भूमिहीनांसाठी 12 पशुधन उद्योजकता योजना 2026: भूमिहीन नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता स्वतःची शेती किंवा जमीन नसली तरी पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेळी-मेंढी पालन, गाय-म्हैस पालन, कुक्कुटपालन, वराह पालन आणि पशुसंवर्धनाशी संबंधित व्यवसायांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेतील अनेक घटकांमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे 26 नोव्हेंबर 2026 पासून MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि MahaID तयार ठेवणे आवश्यक आहे.
चला तर मग, भूमिहीन नागरिकांसाठी कोणत्या 12 योजना आहेत, किती अनुदान मिळणार आणि पात्रता काय आहे, याची सविस्तर माहिती पाहूया.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना पशुपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनेक घटकांसाठी 50 टक्के, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानाची तरतूद आहे. काही विशिष्ट घटकांसाठी 100 टक्के अनुदानही प्रस्तावित आहे.
भूमिहीनांसाठी 12 पशुसंवर्धन योजना
1. 1000 अंडी उबवणी क्षमतेचे यंत्र अनुदान योजना
कुक्कुटपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या भूमिहीन नागरिकांसाठी ही योजना आहे.
या योजनेअंतर्गत दर आठवड्याला 1000 अंडी उबवण्याची क्षमता असलेले Incubator आणि Hatcher यंत्र तसेच 3 KW सोलर युनिट उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.
- प्रकल्पाची एकूण किंमत – ₹3,40,000
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50% अनुदान
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75% अनुदान
पात्रता: भूमिहीन लाभार्थी अर्ज करू शकतात. मात्र कुक्कुटपालन व्यवसायाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
2. वराह पालन गट वाटप योजना
डुक्कर पालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या भूमिहीन नागरिकांसाठी ही योजना आहे.
या योजनेत 4 मादी आणि 1 नर असा वराह गट तसेच विमा देण्याची तरतूद आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50% अनुदान
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75% अनुदान
पात्रता: भूमिहीन लाभार्थी, अल्पभूधारक, वनहक्कधारक आणि महिला बचत गटातील लाभार्थी पात्र आहेत.
पशुपालन व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतील प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
संपूर्ण सविस्तर माहिती इथे वाचा 👉Varah Palan Yojana 2026 Apply Online: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 – वराह पालन गट वाटप योजना संपूर्ण माहिती
गाय किंवा म्हैस पालन करून दुग्ध व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या भूमिहीन नागरिकांसाठी ही योजना आहे.
या योजनेमध्ये दोन पर्याय आहेत.
- 1 दुधाळ गाय किंवा म्हैस गट.
- 2 दुधाळ गाय किंवा म्हैस गट.
भूमिहीनांसाठी महत्त्वाची अट:
- 1 गाय किंवा म्हैस गटासाठी भूमिहीन लाभार्थी पात्र आहेत.
- 2 गाय किंवा म्हैस गटासाठी किमान 1 एकर जमीन आवश्यक आहे.
- वनहक्कधारकांना जमिनीची अट लागू नाही.
पशुपालनाचे प्रशिक्षण किंवा 2 वर्षांचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव आवश्यक आहे.
अनुदान:
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50%
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75%
संपूर्ण सविस्तर माहिती इथे वाचा 👉Gaay Mhais Yojana: दुधाळ जनावर गट गाय / म्हैस वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
4. शेळी-मेंढी गट वाटप योजना
शेळीपालन किंवा मेंढीपालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची योजना आहे.
यामध्ये दोन प्रकारचे गट आहेत.
- 5+1 शेळी किंवा मेंढी गट.
- 10+1 शेळी किंवा मेंढी गट.
पात्रता:
- 5+1 गटासाठी जमिनीची अट नाही. भूमिहीन नागरिक अर्ज करू शकतात.
- 10+1 गटासाठी स्वतःची किमान 1 एकर जमीन किंवा किमान 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा आवश्यक आहे.
- वनहक्कधारकांना जमिनीची अट लागू नाही.
- पशुपालनाचे प्रशिक्षण किंवा 2 वर्षांचा शेळी-मेंढी पालनाचा अनुभव आवश्यक आहे.
अनुदान:
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50%
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75%
संपूर्ण सविस्तर माहिती इथे वाचा 👉 Sheli/Mendhi Palan Yojana: शेळी/मेंढी गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
5. सुधारित देशी कुक्कुटपालन योजना
कुक्कुटपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या भूमिहीन नागरिकांसाठी ही योजना आहे.
या योजनेअंतर्गत 26 ते 28 आठवड्यांच्या वयाच्या 500 सुधारित किंवा देशी कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करण्यासाठी मदत देण्याची तरतूद आहे.
यामध्ये पक्षी, शेड, खाद्य, पाणी भांडी, अंडी ठेवण्याचे ट्रे आणि इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे.
- एकूण प्रकल्प किंमत – ₹3,32,200
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50% अनुदान
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75% अनुदान
पात्रता: भूमिहीन लाभार्थी पात्र आहेत. कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण किंवा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
संपूर्ण सविस्तर माहिती इथे वाचा 👉 Kukkut Palan Yojana: अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
6. देशी बैलजोडी खरेदी अनुदान योजना
देशी बैलजोडी खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50% अनुदान.
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75% अनुदान.
भूमिहीनांसाठी विशेष अट: भूमिहीन व्यक्तीने उसतोड महामंडळाकडे नोंदणीकृत उसतोड कामगार असणे आवश्यक आहे.
संपूर्ण सविस्तर माहिती इथे वाचा 👉 Deshi Bail Jodi Subsidy Yojana Apply Online: देशी बैल जोडी ₹1 लाख 26 हजार/-अनुदान योजना 2026 संपूर्ण माहिती | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
7. मिनी TMR मशीन खरेदी अनुदान
जनावरांसाठी संतुलित खाद्य तयार करण्यासाठी मिनी TMR मशीन खरेदी करण्याकरिता अनुदान देण्याची तरतूद आहे.
- मशीनची किंमत – ₹4,40,000
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50% अनुदान
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75% अनुदान
पात्रता: भूमिहीन लाभार्थी अर्ज करू शकतात. मात्र स्वतःच्या मालकीची किमान 10 मोठी पशुधने किंवा 50 शेळ्या अथवा मेंढ्या असणे आवश्यक आहे.
8. कडबा कुट्टी यंत्र खरेदी अनुदान
पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी या योजनेत अनुदान मिळणार आहे.
- यंत्राची किंमत – ₹30,000 पर्यंत.
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50% अनुदान.
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75% अनुदान.
पात्रता: भूमिहीन लाभार्थी अर्ज करू शकतात. स्वतःच्या मालकीची किमान 2 दुधाळ जनावरे किंवा 10 शेळ्या अथवा मेंढ्या असणे आवश्यक आहे.
संपूर्ण सविस्तर माहिती इथे वाचा 👉 Kadaba Kutti Machine Anudan Online Apply: कडबाकुट्टी यंत्र अनुदान योजना 2026 – 75% सबसिडी संपूर्ण माहिती | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना GR PDF
9. सुधारित चारा व पशुखाद्य पुरवठा योजना
गाय, म्हैस, कालवडी आणि पारड्यांसाठी पशुखाद्य पुरवठा करण्याची ही योजना आहे.
या योजनेअंतर्गत जनावरांच्या वयानुसार खाद्य पुरवठ्याचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
पात्रता:
- भूमिहीन पशुपालक पात्र आहेत.
- कालवडी किंवा पारडीची NDLM पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
- 3 वर्षांसाठी विमा उतरवणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील एकाच कालवडी किंवा पारडीसाठी लाभ मिळेल.
अनुदान:
- सर्वसाधारण प्रवर्ग – 50%
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – 75%
10. गाय किंवा म्हशीमध्ये भ्रूण प्रत्यारोपणासाठी अनुदान
गाय किंवा म्हशीमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.
- एका भ्रूण प्रत्यारोपणाची किंमत – ₹24,000
- सर्व प्रवर्गांसाठी – 100% अनुदान.
पात्रता: भूमिहीन पशुपालक पात्र आहेत. मात्र स्वतःच्या नावावर भारत पशुधन पोर्टलवर नोंद असलेली गाय किंवा म्हैस असणे आवश्यक आहे. गोशाळांचाही समावेश आहे.
गाय किंवा म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करण्यासाठी Sex Sorted Semen उपलब्ध करून देण्याची या योजनेत तरतूद आहे.
- एका रेतमात्रेची किंमत – ₹575 किंवा वेळोवेळी निश्चित होणारी किंमत.
- सर्व प्रवर्गांसाठी – 100% अनुदान.
पात्रता: स्वतःच्या नावावर भारत पशुधन पोर्टलवर नोंद असलेली गाय किंवा म्हैस असणे आवश्यक आहे.
12. नर पारडू (रेडकू) संगोपन व संवर्धन प्रोत्साहन योजना
गाय किंवा म्हशीपासून जन्मलेल्या नर वासरांचे संगोपन करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.
- एका नर पारडू किंवा रेडकूसाठी – ₹6,000.
- पहिला हप्ता – 50%, जनावराचे वय 6 महिने पूर्ण झाल्यावर.
- दुसरा हप्ता – 50%, जनावराचे वय 1 वर्ष पूर्ण झाल्यावर.
पात्रता:
- भूमिहीन लाभार्थी पात्र आहेत.
- नर पारडू किंवा रेडकूची NDLM पोर्टलवर स्वतःच्या नावाने नोंदणी आवश्यक आहे.
- एका पशुपालकाला कमाल 10 नर पारडू किंवा रेडकूंसाठी लाभ मिळू शकतो.
MahaDBT 2.0 वर ऑनलाइन अर्ज कधी सुरू होणार?
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी 26 नोव्हेंबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.
अर्ज प्रक्रिया MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे.
अधिकृत पोर्टल: https://mahadbt2.maharashtra.gov.in/
अर्ज करण्यासाठी कोणती ID आवश्यक आहे?
या योजनेसाठी अर्ज करताना MahaID महत्त्वाची आहे.
- MahaID तयार असणे आवश्यक आहे.
- ज्या अर्जदारांच्या नावावर जमीन आहे, त्यांनी Farmer ID तयार ठेवावा.
- जमिनीची अट असलेल्या घटकांसाठी Farmer ID आणि जमिनीची माहिती आवश्यक राहील.
- भूमिहीनांसाठी पात्र असलेल्या घटकांमध्ये केवळ जमीन नसल्यामुळे Farmer ID ची अट लागू होत नाही; मात्र MahaID आवश्यक आहे.
MahaID कशी तयार करायची?
MahaID तयार करण्यासाठी MahaSarathi पोर्टलवर आधार क्रमांक आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP द्वारे नोंदणी करता येते.
अर्जाची निवड कशी होणार?
या योजनेअंतर्गत अर्जांची छाननी आणि लाभार्थी निवड जिल्हानिहाय उपलब्ध उद्दिष्टानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे.
एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे.
महत्त्वाच्या सूचना
- प्रत्येक योजनेची पात्रता वेगवेगळी आहे.
- सर्व भूमिहीन नागरिकांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळेलच असे नाही.
- काही योजनांसाठी पशुपालनाचे प्रशिक्षण किंवा अनुभव आवश्यक आहे.
- काही योजनांसाठी स्वतःच्या मालकीची जनावरे असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेच्या सर्व अटी तपासून घ्या.
- कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला अर्जाच्या नावाखाली पैसे किंवा कागदपत्रे देऊ नका.
योजनेबाबत अडचण असल्यास पशुसंवर्धन विभागाच्या 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
मित्रांनो, तुमच्याकडे स्वतःची शेती किंवा जमीन नसली तरी पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या या योजनांमध्ये संधी उपलब्ध होऊ शकते.
विशेषतः शेळी-मेंढी पालन, गाय-म्हैस पालन, कुक्कुटपालन आणि वराह पालन यांसारख्या योजनांची माहिती भूमिहीन नागरिकांनी नक्की करून घ्यावी.
26 नोव्हेंबर 2026 पासून MahaDBT 2.0 पोर्टलवर अर्ज सुरू होत असल्यामुळे ही माहिती आपल्या गावातील भूमिहीन नागरिक, शेतमजूर आणि पशुपालकांपर्यंत नक्की शेअर करा.
अशाच सरकारी योजना, अनुदान, शासन निर्णय आणि ऑनलाइन अर्जाच्या माहितीसाठी Mahasarkari Yojana ला भेट देत राहा.
अधिक माहितीसाठी: PDF
महत्त्वाची टीप: हा लेख पशुसंवर्धन विभागाच्या उपलब्ध प्रस्तावित योजना दस्तऐवजातील पात्रता आणि अनुदानाच्या तपशीलांवर आधारित आहे. प्रत्यक्ष अर्ज करताना MahaDBT 2.0 पोर्टलवर उपलब्ध अंतिम अटी व सूचनाच ग्राह्य धराव्यात.
