मधमाशी पालन योजना: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात मधमाशी पालन योजना अनुदानासंबंधित संपूर्ण माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत. ज्यामध्ये या योजनेत अर्ज कोण करू शकतो, योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा, अटी, आवश्यक कागदपत्र, Online अर्ज करण्यासाठी लिंक आणि अर्जाची अंतिम तारीख या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या लेखात दिली गेलेली आहे. जर तुम्ही शेतकरी किंवा युवा बेरोजगार असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मधमाशी पालन योजना अनुदान २०२४
मधमाशी पालन हा केवळ एक उद्योग नाही, तर तो एक कला आहे ज्यातून निसर्गाशी जवळीक साधता येते आणि त्याच वेळी आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने यंदा मध केंद्र योजना (मधमाशी पालन) साठी ५०% अनुदानाची घोषणा केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि नव्या युवा उद्योजकांना सुवर्णसंधी मिळणार आहे.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 ऑनलाईन रजिस्ट्रेशन
या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५०% अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कोण अर्ज करू शकतो?
- योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा आणि स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल.
- वयोमर्यादा १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी किमान १०वी उत्तीर्ण असणे आणि २१ वर्षांपेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे.
Gay Gotha Yojana 2024 PDF: गाय गोठा अनुदान महाराष्ट्र Form
अर्ज करण्यासाठी अटी
- किमान एक एकर शेती किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी.
- मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.
- केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी.
- एक हजार चौरस फूट इमारत असावी.
Guide to Fast Working Capital Loans for Your Business
अर्जासाठी अवश्यक कागदपत्र आणि माहिती
- अर्जदाराचे नांव व पूर्ण पत्ता
- प्रवर्ग
- मोबाइल नं.
- आधार कार्ड क्रमांक (छाया प्रत सोबत जोडावी)
- अर्जदारची शैक्षणिक पात्रता (छाया प्रत सोबत जोडावी)
- वय वर्ष
- नावावर असलेली एकूण शेत जमीन ( ७ /१२ उतारा छाया प्रत सोबत जोडावी )
मधमाशी पालन योजना Online Form Link
अर्ज करण्याची अंतिम तारीख किती?
हिंगोली जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि पात्र संस्थांना २० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ही सुवर्णसंधी चुकवू नका! लवकरात लवकर अर्ज करा.
अश्याच माहितीसाठी आमच्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनेल ला follow करा.
- Latest पीक विमा योजना GR अनुदान मंजूर! पहा कोणत्या हंगामासाठी किती कोटी अनुदान मंजूर!!
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List