Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2026 Online Apply कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र ( कुसुम योजना महाराष्ट्र ): नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजना 2024 ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना 2026 जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल, आणि mahaurja solar pump मिळवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे कुसुम योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे,PMKY 2026 योजनेचे लाभ कोणते, अर्जासाठी फी किती असणार, ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन Maharashtra, अर्ज कसा करायचा, शंका निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
कुसुम सोलर योजना 2026 ऑनलाईन लिस्ट कशी बघायची | PM Kusum Yojana List Maharashtra 2026
PM Kusum Yojana List Maharashtra 2026 | कुसुम सोलर योजनेची लिस्ट आली
मित्रांनो मेडा कडून ज्यांनी कुसुम योजनेसाठी अर्ज भरलेला होता, त्यांना टेक्स्ट मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. ज्यांची कुसुम योजनेअंतर्गत केलेल्या अर्जामध्ये निवड झालेली आहे, त्यांना हा मेसेज आलेला आहे. तुम्ही स्क्रीन शॉट मध्ये देखील पाहू शकता तो मेसेज काय आहे.

कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जांना एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा रुपये तेरा हजार चारशे रुपये भरणा ऑनलाईन सात दिवसाच्या आत जमा करायचा आहे. अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना लाभार्थ्यांना आलेला आहे.
कुसुम सोलर चा फॉर्म भरलाय! पण अनुदान नक्की कुणाला मिळणार?
सौर कृषी पंप अर्ज कसा भरावा ?
कुसुम महाऊर्जा मेडा ( Kusum Solar )अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. खाली दिलेल्या व्हिडिओद्वारे सर्व शेतकऱ्यांना अर्ज कसा भरावा, त्यामध्ये काय करावे काय नाही करावे या सर्वांची माहिती या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. कृपया करून सौर कृषी पंप अर्ज कसा भरावा या व्हिडिओ नुसार अर्ज भरावा.
कुसुम योजना 2026 Component- B Latest GR
17 मे कुसुम सोलर पंप योजना अपडेट | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2026 Online Apply
महाऊर्जामार्फत राज्यातील. महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसूम घटक बी. योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषीपंप अन् करीता. महाऊर्जाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक 17 मे 2023 रोजीपासून सुरू करण्यात आलेला आहे. पीएम कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी. क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटींनुसार. 35 व 7.5 एचपी डीसी क्षमतेची पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खाली दिलेल्या जाहिरातीप्रमाणे असणार आहे.

नोट: महाऊर्जा पोर्टल वर शेतकरी बांधवांच्या अर्ज करण्याच्या गर्दीमुळे हे पोर्टल बंद पडत आहे. परंतु रात्रीच्या वेळी हे पोर्टल सुरु असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी हे पोर्टल चालू आहे कि नाही हे चेक करत राहावे आणि आपला फॉर्म भरून घ्यावा.
PM कुसुम सोलर पंप योजना 2026 महाराष्ट्र Online Apply | www.mahaurja.com Kusum Registration
कुसुम योजना महाराष्ट्र 2026 चे उद्देश –
कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
- सरकार शेतकर्यांना ६०% अनुदान देईल
- ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
- शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.
या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.
PM कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र GR
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2026
कुसुम योजना महाराष्ट्र 2026 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते?
- अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
- बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
- ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
- २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

कुसुम योजना महाराष्ट्र 2026 चे वैशिष्ट्य काय?
- पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
- शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.
PM कुसुम योजना 2026 महत्वाची संकेतस्थळ –
- ऑफिसियल वेबसाइट
- Online Apply PM कुसुम योजना 2026 वेबसाइट
- अर्ज नोंदणी (Online Apply) PM कुसुम योजना 2026 लिंक
सौर कृषी पंप अर्ज कसा भरावा | ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन Maharashtra
या व्हिडिओमध्ये दिलेल्या अडचणी व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही अडचण असल्यास आपल्या जवळच्या महाऊर्जा मेडा कार्यालयामध्ये संपर्क साधावा किंवा https://www.mahaurja.com/meda/en/cont… वरती संपर्क साधावा.
पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2026 लाभ –
- शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालीलप्रमाणे असणार आहेतः
- शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा पुरवतो.
- शेतकर्यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.
- भूजल अतिरेक तपासणीची क्षमता
- शेतकर्यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.
- शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते.
महाडीबीटी फार्मर स्कीम माहिती
कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता –
- अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
- सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
- अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
- सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
- जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.
- प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.
online application 2026 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
कुसुम योजनेचे लाभार्थी –
- शेतकरी
- सहकारी संस्था
- शेतकर्यांचा गट
- जल ग्राहक संघटना
- शेतकरी उत्पादक संस्था
कुसुम योजना महाराष्ट्र 2026 महत्वाची कागदपत्रे –
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- रेशन कार्ड
- नोंदणी प्रत
- प्राधिकरण पत्र
- जमीन प्रत
- चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
- मोबाइल नंबर
- बँक खाते विवरण
महाराष्ट्र राज्य कृषी GR माहिती
कुसुम योजना अर्ज फी –
या योजनेंतर्गत अर्जदारास सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल. राजस्थान नूतनीकरणयोग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि शुल्क म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील प्रमाणे असेल.
- ०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
- १ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
- १.५ मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
- २ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी
हेल्पलाइन नंबर –
या लेखात आम्ही आपल्याला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती दिली आहे. जर आपणास अजुन हि या योजनेसंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर आपण कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकताआणि तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. त्यासाठी सदर योजनेची ऑफिसियल वेबसाइट https://mnre.gov.in/ आहे , याला अवश्य भेट द्या.
- मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. तर अश्या अनेक बनावट वेबसाइट पासून सतर्क राहा.
- त्यापैकी काही बनावट वेबसाइट्स * .org, * .in, * .com अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana . com आणि इतर अशा अनेक वेबसाइट.
- म्हणूनच पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
कृपया मला 20 एकर शेती आहे पण एकच सर पंप मिळत आहे सदर शेती वेगळ्या गावांमध्ये आहे त्यामुळे वेगवेगळे ठिकाणी जमिनीच्या प्रमाणात सोलर पंप मिळणे बाबत काय करावे लागेल तसेच बोर होईल सोलर पंप खूप कमी पाणी मारतात त्यामुळे शेतीवरील करणे बरोबर शक्य नाही बोरवली सोलर पंप फेल आहेत तसेच सोलर पंप झालेल्या बिघाड तांत्रिक असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो लवकर दुरुस्त करून मिळत नाही माझ्याकडे सनराइज पंप आहे पण सदरील कंपनी महिना महिना दुरुस्त करून देत नाही साधा बिघड असलं तरी बी महिना लागतो ही गंभीर बाब आहे शासनाने याची दखल घेऊन तात्काळ 24 तासाच्या आत दुरुस्ती करून दिल्या बाबत कार्यवाही करावी कारण विलंब लागत असल्यामुळे शेती पिकाचे नुकसान होते