महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Mahajyoti | Mahajyoti Free Tablet Yojana | Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra | Free Tablet Yojana Maharashtra | Mahajyoti
Free Tablet Yojana 2021 Online Registration: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था) मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट, इंटरनेट, पुस्तके, ऑनलाईन प्रशिक्षण आणि मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.

Free Tablet Scheme Maharashtra 2022
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी MH-CETI/JEE/NEET २०२३ या परिक्षांच्या ऑनलाईन पूर्व तयारीसाठी फ्री टॅबलेट योजना आपल्या राज्यात महाज्योतीकडून राबवली जात आहे. या योजनेसाठी OBC, VJNT, SBC या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. सन २०२३ मध्ये होणाऱ्या MH-CET/JEE/NEET परीक्ष्यांसाठी विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Online Registration प्रधानमंत्री कौशल विकास योजना pmkvy फॉर्म 2021
फ्री टॅबलेट स्कीम चे उद्दिष्ट्य काय?
महाज्योतीच्या या योजनेच्या माध्यमातून सन २०२१ मध्ये राज्यातील ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
दहावी नंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं त्यांना शक्य होत नाही. अश्या गरीब विद्यार्थ्यांचेइंजिनीरिंग आणि मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
1. विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईट परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
2. तसेच या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी परीक्षेची पुस्तके, मोफत टॅबलेट आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.
1. दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका
2. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रं
3. ओबीसी,भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
4. नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे.



फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 पात्रता (Eligibility) काय?
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
- या योजेनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांने यावर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
- ओबीसी (OBC), भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र आहेत.
- शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ७० % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ६०% गुण असणे आवश्यक आहेत.
फ्री टॅबलेट योजनेचे रजिस्ट्रेशन (Registration) कुठे करायचे?
- महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या ऑफिसिअल वेबसाईटवर जायचं आहे
- तिथे नोटीस बोर्डवर क्लिक करून आपला प्रवेश अर्ज अपलोड करायचा आहे.
मोफत टॅबलेट योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा?
- सर्वप्रथम तुम्हला महाज्योतीच्या ऑफिसिअल वेबसाइट वर म्हणजेच https://mahajyoti.org.in/ या वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
- यानंतर तुम्हला खाली स्क्रोल करून उपक्रम यामध्ये ‘MH-CET/JEE/NEET या परिक्षांच्या २०२३ करिता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी’ याखालील Read More यावर क्लिक करायचे आहे.
- आत्ता तुमच्यासमोर नवीन पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हाला Click Here For Registration (नोंदणी अर्ज) यावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर आत्ता खालील पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
- कागदपत्रे अपलोड करण्यासाठी यावर क्लिक करा.



- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Upload या बटनावर क्लिक करा.
- आत्ता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती भरायची आहे.
- शेवटी फॉर्मच्या खाली दिलेल्या Submit ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
- तसेच खालील Print This Form यावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवायची आहे.
- अश्या प्रकारे टॅबलेट योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
- योजनेच्या लाभासाठी महाज्योती कडून तुम्हाला संपर्क केला जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.
सहकार मित्र इंटर्नशिप योजना 2022 सुशिक्षित बेरोजगार योजना NCDC online apply
आम्ही या लेखामार्फत तुम्हला या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हला कोणती शंका असेल, तर ७०६६८८८८४५ या नंबरवर संपर्क साधू शकता.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023
- Krushi Seva Kendra Licence Maharashtra Application संपूर्ण माहिती
- E Shram Card Ka Paisa Kaise Check Kare ? जानिए स्टेप बाइ स्टेप
- ३९ कोटी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना निधी वितरित
- शासन आपल्या दारी योजना 2023 संपूर्ण माहिती । Shasan Aplya Dari Yojana Registration