Panjabrao Dakh: नमस्कार मित्रांनो, आजच्या. लेखांमध्ये आपण पंजाबराव डख कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती आहे? ते काय करतात? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो? त्यांना शेती किती आहे? पंजाबराव डक यांचा मोबाईल नंबर आणि वॉट्सअप ग्रुप किती आहेत? यासंबंधित संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
Panjabrao Dakh कोण आहेत?
पंजाबराव डख हे पाऊस कधी पडणार? पाऊस कोणत्या तारखेला पडणार? दिवसा पडणार की रात्री पावसाचे प्रमाण किती असणार? याची अगदी तंतोतंत माहिती त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुपमधून पुरवतात. सध्या हवामानखात्याने करोडो रुपये खर्च करून देखील उभारलेल्या सॅटेलाइट यंत्रणेला सुद्धा जेवढी अचूक माहिती देता येत नाही. तेवढी पंजाबराव डख हे पुरवत आहेत.
पंजाबराव डख कुठले आहेत?
पंजाबराव डख हे मूळचे परभणी जिल्ह्यामधील गुगळी, धामणगाव येथील एक शेतकरी आहेत. आणि ते शेतकरी असल्यामुळे टीव्हीवर नियमित हवामान अंदाज ऐकण्याची त्याची त्यांना सवय होती. आणि हा हवामान अंदाज ऐकल्यावर पंजाबराव डक त्यांच्या वडिलांसोबत पावसाच्या अंदाजावर सातत्याने चर्चा करत असायचे. त्यांचीही निरीक्षण आणि आपल्या स्वतःच्या निरीक्षणांची नोंद करत असायचे. अनेकदा त्यांनी केलेले निरीक्षण हे तंतोतंत बरोबर ठरवायचे आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अचूक पावसाचा अचूक अंदाज मिळत असल्याने जे शेतीत होणारे नुकसान आहे. शेतकऱ्यांचे नुकसान हे कमी व्हायची आणि शेतकऱ्यांना त्यापासून मदत मिळायची.
E Pik Pahani Online Maharashtra संपूर्ण माहिती
Panjabrao Dakh यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतोय?
सरकारी हवामान खात्यामधील जी माहिती आहे ती अनेकवेळा शेतकर् यांसाठी निराशेचे कारण बनले होते. आणि हवामान वर्तवल्यापेक्षा वेगळेच काहीतरी व्हायचे. त्यामुळे हवामान खात्याची विश्वासहर्ता कमी झाली. आणि पंजाबराव डक या हवामान तज्ञांनी शेतकर् यांना नुकसानीपासून वाचवले होते. आणि त्यांना अचूक अशी माहिती सांगून शेतकर् यांची मने जिंकली होती. ते कोणत्याही प्रकारचे भाकीत सांगत नव्हते. ते सर्व शास्त्रशुद्ध आणि त्यांच्या सखोल निरीक्षणावर आधारित अशी माहिती शेतकर् यांना वेळोवेळी पुरवत आहेत.
हवामान अंदाज सांगण्यासाठी ते कशाचा वापर करतात?
हवामान अंदाज याची माहिती घेण्यासाठी ते संगणकाचा वापर करतात. उपग्रह नकाशांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणांची नोंद करून त्यांचा अंदाज व्यक्त करतात. जी सरकारी हवामान खाते आहेत. सॅटेलाइट आहेत. त्यांची यंत्रणा ही पंजाबराव डख यांच्या समोर कमी पडताना दिसत आहे. आणि हवामान अंदाजाचा अचूक माहिती पुरवल्यानी महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाचा अंदाज आणि ज्या धोक्याच्या सूचना आहेत त्याआधीच सांगितल्यामुळे शेतकरी सतर्क राहून आपली काम वेळेवर आवरत असतात. शेतीचे कुठले काम पावसाच्या दृष्टीने प्राधान्याने आधी करावे याकडेही लक्ष देत असतात. त्यामुळे अतिवृष्टीमुळे जे पिकांची नुकसान होते ते यापासून वाचवले जात आहे. आणि त्यांची पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकर् यांना पूर्वसूचना मिळतात. त्याचप्रमाणे गारांचा पाऊस कुठे पडणार आहेत? कधी पडेल त्याचे प्रमाण किती असेल? या संबंधीची संपूर्ण माहिती ते त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून महाराष्ट्रातील सर्व शेतकर् यांपर्यंत तालुक्यानुसार आणि गावानुसार पाठवत असतात.
पंजाबराव डख यांचे शिक्षण किती झाले आहे?
पंजाबराव जिल्हा परिषद शाळेवर सध्या अंशकालीन शिक्षक म्हणून रुजू आहेत. त्यांचे शिक्षण हे ईटीडी आणि सी टी सी झाले आहे.
त्यांना शेती किती आहे?
पंजाबराव डक यांना 10 एकर शेती असून ते हवामान अवर आधारित शेती करतात. त्यांच्या शेतामध्ये हरभरा सोयाबीन ही पिके घेतात. त्यामधून ते जास्तीत जास्त उत्पन्न घेतात. त्यांना एकूण 200 क्विंटल शेतमाल होतो. सोयाबीन 100 क्विंटल आणि हरभरा 100 क्विंटल असे एकूण 200 क्विंटल. अशाप्रकारे ते त्यांच्या शेतामध्ये उत्पन्न घेतात असे एकून 8,00,000 रुपये उत्पन्न होते. त्यामध्ये त्यांना एकूण नफा ₹6,00,000 एवढा होतो.
कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free
पंजाबराव डख हवामान अंदाज व्हॉट्सअॅप ग्रुप
Panjabrao Dakh यांनी शेतकर् यांच्या हितासाठी वॉट्सॲप ग्रुप तयार केले आहेत. त्यांचे एकून 560 वॉट्सअप ग्रुप आहेत. त्याचप्रमाणे ते यूट्यूब चॅनलवर देखील आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपवर ते रोज चे हवामान अंदाज शेतकर् यांपर्यंत शेअर करत असतात. त्याचप्रमाणे त्यांचे हवामान अंदाजाची माहिती तुम्हाला त्यांच्या यूट्यूब चॅनलवर देखील मिळेल.
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2024 महाराष्ट्र माहिती