नमस्कार मित्रांनो, आज आपण “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन” योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा हे पाहणार आहोत. ह्या योजनेतून महिलांना 1500/- रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. यासाठी आता ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वेबसाइट पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे फॉर्म भरायला आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे.
ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration कोण करू शकतो?
- महाराष्ट्राची रहिवासी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना देखील ही योजना लागू आहे.
- अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आहे अडीच लाखांपेक्षा जास्त असून नये.
लाभ कुणाला दिला जाणार नाही
- अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- आयकर दाता असलेले कुटुंबे देखील या योजनेपासून लाभ घेऊ शकणार नाहीत.
- कायमस्वरूपी आणि कंत्राटी सरकार कर्मचारी यांना देखील लाभ दिला जाणार नाही.
- इतर सरकारी योजनांमधून आधीच दीड हजार पेक्षा जास्त रक्कम मिळवणाऱ्या महिलांना या योजनातून लाभ मिळणार नाही.
- त्याचप्रमाणे खासदार आमदार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ नाही.
- पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन असलेली कुटुंब देखील या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाहीत.
- नोंदणीकृत चार चाकी वाहने असलेली कुटुंब त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाहीत.
Ladki Bahini Yojana Documents Marathi
- अर्ज
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/जन्म दाखला
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
- बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
ladakibahin.maharashtra.gov.in अर्ज भरण्याची सोपी प्रक्रिया
जर तुम्ही आधीच फॉर्म भरला असेल, तर पुनः भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या महिलांनी अजून फॉर्म भरला नाही, त्यांनी ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. याबद्दल संपूर्ण माहिती या post मध्ये देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana यादी: 2 मिनिटात लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?
ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration व अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम, तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटच्या लिंकसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- वेबसाइटवर पोहोचल्यानंतर, तुम्हाला ‘अर्जदार लॉगिन’ हा पर्याय दिसेल. येथे क्लिक करा आणि ‘साइन अप’ पर्यायावर क्लिक करून तुमचं खाते तयार करा. खाते तयार करताना तुमचं नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड, जिल्हा, तालुका, गाव आणि अन्य माहिती भरावी लागेल.
- साइन अप केल्यानंतर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. हा OTP योग्य ठिकाणी टाका आणि ‘Verify OTP’ वर क्लिक करा. OTP पडताळणी झाल्यावर तुमचं लॉगिन यशस्वी होईल.
- लॉगिन केल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करा‘ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल. आधार कार्डवरील नाव, पत्ते, आणि अन्य माहिती आपोआप भरली जाईल.
- आधार कार्डवरून माहिती आपोआप भरली जाईल. तुमचं पत्ता, पिनकोड आणि इतर माहिती तपासा. यानंतर जिल्हा, तालुका, आणि महानगरपालिका किंवा नगरपालिका निवडा.
- तुम्हाला इतर सरकारी योजनेतून लाभ मिळत आहे का ते तपासा. जर तुम्हाला दरमहा 1500 रुपये किंवा अधिक मिळत असेल, तर तुम्ही अर्ज करू शकत नाही.
- बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड आणि आधार कार्डाशी बँक खात्याचं लिंक तपासा. सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पिवळे/भगवे रेशन कार्ड अपलोड करा.
- स्वघोषणा पत्र डाउनलोड करा आणि प्रिंट करा. त्याची लिंक खाली दिलेली आहे. लेटरमध्ये सर्व बॉक्स, तारीख, स्थान, नाव आणि स्वाक्षरी भरा.
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link
- अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करा किंवा कॅमेरा वापरून थेट फोटो घ्या.
- सर्व माहिती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर, तुम्ही ‘अर्ज पाहा’ या पर्यायावर क्लिक करून अर्जाच्या स्थिती तपासू शकता. अर्ज ‘Pending’ असेल तर ते प्रक्रियेत आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे, फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक असावी लागते. कागदपत्रे नीट अपलोड करा आणि स्वघोषणा पत्रावर सही करा. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल. कृपया या माहितीला तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.
- सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2 ऑनलाइन अर्ज Link, फॉर्म, फायदे
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF, Online रजिस्ट्रेशन, Official Website
- ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link