Pashudhan Yojana 2026: नमस्कार मित्रांनो, आज आपण पशुसंवर्धन विभागाच्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला गाय-म्हैस पालन, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराहपालन, चाफ कटर, मुरघास, हायड्रोपोनिक चारा, Mini TMR मशीन, देशी बैलजोडी, वासरांचे संगोपन, AI Smart Collar, कर्जावरील व्याज सवलत किंवा धनगर समाजासाठीच्या योजना यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर हा शासन निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
या नवीन GPR म्हणजेच Government Process Re-engineering मुळे अर्ज प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या 21 वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी एकच सामायिक अर्ज करण्यात येणार आहे. अर्जदाराच्या माहितीनुसार त्याला पात्र असलेल्या योजना आणि त्यातील घटक प्रणालीत दाखवले जातील. अनेक माहिती आणि कागदपत्रे विविध सरकारी पोर्टलवरून Auto Fetch करण्याची सुविधा राहणार आहे.
हा शासन निर्णय 05 ऑक्टोबर 2026 रोजी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केला असून शासन निर्णय क्रमांक पिएएचडी-14034/49/2026/पदुम-4 (ई-1841485) असा आहे.
Pashudhan Yojana 2026 हा शासन निर्णय नेमका कशासाठी आहे?
पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनांची अंमलबजावणी अधिक नागरिकाभिमुख, सोपी, पारदर्शक, वेळेत आणि पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी GPR तयार करण्यात आला आहे.
जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेतल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना एकत्रित पद्धतीने राबवण्यासाठी “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना” ही एकछत्री योजना सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये राज्यस्तरीय 11 आणि जिल्हा वार्षिक योजनांमधील 14 योजनांचा समावेश आहे. त्यापैकी 9 राज्यस्तरीय आणि 9 जिल्हा वार्षिक योजना वैयक्तिक लाभाच्या आहेत.
याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ आणि गोसेवा आयोगाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे.
Pashudhan Yojana 2026 एकूण किती योजनांचा समावेश आहे?
शासन निर्णयात पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित महामंडळ/आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या एकूण 22 वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे.
यातील क्रमांक 1 ते 21 योजना वैयक्तिक लाभाच्या आहेत.
तर क्रमांक 22 ही गोशाळांमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठीची परिपोषण योजना आहे.
22 योजनांची यादी
- 1 किंवा 2 दुधाळ गाय/म्हैस वितरण योजना
- 5+1 किंवा 10+1 शेळी/मेंढी वितरण योजना
- अंडी उत्पादनासाठी 500 सुधारित/देशी कुक्कुट पक्षी योजना
- हायड्रोपोनिक तंत्रज्ञानातून हिरवा चारा उत्पादन योजना
- Mini TMR मशीन खरेदीसाठी अनुदान
- पशुपालकांना कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान
- सुधारित/देशी कालवडी/पारड्यांसाठी पशुखाद्य पुरवठा योजना
- नर पारडू/रेडकू संगोपन व संवर्धन प्रोत्साहन योजना
- देशी बैलजोडी खरेदीसाठी अनुदान
- 5 दुधाळ गाय/म्हैस पालनातून उद्योजकता विकास
- 50+5 शेळी/मेंढी पालनातून उद्योजकता विकास
- 5000 कुक्कुट पक्ष्यांद्वारे अंडी उत्पादन प्रकल्प
- 3000 ते 5000 ब्रॉयलर कुक्कुट पालन प्रकल्प
- आठवड्याला 1000 अंडी उबवणी क्षमतेचे Incubator/Hatcher
- मुरघास संयंत्र वितरण योजना
- पशुपालन/चारा व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज अनुदान
- पशुपालनात Artificial Intelligence आणि Machine Learning तंत्रज्ञानाचा वापर
- 5+1 वराहपालन युनिट
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
- NT-C धनगर मेंढपाळ कुटुंबांसाठी चराई अनुदान
- भूमिहीन NT-C धनगर मेंढपाळ कुटुंबांना जमीन खरेदी/30 वर्षांच्या भाडेपट्ट्यासाठी एकरकमी अनुदान
- गोशाळांमध्ये देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रतिपशू ₹50 अनुदान.
Poultry Farming Business Subsidy Apply Online: ₹22.5 लाख अनुदान कुक्कुटपालन पशुधन उद्योजकता योजना
Pashudhan Yojana 2026 सर्वात मोठा बदल म्हणजे एकाच अर्जाची सुविधा
पूर्वी वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करावा लागू शकत होता.
आता क्रमांक 1 ते 21 या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलमध्ये एकच सामायिक अर्ज निश्चित करण्यात आला आहे.
या अर्जामध्ये आधार क्रमांक, लाभार्थ्याचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, जात प्रवर्ग, लिंग, जमीनधारणा आणि इतर आवश्यक माहिती घेतली जाणार आहे.
एकूण 44 प्रकारची माहिती अपेक्षित आहे. त्यापैकी 29 बाबी विविध सरकारी डिजिटल प्रणालींमधून Auto Fetch करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामध्ये MahaID, AgroStack, Self-SHG, MHUCDH आणि UID-Aadhaar यांसारख्या स्रोतांचा वापर केला जाणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांतील अनुदानाची रक्कम | Pashudhan Yojana 2026
| क्र. | योजना / घटक | प्रकल्प खर्च / आधार | सामान्य प्रवर्ग अनुदान | SC/ST अनुदान / विशेष लाभ |
|---|---|---|---|---|
| 1 | 1 गाय/म्हैस + 3 वर्षांचा विमा | ₹1,12,036 | ₹56,018 | ₹84,027 |
| 2 गाय/म्हैस + 3 वर्षांचा विमा | ₹2,24,072 | ₹1,12,036 | ₹1,68,054 | |
| 2 | शेळी/मेंढी 5+1 | ₹86,284 | ₹43,142 | ₹64,713 |
| शेळी/मेंढी 10+1 | ₹1,55,311 | ₹77,655.50 | ₹1,16,483.25 | |
| 3 | 500 सुधारित/देशी कुक्कुट पक्षी | कमाल ₹3,32,200 | 50% पर्यंत | 75% पर्यंत |
| 4 | हायड्रोपोनिक चारा युनिट | ₹40,000 | ₹20,000 | ₹30,000 |
| 5 | Mini TMR मशीन | ₹4,40,000 | ₹2,20,000 | ₹3,30,000 |
| 6 | कडबाकुट्टी मशीन | ₹30,000 | ₹15,000 | ₹22,500 |
| 7 | कालवड/पारड्यांसाठी पशुखाद्य | प्रत्यक्ष खाद्य बिल | 50% | 50% |
| गाय कालवड कमाल | — | ₹29,100 पर्यंत | ₹29,100 पर्यंत | |
| म्हैस पारडू कमाल | — | ₹38,100 पर्यंत | ₹38,100 पर्यंत | |
| 8 | नर म्हैस रेडकू संगोपन | — | ₹6,000 प्रति रेडकू | ₹6,000 प्रति रेडकू |
| 9 | देशी बैलजोडी | ₹1,68,056 | 50% | 75% |
| 10 | 5 दुधाळ गाय/म्हैस प्रकल्प | कमाल ₹11,35,180 | 50% पर्यंत | 75% पर्यंत |
| 11 | 50+5 शेळी/मेंढी प्रकल्प | कमाल ₹11,38,554 | 50% पर्यंत | 75% पर्यंत |
| 12 | 5,000 अंडी उत्पादन कुक्कुट प्रकल्प | कमाल ₹30,00,000 | 50% पर्यंत | 75% पर्यंत |
| 13 | 3,000 ब्रॉयलर पक्षी | ₹12,00,000 | ₹6,00,000 पर्यंत | ₹9,00,000 पर्यंत |
| 4,000 ब्रॉयलर पक्षी | ₹15,50,000 | ₹7,75,000 पर्यंत | ₹11,62,500 पर्यंत | |
| 5,000 ब्रॉयलर पक्षी | ₹19,00,000 | ₹9,50,000 पर्यंत | ₹14,25,000 पर्यंत | |
| 14 | 1000 अंडी/आठवडा Incubator-Hatcher + Solar | ₹3,40,000 | ₹1,70,000 | ₹2,55,000 |
| 15 | मुरघास संयंत्र | ₹26,00,000 | ₹13,00,000 | ₹19,50,000 |
| 16 | पशुपालन कर्जावरील व्याज सवलत | कर्जाच्या नियमानुसार | GR मधील व्याज सवलत लागू | पात्रतेनुसार |
| 17 | AI/ML Smart Collar + Gateway | ₹5,000 × बेल्ट + ₹10,000 Gateway | 50%, कमाल ₹1 लाख | GR मध्ये सर्व प्रवर्गांसाठी 50% लाभ नमूद |
| 18 | 5+1 वराहपालन युनिट | ₹2,08,187 | 50% पर्यंत | 75% पर्यंत |
| 19 | महामेष – 20+1 Permanent | ₹3,33,000 | — | ₹2,49,750 |
| महामेष – 20+1 Migratory | ₹2,02,500 | — | ₹1,51,875 | |
| Improved Ram | ₹10,000 प्रति नर | — | ₹7,500 प्रति नर | |
| महामेष Tier-1 Permanent | ₹1,63,000 | — | ₹1,22,250 | |
| महामेष Tier-1 Migratory | ₹32,500 | — | ₹24,375 | |
| महामेष Tier-2 Permanent | ₹3,17,000 | — | ₹2,37,750 | |
| महामेष Tier-2 Migratory | ₹48,000 | — | ₹36,000 | |
| Balanced Feed | प्रत्यक्ष खरेदी | — | ₹18.75/kg (75%) | |
| Mini Silage Baler-cum-Wrapper | प्रत्यक्ष खर्च | — | 50%, कमाल ₹4 लाख | |
| Animal Feed Factory | प्रत्यक्ष खर्च | — | 50%, कमाल ₹5 लाख | |
| 20 | धनगर चराई अनुदान | ₹6,000 × 4 महिने | — | ₹24,000 प्रति कुटुंब |
| 21 | भूमिहीन धनगर जमीन खरेदी/30 वर्षे लीज | किंमत/भाड्याच्या 75% | — | 75%, कमाल ₹50,000 |
| 22 | गोशाळेतील देशी गायींचे पालनपोषण | — | ₹50 प्रति गाय प्रति दिवस | लागू नियमांनुसार |
Dairy Farming Business Subsidy Apply Online: ₹8.5 लाख अनुदान दुधाळ गाय / म्हैस पालन पशुधन योजना
अर्जदाराची कोणती माहिती Auto Fetch होणार?
अर्जदार MahaDBT पोर्टलवर Aadhaar किंवा MahaID वापरून लॉगिन करेल.
अर्जातील काही माहिती Auto असल्यामुळे ती अर्जदाराला बदलता येणार नाही.
उदाहरणार्थ:
- आधार क्रमांक
- आधारप्रमाणे पूर्ण नाव
- जन्मतारीख
- लिंग
- मोबाईल नंबर
- जात प्रवर्ग
- दिव्यांग असल्यास UDID माहिती
- रेशन कार्ड क्रमांक व प्रकार
- जमीनधारणा संबंधित माहिती
- जिल्हा, तालुका, गाव
- सर्वे नंबर
- उपसर्वे नंबर
- जमीन क्षेत्र
- मुख्य जमीनधारकाचे नाव
- संयुक्त जमीनधारकांची माहिती
- एकूण जमीनधारणा
- शेतकरी वर्गीकरण
जमीनधारकासाठी Marginal, Small किंवा Large Farmer असे वर्गीकरण प्रणालीद्वारे केले जाणार आहे.
Pashudhan Yojana 2026 कागदपत्रेही अनेक ठिकाणांहून Auto Fetch होणार
या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे उपलब्ध असलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा अपलोड करण्याची गरज कमी होणार आहे.
उदाहरणार्थ:
7/12 उतारा AgroStack मधून,
बचत गटाची माहिती MSRLM डेटाबेसमधून,
रेशन कार्ड अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पोर्टलमधून,
आणि दिव्यांग प्रमाणपत्र UDID पोर्टलमधून Auto Fetch करता येणार आहे.
जी कागदपत्रे प्रणालीतून उपलब्ध होतील ती पुन्हा जोडण्याची आवश्यकता राहणार नाही. उर्वरित कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करता येतील.
पात्रतेनुसार योजना स्वतः प्रणालीत दाखवली जाईल
अर्जदाराने सर्व योजनांचे नियम स्वतः शोधण्याची गरज कमी करण्यासाठी प्रणालीमध्ये Conditional Logic वापरण्यात येणार आहे.
अर्जदाराची वैयक्तिक माहिती आणि पात्रता तपासल्यानंतर त्याला कोणत्या योजना लागू होतात, त्याची माहिती प्रणालीत दाखवली जाईल.
यानंतर संबंधित योजना निवडल्यानंतर त्या योजनेसाठी आवश्यक असलेलीच माहिती आणि कागदपत्रे स्क्रीनवर दिसतील.
म्हणजे प्रत्येकाला सर्व माहिती भरावी लागणार नाही; तुमच्या पात्रतेनुसार आवश्यक फील्डच दाखवले जातील.
Pashudhan Yojana 2026 लाभार्थ्यांसाठी अनुदानाचे प्रमाण
या योजनांमध्ये सामान्यतः General प्रवर्गासाठी 50% आणि SC/ST साठी 75% अनुदान अशी प्रणाली ठेवण्यात आली आहे.
मात्र सर्व योजनांना हे प्रमाण समान पद्धतीने लागू आहे असे समजू नये. काही योजनांचे स्वतंत्र नियम, दर आणि कमाल मर्यादा शासन निर्णयात दिल्या आहेत.
तसेच SC/ST अर्जदारांसाठी काही योजनांमध्ये स्वतःच्या प्रवर्गासाठी 75% अनुदान उपलब्ध नसेल, तर General प्रवर्गातील 50% अनुदानावर लाभ घेण्याची संमती देण्याचा पर्याय अर्जात ठेवण्यात आला आहे. एकदा General प्रवर्गातून लाभ घेतल्यानंतर नंतर फरकाची रक्कम मागता येणार नाही.
Pashudhan Yojana 2026 आता प्रत्येक योजनेत किती लाभ मिळतो ते समजून घेऊया
1. 1 किंवा 2 दुधाळ गाय/म्हैस योजना
या योजनेत 1 गाय/म्हैस किंवा 2 गाय/म्हैस घेण्याचा पर्याय आहे.
एका जनावराचा प्रकल्प खर्च ₹1,12,036 आहे.
यामध्ये जनावराची किंमत ₹1,00,000 आणि 3 वर्षांचा विमा ₹12,036 आहे.
General प्रवर्गासाठी 50% म्हणजे ₹56,018 तर SC/ST साठी 75% म्हणजे ₹84,027 लाभ मिळतो.
2 जनावरांचा प्रकल्प खर्च ₹2,24,072 आहे.
General साठी ₹1,12,036 आणि SC/ST साठी ₹1,68,054 अनुदान आहे.
ज्या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन 1 एकरपेक्षा कमी आहे, त्याला काही परिस्थितीत जमीन भाड्याने घेण्याचा पर्याय अर्जात उपलब्ध आहे.
2. 5+1 किंवा 10+1 शेळी/मेंढी योजना
या योजनेमध्ये मेंढी किंवा शेळी निवडता येते.
5+1 किंवा 10+1 युनिटचा पर्याय आहे.
यामध्ये मादी शेळ्या/मेंढ्या आणि 1 बोकड/मेंढा यांचा समावेश आहे. 1 बोकड/मेंढ्याची किंमत ₹15,000 असून विम्याचा खर्च युनिटनुसार निश्चित केला आहे.
Sheli/Mendhi Palan Yojana: शेळी/मेंढी गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
3. 500 कुक्कुट पक्षी अंडी उत्पादन योजना
अंडी उत्पादनासाठी 500 सुधारित किंवा देशी कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प आहे.
एकूण कमाल प्रकल्प खर्च ₹3,32,200 आहे.
500 पक्ष्यांची किंमत ₹1,75,000 आहे.
2 महिन्यांच्या खाद्यासाठी ₹97,200 आणि उपकरणांसाठी ₹10,000, तर निवाऱ्यासाठी ₹50,000 अशी घटकनिहाय तरतूद आहे.
खाद्य, उपकरणे आणि housing हे पर्यायी घटक आहेत.
4. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानातून चारा उत्पादन
हायड्रोपोनिक युनिटसाठी प्रकल्प खर्च ₹40,000 आहे.
यामध्ये:
- Greenhouse/Shade net – ₹10,000
- Rack frame – ₹10,000
- इतर उपकरणे/साधने/स्टोरेज – ₹5,000
- Pump आणि misting/irrigation system – ₹5,500
- Water tank आणि piping – ₹5,000
- Plastic trays 25 – ₹4,500
General साठी लाभ ₹20,000 आणि SC/ST साठी ₹30,000 आहे.
5. Mini TMR मशीन
Mini TMR म्हणजे Total Mixed Ration मशीन खरेदीसाठी प्रकल्प खर्च ₹30,000 आहे.
General साठी ₹15,000 आणि SC/ST साठी ₹22,500 लाभ आहे.
या योजनेसाठी किमान पशुधनाची अट आहे आणि जनावरे Bharat Pashudhan/NDLM वर नोंदणीकृत असणे अपेक्षित आहे.
6. कडबाकुट्टी यंत्रासाठी अनुदान
कडबाकुट्टी मशीनचा प्रकल्प खर्च ₹30,000 आहे.
General साठी ₹15,000, तर SC/ST साठी ₹22,500 लाभ आहे.
अर्जदाराकडे किमान मोठी जनावरे किंवा शेळी-मेंढ्यांची आवश्यक संख्या असणे आणि त्यांची Bharat Pashudhan नोंदणी असणे अपेक्षित आहे.
7. कालवडी/पारड्यांसाठी पशुखाद्य योजना
या योजनेत सुधारित किंवा देशी गाय कालवड अथवा म्हैस पारडू निवडता येते.
कालवडीचे वय किमान 4 महिने आणि कमाल 32 महिने असावे.
म्हैस पारड्याचे वय किमान 4 महिने आणि कमाल 40 महिने असावे.
खरेदी केलेल्या खाद्याच्या प्रत्यक्ष बिलावर 50% अनुदान देण्यात येईल.
कमाल मर्यादा गाय कालवडीसाठी ₹29,100 आणि म्हैस पारड्यासाठी ₹38,100 आहे.
8. नर पारडू/रेडकू संगोपन योजना
या योजनेत 1 ते 10 नर म्हैस वासरे घेता येतात.
वासराचे Bharat Pashudhan वर नोंदणी असणे आवश्यक आहे.
वासराचे वय 12 महिन्यांपेक्षा जास्त नसावे.
वासरू 6 महिन्यांचे झाल्यावर ₹3,000 आणि 1 वर्षाचे झाल्यावर आणखी ₹3,000 असे एकूण ₹6,000 लाभ मिळतो.
अर्जाच्या वेळी वासरू 6 महिन्यांपेक्षा कमी असल्यास दोन्ही हप्ते लागू होतात; 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास फक्त 12 महिन्यांचा हप्ता लागू होतो.
लाभार्थ्याने योजनेअंतर्गत घेतलेले नर पारडू 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी विकणार किंवा कत्तल करणार नाही, अशी घोषणा करावी लागते.
9. देशी बैलजोडी खरेदीसाठी अनुदान
देशी बैलजोडी खरेदीसाठी या योजनेत प्रकल्प खर्च ₹1,68,056 आहे.
बैलजोडीची किंमत ₹1,50,000 आणि विम्याचा खर्च ₹18,056 असा समावेश आहे.
अनुदान प्रवर्गानुसार प्रणालीतून मोजले जाईल.
10. 5 गाय/म्हैस पालनातून उद्योजकता
या योजनेत 5 दुधाळ गाय/म्हैस घेता येतात.
कमाल प्रकल्प खर्च ₹11,35,180 आहे.
यामध्ये:
- 5 दुधाळ जनावरे – ₹5,00,000
- 3 वर्षांचा विमा – ₹60,180
- गोठा/Silo pit – ₹3,00,000
- कडबाकुट्टी मशीन – ₹30,000
- Milking machine आणि milk can – ₹50,000
- Feed/water utensils, fogger, sprayer इ. – ₹63,000
- 3 kW Solar unit – ₹1,32,000
असे घटक आहेत.
11. 50+5 शेळी/मेंढी पालन प्रकल्प
या योजनेत 50 शेळी/मेंढ्या + 5 बोकड/मेंढे असा प्रकल्प आहे.
कमाल प्रकल्प खर्च ₹11,38,554 आहे.
यामध्ये 50 शेळ्या/मेंढ्या, 5 बोकड/मेंढे, विमा, गोठा, कडबाकुट्टी मशीन आणि 3 kW सौर युनिट यांचा समावेश आहे.
12. 5000 कुक्कुट पक्ष्यांचा अंडी उत्पादन प्रकल्प
या योजनेत 5000 day-old chicks घेऊन अंडी उत्पादन प्रकल्प उभारण्याची तरतूद आहे.
कमाल प्रकल्प खर्च ₹30 लाख आहे.
यामध्ये:
- 5000 chicks – ₹2,50,000
- 1 महिन्याचे खाद्य – ₹4,50,000
- Shed – ₹15,00,000
- Equipment – ₹6,68,000
- Solar – ₹1,32,000
असे घटक आहेत.
13. 3000 ते 5000 ब्रॉयलर कुक्कुट प्रकल्प
ब्रॉयलर कुक्कुटपालनासाठी 3000 ते 5000 पक्ष्यांचा प्रकल्प आहे.
या योजनेमध्ये शेड, उपकरणे, सौर यंत्रणा आणि broiler chicks यांसारखे घटक आहेत.
यासाठी अर्ज करताना आवश्यकतेनुसार जमीन, बँक/स्वनिधीची माहिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा NOC यांसारखी कागदपत्रे लागू शकतात.
14. 1000 अंडी प्रति आठवडा Incubator/Hatcher
आठवड्याला 1000 अंडी उबवण्याची क्षमता असलेल्या Incubator/Hatcher युनिटसाठी प्रकल्प खर्च ₹3,40,000 आहे.
यामध्ये:
- Incubator/Hatcher – ₹2,08,000
- 3 kW Solar unit – ₹1,32,000
असे घटक आहेत.
15. मुरघास संयंत्र
मुरघास निर्मितीसाठी 4-row Silage Harvester + Baler Unit देण्याची योजना आहे.
प्रकल्प खर्च ₹26 लाख असून General साठी ₹13 लाख आणि SC/ST साठी ₹19.50 लाख असा लाभ नमूद आहे.
अर्जदार म्हणून Individual farmer, FPO/Co-operative Society, Farmer Producer Company, ATMA farmers group, CMRC किंवा Prabhag Sangh यापैकी पर्याय उपलब्ध आहेत.
या योजनेसाठी किमान पशुधन आणि काही गट/संस्थांसाठी स्वतंत्र कागदपत्रांच्या अटी आहेत.
16. पशुपालन कर्जावरील व्याज अनुदान
या योजनेमध्ये खालील व्यवसायांसाठी घेतलेल्या कर्जावर व्याज अनुदानाची तरतूद आहे:
- शेळी/मेंढी पालन
- गाय/म्हैस पालन
- कुक्कुटपालन
- वराहपालन
- चारा/पशुखाद्य प्रकल्प
अर्जात व्यवसायाचा प्रकार, यापूर्वी केंद्र/राज्य अनुदान घेतले आहे का, कर्जाची रक्कम आणि बँकेचे कर्ज मंजुरीपत्र याची माहिती घेतली जाते.
यासाठी Detailed Project Report आणि Loan Sanction Letter आवश्यक कागदपत्रांमध्ये आहेत.
17. पशुपालनात AI आणि Smart Collar योजना
या योजनेत पशुपालनासाठी Artificial Intelligence आणि Machine Learning Technology वापरण्याची तरतूद आहे.
अर्जदाराकडे किमान 5 गाय/म्हैस असणे आवश्यक आहे.
5 ते 40 Sensor/Smart Collar belts घेता येतात; मात्र belts ची संख्या स्वतःच्या जनावरांच्या संख्येपेक्षा जास्त असता कामा नये.
प्रत्येक collar ची किंमत ₹5,000 आणि Gateway device ची किंमत ₹10,000 आहे.
एकूण लाभ सर्व प्रवर्गांसाठी 50% असून कमाल ₹1 लाख आहे.
18. 5+1 वराहपालन युनिट
या योजनेमध्ये 1 boar + 5 sows असा 5+1 वराहपालन युनिट आहे.
कमाल प्रकल्प खर्च ₹2,08,187 आहे.
यामध्ये:
- 1 boar – ₹25,000
- 5 sows – ₹1,12,500
- विमा – ₹20,687
- Shed, feed/water equipment आणि इतर साहित्य – ₹50,000
यांचा समावेश आहे.
वराहपालनासाठी पुरेशी जमीन उपलब्ध असल्याची आणि जनावरे मोकाट सोडणार नसल्याची घोषणा करावी लागते.
19. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
ही योजना NT-C म्हणजे धनगर आणि शासनाने अधिसूचित केलेल्या तत्सम समुदायांसाठी आहे.
वय 18 ते 60 वर्षे असावे.
मेंढीपालनासाठी Permanent किंवा Migratory प्रकार निवडता येतो.
यामध्ये विविध पर्याय आहेत.
20+1 मेंढी युनिट
Permanent पद्धतीत 20 मेंढ्या + 1 मेंढा युनिटचा एकूण खर्च ₹3,33,000 असून 75% अनुदान ₹2,49,750 आणि लाभार्थी हिस्सा ₹83,250 आहे.
Migratory पद्धतीत खर्च ₹2,02,500, अनुदान ₹1,51,875 आणि लाभार्थी हिस्सा ₹50,625 आहे.
स्वतःच्या मेंढ्यांसाठी पायाभूत सुविधा
Tier 1 मध्ये 21 ते 39 मेंढ्या आणि Tier 2 मध्ये 42 किंवा त्यापेक्षा जास्त मेंढ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत.
शासन निर्णयात 40 आणि 41 मेंढ्यांसाठी स्पष्ट तरतूद दिसत नाही, अशी नोंदही दस्तऐवजात आहे.
Improved ram, balanced feed, Mini Silage Baler-cum-Wrapper आणि Animal Feed Factory यासाठीही स्वतंत्र पर्याय आहेत.
Mini Silage Baler साठी 50% अनुदान, कमाल ₹4 लाख आणि Animal Feed Factory साठी 50% अनुदान, कमाल ₹5 लाख अशी तरतूद आहे.
या योजनेत लाभार्थ्याने विमा काढणे, काही परिस्थितीत महामंडळाला पैदास झालेली मेंढी देणे, योजनेच्या ठरलेल्या खर्चापेक्षा जास्त रक्कम आणि वाहतूक खर्च स्वतः करणे यासंबंधी घोषणा करावी लागते. Permanent पालनासाठी चाऱ्याची वर्षभराची योजना देखील अपेक्षित आहे.
Ahilyadevi Yoajan Mahamesh Yoajan 2026 Online Form संपूर्ण माहिती
20. धनगर मेंढपाळ कुटुंबांसाठी चराई अनुदान
ही योजना देखील NT-C धनगर आणि तत्सम अधिसूचित समुदायांसाठी आहे.
अर्जदाराकडे किमान:
- 20 मेंढ्या
- 1 मेंढा
असणे आवश्यक आहे.
चराईचा कालावधी जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा आहे.
दरमहा ₹6,000 म्हणजे चार महिन्यांसाठी ₹24,000 अनुदान मिळेल.
एका कुटुंबातील फक्त एका सदस्याला लाभ मिळेल.
प्रत्येक जिल्ह्यात कमाल 2,000 लाभार्थी असतील. एकूण 34 जिल्ह्यांचा विचार करण्यात आला असून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांना यातून वगळण्यात आले आहे.
21. भूमिहीन धनगर कुटुंबांना जमीन खरेदी/भाडेपट्ट्यासाठी अनुदान
ही योजना भूमिहीन NT-C धनगर मेंढपाळ कुटुंबांसाठी आहे.
अर्जदाराच्या कुटुंबाकडे महाराष्ट्रात कुठेही शेतीची जमीन नसावी.
कुटुंबातील फक्त एका सदस्याला अर्ज करता येईल.
जमीन खरेदी किंवा किमान 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याचा पर्याय आहे.
किमान 1 गुंठा जमीन असावी.
जमीन खरेदी किंमत किंवा 30 वर्षांचे भाडे याच्या 75% पर्यंत, कमाल ₹50,000 एकरकमी अनुदान दिले जाईल.
उर्वरित 25% आणि कमाल मर्यादेपेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागेल.
जमीन खरेदी/भाडेपट्टा सक्षम प्राधिकरणाकडे नोंदवून त्याची प्रमाणित प्रत सादर करणे आवश्यक आहे. योजना प्रत्यक्षात राबवली नाही तर महसूल वसुलीच्या प्रक्रियेत दंडासह अनुदान वसूल केले जाऊ शकते.
22. गोशाळांसाठी प्रतिदिन प्रतिपशू ₹50 परिपोषण योजना
आता शेवटची योजना वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी नसून गोशाळा, गोसदन, पांजरपोळ आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोसंरक्षण संस्थांसाठी आहे.
या योजनेत अनुत्पादक देशी गायींसाठी प्रतिदिन प्रतिपशू ₹50 अनुदान आहे.
लाभार्थी गाय:
- देशी असावी
- कूबड असलेली असावी
- 3 वर्षांपेक्षा जास्त वयाची असावी
- Bharat Pashudhan वर नोंदणीकृत असावी.
अनुदान गोशाळेच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जाईल.
वर्षातून दोन टप्प्यांत लाभ दिला जाईल:
एप्रिल ते सप्टेंबर
आणि
ऑक्टोबर ते मार्च.
गोशाळेसाठी कोणत्या अटी आहेत?
गोशाळेकडे किमान 50 cattle-class animals असणे आवश्यक आहे.
सर्व जनावरे ear-tagged आणि Bharat Pashudhan वर नोंदणीकृत असणे अपेक्षित आहे.
गोशाळेला किमान 3 वर्षांचा गाय पालनाचा अनुभव असावा.
राष्ट्रीयीकृत बँक खाते आणि मागील तीन वर्षांचे audited accounts असणे आवश्यक आहे.
एका phase मध्ये एका गोशाळेला एकच अर्ज करता येईल.
एका मोबाईल नंबर आणि ई-मेलवरूनही एका अर्जाची मर्यादा आहे.
अर्ज दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त 3 वेळा Send Back करता येईल. तिसऱ्या Send Back नंतरही दुरुस्ती न केल्यास किंवा 21 दिवस प्रतिसाद न दिल्यास अर्ज reject केला जाऊ शकतो.
दररोज गायींची attendance गोसेवा आयोगाच्या attendance portal वर नोंदवणे आवश्यक आहे.
अर्जापासून निधी मिळेपर्यंत एकूण प्रक्रिया 45 दिवसांची ठेवण्यात आली आहे.
Pashudhan Yojana 2026 कोणकोणते जात प्रवर्ग अर्जात असतील?
अर्जातील जात प्रवर्गांमध्ये:
- Open
- SC
- ST
- VJ-A
- NT-B
- NT-C
- NT-D
- OBC
- SBC
- SEBC
- EWS
अशा श्रेणींचा समावेश आहे. योजनेनुसार पात्रता वेगळी असू शकते.
Pashudhan Yojana 2026 अर्जासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कशी असेल?
योजनेनुसार कागदपत्रे वेगवेगळी आहेत.
सामान्यपणे खालील कागदपत्रे लागू होऊ शकतात:
- 7/12 आणि 8-A उतारा
- रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- UDID प्रमाणपत्र
- जमीन/भाडेपट्टा कागदपत्रे
- महिला बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र
- विवाहानंतर नाव बदलल्यास विवाह प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- जनावरांच्या मालकीची Bharat Pashudhan/NDLM नोंदणी
- खरेदी पावती
- विमा पावती आणि पॉलिसी
- Geo-tagged फोटो
- काही योजनांसाठी बँकेचे कर्ज मंजुरीपत्र
- DPR
- ग्रामपंचायत/स्थानिक स्वराज्य संस्थेचा NOC
मात्र प्रत्येक योजनेला सर्व कागदपत्रे लागू होत नाहीत. तुमच्या निवडलेल्या योजनेनुसार आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर दाखवली जातील.
अर्जाची प्रक्रिया FCFS पद्धतीने
या GPR मध्ये अनेक योजनांसाठी First-Come-First-Served अर्थात FCFS पद्धतीचा उल्लेख आहे.
निवड झाल्यानंतर अर्जदाराला आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी साधारण 10 दिवस दिले जातात.
अर्ज Send Back झाल्यास पुन्हा सादर करण्यासाठी 5 दिवस दिले जातात.
Pashudhan Yojana 2026 अर्ज केल्यानंतर पुढे काय होते?
सामान्य प्रक्रियेत:
अर्जदार → तालुका पशुसंवर्धन अधिकारी (TAHO) → जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन (DDCAH) → Pre-sanction → खरेदी/प्रकल्पाची अंमलबजावणी → भौतिक तपासणी → अंतिम छाननी → RFT → DBT
अशी प्रक्रिया आहे.
TAHO अर्ज आणि कागदपत्रांची छाननी करून पात्रता तपासतो.
यानंतर DDCAH जिल्हास्तरावर तपासणी करून मंजुरी/Send Back/Reject करू शकतो.
मंजुरीनंतर प्रणालीतून Pre-sanction letter तयार होते.
खरेदी केल्यानंतर काय करावे?
अनेक योजनांमध्ये Pre-sanction मिळाल्यानंतर लाभार्थ्याला ठरलेल्या कालावधीत प्रकल्प उभारावा लागतो.
काही योजनांमध्ये 30 दिवस, तर काही दोन टप्प्यांच्या योजनांमध्ये 30 दिवस + 15 दिवस grace period आहे.
खरेदी केल्यानंतर पावत्या, विमा पॉलिसी आणि Geo-tagged photographs ऑनलाइन अपलोड करावे लागतात.
यानंतर प्रत्यक्ष तपासणी केली जाते आणि पात्र असल्यास अनुदानासाठी Request for Fund Transfer अर्थात RFT तयार केले जाते.
त्यानंतर DBT द्वारे रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.
अर्जाचा Status SMS आणि Email वर मिळणार
या नव्या डिजिटल प्रक्रियेचा आणखी एक फायदा म्हणजे अर्जदाराला अर्जाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर मराठी आणि इंग्रजी भाषेत SMS आणि Email द्वारे माहिती मिळणार आहे.
उदाहरणार्थ:
- अर्जात त्रुटी असल्यास Send Back
- Pre-sanction
- Final approval
- अर्जाची स्थिती
याबाबत माहिती मिळेल.
Geo-tagged फोटोद्वारे ऑनलाइन तपासणी
काही योजनांमध्ये मोबाईल ॲपद्वारे Geo-tagged photographs अपलोड करावे लागतील.
यामुळे प्रत्यक्ष प्रकल्पाची जागा, जनावरे, युनिट किंवा उपकरणे यांची ऑनलाइन तपासणी करता येईल.
म्हणजे फक्त कागदावर प्रकल्प दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष ठिकाणाची पडताळणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अनुदान थेट बँक खात्यात
MahaDBT आणि PFMS यांचे एकत्रीकरण करून पात्र लाभार्थ्याच्या Aadhaar-seeded bank account मध्ये अनुदान जलद जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी लाभ घेतला आहे का हेही तपासले जाणार
प्रणालीमध्ये अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने यापूर्वी संबंधित योजना किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला आहे का, हे तपासण्याची व्यवस्था आहे.
यामुळे नियमांनुसार पात्र नसलेल्या लाभार्थ्याला पुन्हा लाभ मिळण्यावर नियंत्रण राहणार आहे.
शेतकरी आणि पशुपालकांसाठी याचा फायदा काय?
या संपूर्ण बदलामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे अर्ज प्रक्रिया डिजिटल आणि एकत्रित होणार आहे.
पूर्वी अनेक योजनांसाठी वेगवेगळ्या अर्जांची गरज भासू शकत होती.
आता 21 वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी एकच सामायिक अर्ज असेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक माहिती आणि कागदपत्रे सरकारी डेटाबेसमधून Auto Fetch होतील.
तिसरी गोष्ट म्हणजे पात्रतेनुसार योजना आणि आवश्यक माहितीच अर्जदाराला दाखवली जाईल.
चौथी म्हणजे अर्जाच्या स्थितीची माहिती SMS/Email द्वारे मिळेल.
पाचवी म्हणजे Geo-tagged फोटो आणि ऑनलाइन पडताळणीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे.
आणि शेवटी PFMS-MahaDBT एकत्रीकरणामुळे पात्र अनुदान थेट Aadhaar-seeded बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था आहे.
महत्त्वाची सूचना
मित्रांनो, हा शासन निर्णय योजना आणि त्यांची डिजिटल अंमलबजावणी/GPR याबाबत आहे. प्रत्येक योजनेची पात्रता, घटक, कमाल अनुदान, कागदपत्रे आणि प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया वेगवेगळी आहे.
त्यामुळे फक्त “50% किंवा 75% अनुदान” एवढीच माहिती पाहून अर्ज करू नका.
तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात, त्या योजनेत कोणते घटक आहेत, किती प्रकल्प खर्च ग्राह्य आहे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे अर्ज करण्यापूर्वी तपासा.
या शासन निर्णयाचा अधिकृत संकेतांक:
202610051600268745
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202610051600268745.pdf
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
थोडक्यात काय लक्षात ठेवायचे?
- 👉 पशुसंवर्धन विभागाच्या 21 वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी एकच सामायिक अर्ज.
- 👉 अर्ज MahaDBT प्रणालीवर करण्याची प्रक्रिया.
- 👉 अर्जदाराची अनेक माहिती Auto Fetch होणार.
- 👉 7/12, रेशन कार्ड, UDID इत्यादी उपलब्ध माहिती विविध सरकारी डेटाबेसमधून मिळवण्याची सुविधा.
- 👉 पात्रतेनुसार योजना आणि संबंधित फील्ड प्रणालीत दाखवले जातील.
- 👉 अनेक योजनांमध्ये FCFS पद्धतीचा वापर.
- 👉 निवडीनंतर ठरलेल्या वेळेत कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- 👉 प्रकल्प पूर्ण केल्यानंतर Geo-tagged फोटो आणि खरेदी पावत्या द्याव्या लागतील.
- 👉 अधिकारी ऑनलाइन छाननी आणि प्रत्यक्ष पडताळणी करतील.
- 👉 मंजुरीनंतर RFT तयार होईल.
- 👉 पात्र अनुदान DBT द्वारे बँक खात्यात जमा केले जाईल.
- 👉 गोशाळांसाठी देशी गायींच्या पालनपोषणासाठी ₹50 प्रतिदिन प्रतिपशू स्वतंत्र परिपोषण योजना आहे.
- 👉 सर्व योजनांची पात्रता आणि लाभाची कमाल मर्यादा समान नाही; त्यामुळे संबंधित योजना नीट तपासणे आवश्यक आहे.
शेवटी…
तर मित्रांनो, गाय-म्हैस, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन, वराहपालन, चारा, मुरघास, TMR, कडबाकुट्टी, बैलजोडी, AI Smart Collar, पशुपालन कर्जावरील व्याज अनुदान आणि धनगर समाजासाठीच्या योजनांमध्ये मोठा डिजिटल बदल करण्याचा हा शासन निर्णय आहे.
विशेषतः एकाच अर्जातून पात्र योजनांचा विचार, Auto Fetch कागदपत्रे, ऑनलाइन छाननी, Geo-tagged फोटो, SMS/Email Status आणि DBT ही या GPR ची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
त्यामुळे पशुपालकांनी अर्ज करताना आपल्या पात्रतेनुसार योग्य योजना निवडणे आणि संबंधित योजनेची कागदपत्रे व अटी काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
