- जर तुम्हाला रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण/प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला संपर्क साधावा लागेल.
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि इतर शंकांसाठी तुम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय/प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, संबंधित जिल्हा परिषद/महानगरपालिका आयुक्त यांना संपर्क करू शकता.
Ramai awas yojana 2024 Important Links
Ramai awas yojana official website | View |
रमाई आवास घरकुल योजना फॉर्म PDF | |
रमाई आवास योजना शासन निर्णय GR | GR |
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र List | View |
रमाई आवास योजना नियम अटी व अंमलबजावणी प्रक्रिया
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर लाभार्थ्याच्या राहते कच्चे घराची जिओ टॅग, जॉब कार्ड मॅपिंग, लाभार्थ्याची खाते PFMS प्रणालीवर संलग्न केले जाते.
- पंचायत समिती लाभार्थ्यांची नावे जिल्हास्तरीय मान्यतेसाठी प्रास्ताविक करते.
- जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त लाभार्थ्यांना तालुकास्तरावरून थेट लाभ हस्तांतरणाचा पहिला हप्ता दिला जातो.
- त्यानंतर लाभार्थ्यांनी स्वतः लक्ष देऊन बांधकाम करून घेणे गरजेचे असतं. त्याच्या अपेक्षेनुसार त्याला घर बांधता येतं. यासाठी कुठल्याही कंत्राट दाराचा या योजनेमध्ये सहभाग होत नाही.
- घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर जिओ टॅग आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बांधकामावर जिल्ह्यात आणि तालुकास्तरावर आर्थिक आणि भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो.
- बांधकामाच्या प्रगतीनुसार दुसरा, तिसरा आणि अंतिम हप्ता लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
- मनरेगाच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार आणि त्यासाठी त्याला अठरा हजार रुपये इतकी रक्कम देय असते. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्रपणे 12 हजार रुपये रक्कम देखील दिली जाते.
- अशाप्रकारे एका बेघराला त्याच्या स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही योजना काम करते.
Reference-
- https://www.zposmanabad.gov.in/
- https://sjsa.maharashtra.gov.in/