Solar Panel Yojana Maharashtra 2024:
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दिनांक १४.०६.२०१७ आणि १७.०३. २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY)’ सुरु केली होती. कृषी वाहिनी सौर-उर्जीकरणाचे प्रचंड फायदे लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने विविध हितधारकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ह्या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने करण्यासाठी सदर योजनेची पुनर्रचना ही ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० (MSKVY 2.0)’ म्हणून केली. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ च्या अंतर्गत वर्ष २०२५ पर्यंत ३०% कृषी वाहिन्यांचे सौर-उर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट हे ‘मिशन २०२५’ म्हणून निश्चित केले आहे. ह्या योजनेमध्ये ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प जास्त कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५- १० किमी परिघात स्थापित केले जातील. ह्या योजनेमध्ये एकूण ७,००० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीय सौर प्रकल्प स्थापित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
कुसुम सोलर पंप योजना 2024 महाराष्ट्र
कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
- सरकार शेतकर्यांना ६०% अनुदान देईल
- ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
- शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.
या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुसुम सोलर पंप योजना 2024 महाराष्ट्र
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2024
राज्यातील बरेच शेतकरी शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये ते खूप खर्च करतात . त्याचे इंधन खूप महाग आहेत. ही गोष्ट लक्षात घेता , राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 च्या अंतर्गत सुरू केली असून, राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार आहेत.
सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या 95 टक्के अनुदान देते. लाभार्थीद्वारे केवळ 5 टक्के रक्कम खर्च केली जाईल. महाराष्ट्र सौर पंप योजना 2024 च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही. हे सौर पंप मिळूनही पर्यावरण प्रदूषण होणार नाही. नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होणार आहे आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्चहि वाचेल. या दृष्टीने विचार करून राज्य सरकारने हि योजना राबवण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र सौर पंप योजना 2024 मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे. जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल. सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून हि योजना अमलात आणली आहे.
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2024
रूफटॉप सोलर योजना 2024
Solar Panel Yojana Maharashtra 2024
भारताचे माननीय पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी 30/07/2022 रोजी रूफटॉप सोलरसाठी राष्ट्रीय पोर्टल लाँच केले. केंद्रीय ऊर्जा आणि NRE मंत्री श्री आर.के. सिंह आणि ऊर्जा आणि अवजड उद्योग राज्यमंत्री श्री कृष्ण पाल गुर्जर उपस्थित होते. उर्जा मंत्रालयाने ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर पॉवर प्लांट योजनेअंतर्गत अनुदान दुप्पट केले आहे.
नवीन सबसिडी: 35,000 रुपयांऐवजी 17,000 रुपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जाणार आहे.
ही योजना तुमच्या सोलर प्लांटमधून निर्माण होणारी वीज थेट UPCL च्या ग्रीडमध्ये पोहोचवण्याची संधी प्रदान करते. UPCL 4.25 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करते आणि यामुळे तुमचे घरातील वीज बिल कमी होते. एक किलोवॅट प्रकल्पाची किंमत अंदाजे 55,000 रुपये आहे, त्यापैकी 35,000 रुपये अनुदान म्हणून दिले जातील. एक किलोवॅट एका वर्षात सुमारे 1200-1400 युनिट वीज तयार करते. ही योजना तुम्हाला वीज खर्च कमी करण्यास आणि प्रदूषण कमी करण्यास देखील मदत करू शकते.
या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पीएम सूर्या घर योजना 2024 | PM Surya Ghar Yojana
ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील घरांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ देशातील एक कोटी कुटुंबांना होणार आहे. आणि सरकारची यामुळे प्रतिवर्षी वीज खर्चामध्ये 75 कोटींची बचत होणार आहे. त्यामुळे या योजनेचा हातभार शासनाला देखील लागणार आहे.
PM Surya Ghar Yojana 2024 के तहत अब हर घर को मुफ्त बिजली मिलेगी
पीएम सूर्या घर योजनेचे फायदे कोणते?
- या योजनेअंतर्गत सबसिडी सौर पॅनलच्या किमतीच्या 40% पर्यंत कव्हर करणार आहे.
- त्याचप्रमाणे या योजनेमध्ये घरांसाठी मोफत वीज दिली जाणार आहे.
- यामुळे सरकारचा वीज खर्चामध्ये बचत होणार आहे
- या योजनेअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
- अक्षय ऊर्जेच्या वाढीव वापरास या योजनेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना