Pik Vima Anudan Yojana Maharashtra 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती आणि या योजनेसंबंधित निघालेले शासनाचे विविध GR यांची माहिती पाहणार आहोत. तसेच सरकारची या योजनेमाघची उद्दिष्टय ,कोणत्या बाबींवर प्रधानमंत्री विमा रक्कम देय असणार? लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता कोणती आहे? कोणते जिल्हे समाविष्ट असणार आहेत ? कोणत्या विमा कंपनीमार्फत विमा रक्कम मिळणार? कोणत्या पिकांसाठी अनुदान देय असणार आहे? शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमाहप्ता आणि विमा संरक्षित रक्कम , pmfby -प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज कसा करायचा ? Latest News pmfby सरसकट पीक विमा महाराष्ट्र या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत.सदर योजनेअंतर्गत खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम २०२०-२१, खरीप हंगाम व रब्बी हंगाम २०२१-२२, खरीप हंगाम व रब्बी हंगाम २०२२-२३ या तीन वर्ष्यांकरिता जोखमस्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना सन 2021-2025 संपूर्ण माहिती
पीक विमा योनजेचे उद्दिष्टय-
- नैसर्गिकआपत्ती जसे कि अतिवृष्टी, दुष्काळ तसेच कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांचे नुकसान होते, म्हणून शासन पीक विमा योजनेच्या साहाय्याने शेतकऱ्याला संरक्षित करणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय आहे.
- पिकांचे नुकसान झालेल्या काळात शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य सुधारण्यासाठी आणि परत शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मदतीचा हात या योजनेअंतर्गत देत असते. तसेच नाविन्यपूर्ण शेती आणि सुधारित तंत्रज्ञान आणि सामुग्री वापरण्यास हि या योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते.
- शेती उत्पादन घेताना येणाऱ्या जोखमींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण आणि कृषी क्षेत्राचा विकास हा या योजनेचा हेतू आहे.
लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता कोणती आहे?
- प्रधानमंत्री पीक विमा या योजना लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ अधिसूचित क्षेत्रासाठी आणि अधिसूचित पिकांसाठीच शेतकऱ्याला घेता येणार आहे.
- याव्यतिरिक कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
फळपीक विमा योजना माहिती २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष्यासाठी
कोणत्या बाबींवर प्रधानमंत्री विमा रक्कम देय असणार?
या योजनेअंतर्गत काही जोखमीच्या बाबींवर विमा रक्कम देय असणार आहे. त्यामध्ये खरीप हंगामाकरिता आणि रब्बी हंगामाकरिता कोणत्या बाबी असणार आहेत ते पाहुयात.
अ. खरीप हंगामाकरिता –
- पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, वादळ, वीज पडणे, चक्रीवादळ, दुष्काळ,पावसातील खंड, कीड किंवा रोग, नैसर्गिक आग, पूर, भुस्खलन, इत्यादी गोष्टींमुळे उत्पादनात येणाऱ्याघटेमुळे होणारे नुकसान
- खरीप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसान
- हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी आणि लागणी न झाल्यामूळे होणारे नुकसान
- नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुले होणारे पिकांचे नुकसान
ब. रब्बी हंगामाकरिता –
- रब्बी हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसान
- पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, वादळ, वीज पडणे, चक्रीवादळ, दुष्काळ,
- पावसातील खंड, कीड किंवा रोग, नैसर्गिक आग, पूर, भुस्खलन, इत्यादी गोष्टींमुळे उत्पादनात येणाऱ्या घटेमुळे होणारे नुकसान
- नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
- नैसर्गिक परिस्थिमुळे काढणीपश्चात पिकाचे होणारे नुकसान
डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना 2022 माहिती
कोणत्या पिकांसाठी अनुदान देय असणार आहे?
अ. खरीप हंगामाकरिता अनुदान देय पिके-
- तृणधान्य व कडधान्य पिके– भात,मूग, मका, उडीद, तूर,नाचणी(रागी), ज्वारी, बाजरी
- गळीत धान्य पिके– सोयाबीन, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, कारळे
- नगदी पिके– कांदा, कापूस
ब. रब्बी हंगामाकरिता अनुदान देय पिके-
- तृणधान्य व कडधान्य पिके– रब्बी ज्वारी (बागायत आणि जिरायत), गहू (बागायत), उन्हाळी भात, हरभरा
- नगदी पिके– रब्बी कांदा
pmfby -प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज pmfby online application maharashtra 2022
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत.
कोणते जिल्हे समाविष्ट असणार आहेत ? कोणत्या विमा कंपनीमार्फत विमा रक्कम मिळणार?
१. सोलापूर, जळगाव,सातारा – भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि.
२. अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर – भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि.
३. परभणी, वर्धा, नागपूर – रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि.
४. जालना, गोंदिया, कोल्हापूर – रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि.
५. यवतमाळ, अमरावती, गडचिरोली – इफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स कं. लि.
६. उस्मानाबाद – बजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं. लि.
७. लातुर – भारतीय कृषी विमा कंपनी
८. नांदेड , ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – इफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स कं . लि.
९. औरंगाबाद,भंडारा, पालघर, रायगड – एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं .लि.
१०. वाशीम , बुलढाणा , सांगली, नंदुरबार – रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं . लि.
११. हिंगोली, अकोला, धुळे, पुणे – एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं .लि.
१२. बीड – निविदा प्रक्रिया सुरूआहे.
पीक नुकसान भरपाई योजना 2022 माहिती शासन निर्णय
शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमाहप्ता आणि विमा संरक्षित रक्कम –
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात सन २०२०-२१ साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर निश्चित केलेल्या पीक कर्जदाराप्रमाणे विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे जिल्हांतर्गत पीक निहाय पीक कर्जामध्ये तफावत असून, राज्य पीक कर्ज दर समितीच्या दरांपेक्षा काही जिल्ह्यामध्ये जास्त दराने पीक कर्जास आली आहे. ज्या जिल्ह्यात राज्य पीक कर्जदर समितीने निश्चित केलेल्या कर्जदारापेक्ष्या ज्यादा दर निश्चित केलेला आहे, त्या जिल्ह्यांचे पीक कर्जदाराचे पुनर्विलोकन करण्यात आलेले आहे. असे सदर पंतप्रधान पीक विमा योजना शासन निर्णय मध्ये नमूद केले गेलेले आहे.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023
- Krushi Seva Kendra Licence Maharashtra Application संपूर्ण माहिती
- E Shram Card Ka Paisa Kaise Check Kare ? जानिए स्टेप बाइ स्टेप
- ३९ कोटी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना निधी वितरित
- शासन आपल्या दारी योजना 2023 संपूर्ण माहिती । Shasan Aplya Dari Yojana Registration