Sarkari Jamin Mojani Maharashtra Mahiti : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये सरकारी जमीन मोजणी कशी आणायची हे या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून केली जाणारी सरकारी जमीन मोजणी साठी अर्ज, कागदपत्रे, कोणत्या कारणासाठी सरकारी जमीन मोजणी केली जाऊ शकते, त्याची फी किती, अर्ज प्रक्रिया काय, अंमलबजावणी प्रक्रिया, जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर ची प्रक्रिया व इतर सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखांमध्ये राहणार आहोत.

Sarkari Jamin Mojani Maharashtra
शेत जमिनीची सरकारी मोजणी करणे हा जमिनीच्या अनेक वाद विवाद यांवर तोडगा आहे. प्रत्यक्ष जमीन कमी भरणे, वाटणी मध्ये जमिनीच्या सातबारा उतार्यावर असलेल्या उल्लेखा पेक्षा जमीन कमी असणे, शेजाऱ्यांकडून बांध उकरून जमिनीवर अतिक्रमण होणे अशा अनेक कारणांसाठी जमिनीची शासकीय मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालय कडून करणे महत्त्वाचे असते.
सर्वे नंबर/ गट नंबर म्हणजे काय
भारतात संपूर्ण जमिनीची मोजणी ही ब्रिटिश सरकारच्या काळात करण्यात आलेली होती. त्यामध्ये टोपोग्राफिकल सर्वे करून नद्या, डोंगर, -दऱ्या यांची नोंद समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यात आलेली होती.
गावच्या जमिनींची मोजणी करून गावच्या एकूण जमिनीशी जुळवणी केली गेली. गावच्या एकूण जमिनीची विभागणी करून त्यामध्ये शेत रस्ते, नद्या, नाले, रस्ते ,गावठाण जमिनी, गायरान जमिनी यांच्या क्षेत्रांची नोंद केली गेली. तसेच मोजलेल्या प्रत्येक जमिनीला एक क्रमांक सुद्धा दिला गेला. या दिलेल्या क्रमांकाला आपण सर्वे नंबर असं म्हणतो. यासोबतच हलकी जमीन, भारी जमीन अशी प्रतवारी करून सुद्धा तिची नोंदणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण गावच्या जमिनीची सरकारी जमीन मोजणी करून मिळवलेल्या सर्व नोंदीचा उपयोग गावचा नकाशा तयार करण्यासाठी करण्यात आला. या नकाशा मध्ये गावचा शिव, शेत रस्ते, सर्वे नंबर, नद्या-नाले, गावठाण जमिनी, शेत जमिनी इत्यादींचा उल्लेख करण्यात आला आहे.
भू नकाशा महाराष्ट्र: ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा | Land Records
भुमिअभिलेख सरकारी जमीन मोजणी
आजही हे नकाशे भूमिअभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. भुमिअभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या सरकारी जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये याच नकाशाचा उपयोग करण्यात आलेला दिसून येतो. प्रत्यक्ष मोजलेली जमीन या नकाशातील मोजमाप यांच्यासोबत अजून पाहिली जाते, तसेच काही गावांमध्ये जमीन एकत्रीकरण योजना राबवली गेलेली आहे. अशा गावांमध्ये सातबारा उताऱ्यावरील आपल्या सर्वे नंबर ऐवजी गट नंबर चा उल्लेख भूमापन क्रमांकाच्या ठिकाणी दिसून येतो. काही सातबारा उतारा नंबर म्हणून सर्वे नंबर असतो तर काही वरती गट नंबर दिला गेलेला दिसतो.
भुमिअभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या सरकारी जमीन मोजणी ची आवश्यकता काय?
- शेतकऱ्याकडून बांध पोकरून जमिनीवर अतिक्रमण झाल्यामुळे प्रत्यक्षात किती क्षेत्रावर अतिक्रमण केले गेलेले आहे हे निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून सरकारी मोजणी केली जाते.
- जर नवीन जमीन खरेदी करायची असल्यास किंवा विक्री करायची असल्यास त्याचे अचूक क्षेत्र काढण्यासाठी देखील सरकारी मोजणी केली जाते.
- प्रत्यक्ष जमिनीचा ताबा आणि सातबारा उताऱ्यावरील जमिनीचा उल्लेख पडताळून पाहण्यासाठी ही मोजणी केली जाते.
- जर तुमच्या वडलोपार्जित जमिनीचे वारसाने अथवा खरेदी विक्री मुळे भाग पडले गेले असतील, तर अशा वेळी जमीन रेकॉर्ड प्रमाणे जमीन ताब्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मोजणी केली जाऊ शकते.
- जमिनीच्या बांधावर असलेली विहीर, झाडे, घर हे नेमके कुणाच्या जमिनीच्या हद्दीमध्ये येते हे पाहण्यासाठी सर्व हिस्सेदार यांना खातेफोड करून जमिनीचे वाटप करत असताना
- समान जमीन सर्व हिस्सेदार यांना समान जमीन मिळावी यासाठी देखील जमीन मोजणी केली जाते.
- काही कारणास्तव जमिनीचे बांध पुढे किंवा मागे सरकले असतील, तर असे सरकलेले बांध सुव्यवस्थित करण्यासाठी.
- शेतीची जमीन बिगरशेती म्हणून अकृषक म्हणून नोंद करण्यासाठी.
- गावठाण जमीन, गायरान जमीन, गावाची हद्द, स्मशानभूमी, पानंद रस्ते, नदी, नाला इत्यादी सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण झाल्यास देखील सरकारी जमीन मोजणी भुमिअभिलेख कार्यालयाकडून केली जाते.
जमीन मोजणीची फी (Jamin Mojani Fees)किती असणार?
मोजणीचा प्रकार | मोजणीची फी |
साधी मोजणी | १,०००/- रुपये प्रति हेक्टर |
तातडीची मोजणी | २,०००/- रुपये प्रति हेक्टर |
अतितातडीची मोजणी | ३,०००/- रुपये प्रति हेक्टर |
अति अतितातडीची मोजणी | १२,०००/- रुपये प्रति हेक्टर |
सरकारी जमीन मोजणी साठी अर्ज कसा करावा?
जर तुम्हाला सरकारी जमीन मोजणी साठी अर्ज करायचा असेल, तर तूम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी करून देण्यासंबंधित अर्ज सादर करावा लागेल.
महिला कर्ज योजना 2022: Stand-Up India Loan Scheme व्याज दर, पात्रता
सरकारी जमिनी मोजणी साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्या जमिनीचा चालू महिन्यातील सातबारा उतारा
- जमिनीच्या चतु: सीमेचा तलाठी कार्यालयाकडून दिला गेलेला दाखलाजमीन मोजणी ही साधी मोजणी, तातडीची मोजणी किंवा अति तातडीची मोजणी यापैकी जी मोजणी तुम्हाला करावयाची आहे, त्याचा उल्लेख अर्जामध्ये व त्यानुसार मोजणीचे भरलेले बँक चलन.
- जमिनीच्या ज्या बाजूला वाद आहे, त्याबाबत तपशील .
- तसेच तुमच्या ज्या जमिनीची मोजणी करायची आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा
- जमीन मोजणीसाठी अर्ज, जमिनीची हद्द कायम करणे, पोट हिश्श्याची मोजणी, वहिवाटीप्रमाणे क्षेत्र दर्शवणे अथवा अतिक्रमण मोजणी नकाशात दर्शवणे यापैकी ज्या साठी अर्ज करावयाचा आहे ते नमूद करणे.
भुमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी कशा प्रकारे केली जाते?
- अर्जदाराकडून जमीन मोजणी संदर्भाचा अर्ज भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर मोजणी रजिस्टरवर त्याची नोंद करून त्याला एक क्रमांक दिला जातो.
- त्यानंतर त्या जमिनी संदर्भातल्या भूमिअभिलेख कार्यालयात असलेल्या मूळ रेकॉर्ड मधून टिपण काढून त्याचा उतारा संबंधित फाईलला जोडला जातो.
- नंतर संपूर्ण फाईल मोजणी करणाऱ्या भूकर मापकाकडे म्हणजेच सर्वेअर कडे दिली जाते.
- हा भूकर मापक अर्ज करणाऱ्या व्यक्ती सह त्याच्या जमिनीच्या चारही बाजूंनी असणाऱ्या जमिनीच्या मालकांना मोजणीच्या कमीत कमी १५ दिवस अगोदर रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून मोजणीची तारीख कळवतो.
- साधारणपणे जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या कालावधीत तालुक्यातील रेकॉर्ड्स बाबत भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये काम चालते आणि उर्वरित काळात जमीन मोजणीचे काम सर्वेअर मार्फत करण्यात येते.
- मोजणी करण्याच्या दिवशी मोजणीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने चुना, हद्दीच्या खुणा साठी दगड, मजूर, इत्यादी गोष्टी स्वखर्चाने पुरवणे आवश्यक असते.
- आज-काल सर्व जमिनीच्या मोजणी ह्या प्लेन टेबल पद्धतीचा उपयोग करून केल्या जातात. ज्यामध्ये जमिनीची प्रत्यक्ष लांबी, रुंदी किंवा बांधाचे माप न घेता प्लेन टेबल पद्धतीने मोजणी दाराला नकाशा अचूक तयार करता येतो.
- जमीन खालवर असल्यास किंवा ओढ्या नाल्याची असल्यास तिचे आकारमान प्लेन टेबल पद्धतीने अचूक काढले जाते.
कृषी कर्ज मित्र योजना 2022 संपूर्ण मराठी माहिती
सर्वेअर मोजणी कशी करतात?
- जमीन मोजणीसाठी सर्वेअर सर्वात कधी जमिनीची पाहणी करतात आणि वहिवाट कोठे आहे, याबाबतची माहिती अर्जदाराकडून घेतात.
- प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द लक्षात येण्यासाठी खुणा करून ठेवतात.
- त्यानंतर जमिनीमधील किंवा संपूर्ण जमिनीच्या गटा जवळ असलेल्या मुळ मोजणीच्या खुणा म्हणजे सर्व्हे नंबरचा दगड किंवा बांधाचा दगड यांच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबलच्या मदतीने जमिनीची मोजणी करतात.मोजणीच्या दिवशी ज्या शेतकऱ्याने अर्ज केला आहे. तो शेतकरी आणि इतर चारही बाजूचे शेतकरी हजर असणे अपेक्षित असते. मात्र बऱ्याच वेळा जाणून बुजून शेजारचे शेतकरी गैरहजर राहतात.
- विशेषकरून अतिक्रमण संदर्भात मोजणी असेल, तर अशावेळी अतिक्रमण करणारी व्यक्ती हजर रहातच नाही. मोजणीच्या दिवशी एखादी व्यक्ती जर गैरहजर राहिली, तर त्या व्यक्तीच्या गैरहजेरी मध्ये देखील मोजणी करता येते. मात्र मोजणी ज्या दिवशी करण्यात येणार आहे, याबाबतची नोटीस त्या व्यक्तीला दिलेली असणे आणि ही नोटीस संबंधितांकडून स्वीकारण्यास नकार दिलेला असणे गरजेचे आहे.
- या प्लेन टेबल पद्धतीने केल्या गेलेल्या जमीन मोजणी द्वारे आपोआप जमीनीच्या खूणा व नकाशा तयार होत जातो.
- मोजणी संदर्भात मोजणीच्या दिवशी अर्जदार आणि इतर उपस्थित संबंधित लेखी जबाब सुद्धा मोजणी करणाऱ्या सर्वेअर करून घेतला जातो.
- एखाद्या उपस्थितीत व्यक्तीने जबाब देण्यास नकार दिला, तर ‘त्या व्यक्तीने जबाब देण्यास नकार दिला’ असा पंचनामा तयार केला जातो.
- प्लेन टेबल आधारे केलेल्या मोजणीची तुलना मूळ रेकॉर्ड सोबत करुन पाहिली जाते. यामुळे जमिनीची मोजणी झाल्यानंतर हद्दीच्या खुणा न दाखवता तालुक्याच्या ठिकाणी भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जाऊन तिथे असलेल्या मूळ रेकॉर्ड सोबत तुलना करून हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात.
- काही दिवसानंतर प्रत्यक्ष जमिनीच्या हद्दी दाखवल्या जातात. जमीन मोजणीच्या हद्दी दाखविल्या प्रमाणे अर्जदाराने हद्दीची निशानी म्हणून दगड हद्दीच्या खुणा प्रमाणे बसून घेणे आवश्यक असते.
सरकारी जमीन मोजणी नंतरची प्रक्रिया
- सर्वेअर ने जमीन मोजणी करून हद्द दाखवल्यानंतर तालुका भूमी कार्यालयामध्ये मोजणी नकाशा च्या दोन प्रती तयार केल्या जातात.
- या मध्ये मोजणी नकाशा, मोजणीसाठी अर्ज करणाऱ्याचे नाव, तारीख, मोजणी करणाऱ्या सर्वेअर चे नाव, हद्द दाखविल्याचा दिनांक, नकाशा ची दिशा, नकाशा साठी वापरण्यात आलेला अंतराचा स्केल व भूमी अभिलेख कार्यालयातील सही शिक्का अशी महत्त्वाची माहितीची नोंद केली जाते.
- जर वहिवाटीची हद्द आणि मूळ नकाशा रेषेप्रमाणे येणारी हद्द वेगवेगळे असतील, तर अशी वहिवाटीची हद्द ही तुटक रेषांनी (————-)दर्शवली जाते.
- रेकॉर्ड प्रमाणे येणारी हद्द ही सलग रेषेने (_______________) दर्शवली जाते. या दोन्ही रेशांमधील अतिक्रमण क्षेत्र वेगळ्या रंगाने दाखवली जाते.
- मोजणी नकाशावर सुद्धा तुटक रेषांनी (—————) दाखवली जाते. ही वहिवाट हद्द (_____________)असून ही रेकॉर्ड प्रमाणे हद्द आहे व रंगाने दाखवलेले क्षेत्र हे या गटांमधील आहे आणि त्यामध्ये या गटाच्या नंबरच्या जमीन मालकाने अतिक्रमण केले आहे असा स्पष्ट उल्लेख केला जातो.
- अशा पद्धतीने जमिनीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून अर्जदाराला मोजणी नकाशाची एक प्रत दिली जाते.
- अर्ज बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती
- राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र
- पीएम वाणी योजना २०२२ रजिस्ट्रेशन: फ्री वाय फाय स्कीम
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2022
- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना २०२१ माहिती