Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

E Pik Pahani Online Maharashtra संपूर्ण माहिती

Posted on March 15, 2023 by Mahasarkari Yojana


ई-पीक पाहणी अँप | ई पीक पाहणी नोंदणी | E pik pahani report | E pik pahani online | ई-पीक पाहणी अँप iphone | E pik pahani gov in | e pik pahani online registration | e peek pahani online login | e pik pahani report | e pik pahani app | e pik pahani customer care number| e pik pahani mahiti

E Pik Pahani Online Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात इ-पीक पाहणी संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या इ पीक पाहणीचे उद्दिष्ट्य काय, इ पीक पाहणी काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, इ पीक पाहणी ॲप मोबाइलला मध्ये कसे घेयचे, इ पीक पाहणी नोंदणी कशी करायची, त्याच्या मार्गदर्शक सूचना या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

Contents hide
1 E Pik Pahani Online Maharashtra | इ-पिक पाहणी ऑनलाईन महाराष्ट्र
1.1 इ- पिक पाहणी उद्दिष्ट्य
2 इ-पीक पाहणीचे फायदे कोणते?
2.1 पीक पाहणी महत्वाच्या लिंक
2.2 इ-पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया काय?
3 पिक पाहणी वर पिकांची नोंदणी कशी करायची?
4 इ-पिक पाहणी मार्गदर्शक सूचना –
4.1 Related

E Pik Pahani Online Maharashtra | इ-पिक पाहणी ऑनलाईन महाराष्ट्र

राज्य सरकारने पीक पेरणीची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारे ही माहिती उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेला आहे. इ-पीक पाहणीचा वापर 15 ऑगस्ट 2021 पासून राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती गठित करून करण्यात येणार आहे.

इ-पिक पाहणी द्वारे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक पाहणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने करून माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे तलाठ्यांचे काम सोपे होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून अधिक प्रमाणित रियल टाईम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे शेतकरी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकाची माहिती अक्षांश रेखांश दर्शवणाऱ्या पिकाच्या छाया चित्रासह उपलब्ध होऊ शकणार आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद/रस्ते योजना मराठी माहिती महाराष्ट्र शासन निर्णय

इ- पिक पाहणी उद्दिष्ट्य

  • इ- पिक पाहणीचे मुख्य उद्दिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत.
  • पीक पेरणी अहवालाची माहिती एकत्रित करणे.
  • माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक पाहणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने करून माहिती संकलित करणे.
  • पीक विमा तसेच पीक पाहणी दावे निकालात काढणे.

टाटा ट्रस्टच्या साह्याने हा कर्यक्रम विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांचा सहभाग आणणे शक्य झाले आहे. याचा उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे करंजपाडा येथे प्रायोगिक तत्त्वावर यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे. इ-पिक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यातील वीस तालुक्यांमध्ये यशस्वीपणे करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन फॉर्म रेशन कार्ड (शिधापत्रिका) महाराष्ट्र यादी,अर्ज, कागदपत्रे माहिती

इ-पीक पाहणीचे फायदे कोणते?

  • गाव तालुका जिल्हा आणि विभाग येथील पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ इ-पिक पाहणी प्रकल्पातील माहितीद्वारे देता येणार आहे.
  • ठिबक आणि तुषार सिंचन योजनांचा लाभ अचूकरीत्या खातेदारांना देणे शक्य होईल होणार आहे.
  • कृषी गणना अत्यंत सुलभ आणि अत्यंत अचूक पद्धतीने या ॲपद्वारे करता येईल.
  • पीक पाहणी मुळे खातेदारांना पीक कर्ज देणे, पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.
  • खातेनिहाय आणि पीक निहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांकडून देय असणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येणार आहे.

पीक पाहणी महत्वाच्या लिंक

  • ई-पीक पाहणी अँप (e pik pahani app) – https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek
  • ई पीक पाहणी नोंदणी (E pik pahani online registration Guide PDF Link)

इ-पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया काय?

  • नोंदणी प्रक्रियेसाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून इ -पीक पाहणी अँप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी लागेल.
  • सातबारा मधील नावाप्रमाणे खातेदारांना त्यांच्या नावाची अचूकपणे नोंद करावी लागणार आहे.

पिक पाहणी वर पिकांची नोंदणी कशी करायची?

E Pik Pahani Registration (Nondni) Online
  • ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एकापेक्षा जास्त खाते क्रमांक आहेत. त्यांनी त्यांचे नाव नोंद केल्यास त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक आणि त्याखालील सर्व भूमापन किंवा गट क्रमांक मोबाईल स्क्रीनवर नोंदणीसाठी उपलब्ध असल्याचे दिसतील.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस द्वारे चार अंकी पासवर्ड प्राप्त होईल.
  • हा पासवर्ड अचूकपणे भरल्यास खातेदाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • यानंतर खातेदाराला हा सांकेतिक पासवर्ड टाकून पीक पाहणी ॲप मध्ये लॉगिन करावे लागेल आणि पीक पाहणीची माहिती भरावी लागेल.

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२:Widow Pension Scheme कागदपत्रे, Form PDF

इ-पिक पाहणी मार्गदर्शक सूचना –

  • शेतकऱ्यांच्या नोंदणी करता त्यांचे खाते क्रमांक किंवा गट क्रमांक च्या माहितीसाठी सातबारा उतारा किंवा आठ उताराची प्रत आवश्यक आहे.
  • सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव, गाव नंबर, सातबारा मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले गेलेले आहे. ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहिवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकणार आहेत.
  • पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी केल्यानंतर पीक विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि इ-पिक पाहणी मध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावत आढळून आल्यास इ-पिक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.
  • अल्पवयीन खातेदारांच्या बाबतीत त्यांचे पालक नोंदणी करू शकतील.
  • खातेदाराने पीक पाहण्याची माहिती स्वतःच्या शेतामध्ये उभे राहून करावी लागेल.
  • पीक पाहणी झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांश सह फोटो आणि सर्व माहिती अपलोड करावी लागेल.
  • जर मोबाईल इंटरनेट सुविधांमध्ये अडचण येत असेल, तर गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल. त्या ठिकाणी जाऊन पिक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
  • नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर आलेला चार अंकी पासवर्ड कायमस्वरूपी वैध असेल. आणि तो भविष्यात वापरता येईल.
  • जर एखाद्या शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नसेल, तर तो दुसऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईल नंबर वरून देखील स्वतःची नोंदणी करू शकतो. एका मोबाईल नंबर वरून एकूण वीस खातेदारांची नोंदणी करता येईल.
ई पिक पाहणी म्हणजे काय?

ई-पीक सर्वेक्षण मोबाईल ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पीकाची नोंदणी ठेवायचे चे काम केले जाते. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ इ-पिक पाहणी प्रकल्पातील माहितीद्वारे देता येतो. पीक पाहणी मुळे खातेदारांना पीक कर्ज देणे, पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.

E pik pahani customer care number काय आहे?

E pik pahani customer care number – 020-25712712

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Recent Posts

  • ऊस उत्पादक शेतकरी असाल, तर नक्की पहा!! महत्वाचा नवीन शासन निर्णय GR
  • ट्रॅक्टर अनुदान आलं!! Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023 GR
  • कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free
  • राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2023 माहिती
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2023
  • PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2023
  • पशु किसान क्रेडिट कार्ड अप्लाई 2023
  • Online 2023-24 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती
  • (PMJDY)प्रधानमंत्री जन धन योजना 2023 बँक खाते मराठी माहिती :फायदे, Form
  • (पोखरा अंतर्गत) ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज 2023

Categories

  • Mahadbt Farmer Scheme List
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • अर्ज कसा करावा
  • आदिवासी विकास विभाग योजना
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2023
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2023
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2023 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme