Dr. Ambedkar Safai Kamgar Awas Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना 2022 संबंधित माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
Safai Kamgar Awas Yojana Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन, ज्या सफाई कामगारांची सेवा 25 वर्ष किंवा त्याहून अधिक झालेली आहे. अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सफाई कामगारांच्या सेवेत असताना मृत्यू झाला असल्यास, अशा कामगारांना कामगारांच्या निधनानंतर त्यांच्या पात्र वारसाला मालकी तत्त्वावर मोफत सदनिका देण्यास संबंधितच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
सफाई कामगार आपले आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवून समाजाची सेवा करत असतात. हे त्यांचे विशिष्ट स्वरूपाचे काम आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा विचारात घेता, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील नगरपालिकेतील किंवा महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्या वेळी मालकी हक्काने मोफत सदनिका देणे. तसेच सेवेत असताना त्यांच्याकरिता सेवा निवासस्थानी बांधण्यास देण्यास बाबतचा देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील शासन निर्णय घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना
आंबेडकर आवास योजना शासन निर्णय
राज्यातील महानगरपालिकेतील किंवा नगरपालिकेतील सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कामगारांची सेवा पंचवीस वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे. अशा सफाई कामगारांना सेवा निवृत्तीच्या वेळी किंवा सफाई कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाला. तर अशा सफाई कामगारांच्या निधनानंतर त्यांच्या पात्र वारसास महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून मालकी हक्काने मोफत सदनिका देण्याबाबत शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सफाई कामगार आवास योजना लाभ
राज्यातील महानगरपालिका किंवा नगरपालिका सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्यांची सेवा 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे. अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाला असल्यास, निधनानंतर त्यांच्या पात्र वारसास महानगरपालिकेकडून किंवा नगरपालिकेकडून मालकी हक्काने 269 चौरस फूट चटाई क्षेत्राच्या सदनिका मोफत वाटप करण्यात येतात. सदर सदनिकांचे बांधकाम शासनाकडून स्वतंत्रपणे विहित करण्यात येते. सफाई कामगारांना या प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मोफत सदनिका अहस्तांतरणीय स्वरूपाच्या असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सदनिका वाटप करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना (SRA) अंतर्गत शासनास उपलब्ध होणारे पुनर्वसन घटका व्यतिरिक्त अधिकचे रहिवाशी गाळे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम तसेच बेसिक सर्विसेस फोर अर्बन पुअर या योजने अंतर्गत बांधण्यात येणारे रहिवासी गाळे आणि म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटाची गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिकांचे 15 टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. यासंदर्भात कार्यवाहीसाठी नोडल विभाग म्हणून गृहनिर्माण विभागाची जबाबदारी राहते.
सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) किंवा अल्प उत्पन्न गट (LIG) मध्ये मोडत असल्यास बी. एस. यु.पी. किंवा आय.एच.एस.डी. पी या दोन्ही योजनांची अंमलबजावणी करताना बांधलेल्या सजनीकांत पैकी 15 टक्के सदनिकांचे वाटप प्रस्तुत योजनेअंतर्गत सेवानिवृत्त सफाई कामगारांना करण्यात येते. याची दक्षता अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या महानगरपालिका किंवा नगरपालिका तसेच सुकाणू अभिसरण असलेल्या म्हाडाअंतर्गत घेतली जाते.
या योजनेच्या संबंधित शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना GR PDF पाहू शकता. आणि आधी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना GR – https://pmc.gov.in/sites/default/files/circular/gr.pdf
- सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2 ऑनलाइन अर्ज Link, फॉर्म, फायदे
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF, Online रजिस्ट्रेशन, Official Website
- ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link