PM PRANAM YOJANA: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री प्रणाम योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही योजना काय आहे, ही का राबवली जाते, याचे फायदे कोणते, कोणी सुरू केली, याची प्रमुख उद्दिष्ट कोणते, त्याचप्रमाणे अंमलबजावणी कशी केली जाणार आहे, एकूण खर्च किती अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर या योजनेसंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला असायला हवी. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
PM PRANAM YOJANA 2025
पीएम प्रणाम योजना म्हणजेच त्याचा फुल फॉर्म हा प्रमोशन ऑफ अल्टरनेटिव्ह न्यूट्रियंट्स फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट स्कीम. प्रधानमंत्री प्रणाम योजना केंद्र सरकारने आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी नव्याने सुरू केलेली एक योजना आहे. ज्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केलेली होती. मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री प्रणाम योजनेला मंजुरी दिलेली आहे.
PM PRANAM YOJANA HIGHLIGHTS
योजना | PM PRANAM YOJANA 2025 |
सुरू केली | केंद्र सरकारने |
फुल फॉर्म | प्रमोशन ऑफ अल्टरनेटिव्ह न्यूट्रियंट्स फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट स्कीम (PRANAM) |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
लाभ | शेतकऱ्यांना युरिया अनुदान |
विभाग | डिपार्टमेंट ऑफ फर्टीलायझर |
सुरू केलेलं वर्ष | 2023 |
योजना कधीपर्यंत चालणार | मार्च 2025 पर्यंत |
Official Website | https://www.fert.nic.in/ |
Pranam Yojana PDF | View |
पीएम प्रणाम योजनेची गरज काय? Need of Pranam Yojana
सध्या शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर काही प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळे शेतीच्या टिकावूपणाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना युरिया, डीएपी, एमओपी आणि एनपीके अशी चार महत्त्वाची खते आहेत. ह्या खतांची मागणी झपाट्याने वाढली आहे. 2017-18 मध्ये 528.86 लाख मेट्रिक टन वरून 2021-22 मध्ये 640.27 लाख मेट्रिक टन (LMT) पर्यंत खतांचा तीव्र वापर झाला. हा डेटा ऑगस्ट 2022 मध्ये संसदेत सादर करण्यात आला होता. त्यामुळे या रासायनिक खतांचा जलद वापर कमी करण्याची आणि पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्याची तीव्र गरज आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र : Registration Form PDF संपूर्ण माहिती
योजनेचे उद्दिष्ट काय?
- या योजनेचे उद्दिष्ट पर्यायी खतांचा वापरास प्रोत्साहन देणे आणि जे रासायनिक खत आहेत त्यांचा वापर कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या योजनेअंतर्गत 3.68 लाख कोटी खर्चाचे वाटप मार्च 2025 पर्यंत देशातील वेगवेगळ्या राज्यांना सबसिडी म्हणून देण्यात येणार आहे.
- संतुलित खत वापरास प्रोत्साहन देणे.
- देशामध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे.
- युरिया मुळे होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानाची माहिती देणे.
- रासायनिक खता व्यतिरिक्त जे पर्यायी खते आहेत त्यांच्या वापराला प्रोत्साहन देणे.
रसायनी आणि खते मंत्रालयाचे उपक्रम
मंत्रालयाच्या प्रस्तावांतर्गत जे शेतकरी रासायनिक खतांवर अवलंबून आहेत, त्यांचा हा जो रासायनिक खतांचा वापर आहे तो कमी करणे. हे या योजनेचे आणि रसायने आणि खते मंत्रालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सेंद्रिय खते आणि जी हिरवळीची खते आहेत त्यांच्यावर भर देऊन शेतकऱ्यांमध्ये संतुलित खत वापराला प्रोत्साहन देणे यासाठी कृषी विभाग जनजागृती कार्यक्रम देखील सुरू केले जाणार आहेत.
प्रधानमंत्री प्रणाम योजनेची वैशिष्ट्य
- शेतकऱ्यांकडून रासायनिक व सेंद्रिय खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देणे.
- शेतजमीन आणि मानवी आरोग्य यांच्यावर लक्ष केंद्रित करताना कृषी उत्पादकता वाढवणे.
- जमिनीची सुपीकता वाढवणे आणि जमिनीत पोषण पुनरसंचित करणे.
- नैसर्गिक सेंद्रिय शेती पर्यायी खते ज्ञानू खते आणि जैव खते यांना प्रोत्साहन देणे.
- खतांवरील अनुदानाचा वापर इतर ग्रामीण उपक्रमांमध्ये करणे.
PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म
योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया काय?
- या योजनेसाठी स्वतंत्र निधीची कोणतीही तरतूद केली गेलेली नाही. सन 2025 पर्यंतचा एकूण खर्च 3.68 लाख कोटी एवढा असणार आहे. जो अनुदानाअंतर्गत समाविष्ट असणार आहे.
- या योजनेच्या अंमलबजावणी बाबतची अधिक माहिती अद्याप उघड केलेली नाही. त्याचप्रमाणे त्याचे जे अहवाल आहेत त्याच्यानुसार अनुदानाच्या 50% राज्यांना अनुदान प्रदान केले जाणार आहे.
तुम्ही शेतकरी असाल तर अशाच महत्वपूर्ण शेती अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा.
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana