Vairan Vikas Yojana 2026: मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत येणारी एक महत्वाची योजना समजून घेणार आहोत. या योजनेचं नाव आहे जिल्हा वार्षिक योजना – वैरण विकास योजना (चारा उत्पादन कार्यक्रम).
Vairan Vikas Yojana Apply Online: राज्यस्तरीय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत येणारी वैरण विकास योजना (चारा उत्पादन कार्यक्रम) 2026 ही शेतकरी आणि पशुपालकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे. ही योजना खास करून त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पशुधन आहे आणि त्यांना चारा उत्पादनासाठी मदत हवी आहे. .
या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की
- तुम्हाला चारा उत्पादनासाठी किती अनुदान मिळणार,
- कोण अर्ज करू शकतो,
- लाभार्थी निवड कशी होते,
- पात्रता आणि निकष काय आहेत,
- किती क्षेत्रासाठी लाभ मिळतो,
- कोणती कागदपत्रे लागतात,
- अर्ज प्रक्रिया कशी आहे,
- आणि अटी व शर्ती काय आहेत.
— ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत.
योजना काय आहे? (चारा उत्पादन कार्यक्रम)
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चारा (वैरण) उत्पादनासाठी बियाणे किंवा ठोंबे (cuttings) दिले जातात. म्हणजेच सरकार तुमच्या शेतात चारा उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते.
लाभाचे स्वरूप
- चारा बियाणे किंवा ठोंब्यांचा पुरवठा केला जातो
- यामुळे शेतकरी स्वतःच्या शेतात चारा तयार करू शकतात
- पशुधनासाठी कायमस्वरूपी चाऱ्याची सोय होते
लाभार्थी कोण असू शकतात?
या योजनेचा लाभ खालील लोक घेऊ शकतात:
- सर्व प्रकारचे शेतकरी
- शेतकरी समूह गट (Farmer Groups)
लाभार्थी निकष
वैयक्तिक शेतकऱ्यासाठी:
- १ हेक्टर क्षेत्रात चारा उत्पादन घेणे आवश्यक
इतर:
- वनहक्क धारक (Forest Right Holder)
- नोंदणीकृत शेतकरी समूह गट
पात्रता काय आहे?
अ) वैयक्तिक शेतकरी:
- स्वतःची जमीन असणे आवश्यक
- सिंचन सुविधा (पाणी व्यवस्था) असणे गरजेचे
- किमान ३ ते ४ पशुधन असणे आवश्यक
आ) शेतकरी समूह गट:
- गट नोंदणीकृत असावा
Mini Tractor 90% Subsidy Apply संपूर्ण माहिती
अनुदान किती मिळणार?
१) वैयक्तिक लाभार्थी:
- १००% अनुदान
- १ हेक्टरसाठी ₹४,००० पर्यंत
२) शेतकरी समूह गट:
- ५ हेक्टर पर्यंत मर्यादा
- ₹२०,००० पर्यंत अनुदान
आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतील:
- ७/१२ उतारा (स्वतःच्या नावाचा)
- वनहक्क धारक असल्यास:
- ७/१२ वर “इतर अधिकार” नोंद
- किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे अनुसूची “जे” प्रमाणपत्र
- किमान ३ ते ४ पशुधन असण्याचा पुरावा
- शेतकरी समूह गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र
अटी व शर्ती (महत्वाच्या गोष्टी)
१) बियाणे किंवा ठोंबे कुठून घेतले जातील?
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ
- राज्य बियाणे महामंडळ
- इतर शासकीय संस्था
- कृषि विद्यापीठ
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
- महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास मंडळ
२) कागदपत्रे सादर करण्याची वेळ:
- निवड झाल्यानंतर १ महिन्याच्या आत सर्व कागदपत्रे तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडे द्यावी लागतील
Poultry Farming Business Subsidy Apply Online: ₹22.5 लाख अनुदान कुक्कुटपालन पशुधन उद्योजकता योजना
३) वेळेत कागदपत्रे दिली नाहीत तर काय?
- तुमचं नाव प्रतीक्षा यादीत शेवटी टाकलं जाईल
- पुढच्या लाभार्थ्याला संधी दिली जाईल
४) बियाणे/ठोंबे मागणी प्रक्रिया:
- जिल्हा उपयुक्त (पशुसंवर्धन) हे पात्र लाभार्थ्यांच्या संख्येनुसार संबंधित संस्थांकडे मागणी नोंदवतील
५) पैसे कोण देणार?
- बियाणे किंवा ठोंबे खरेदीची पूर्ण रक्कम सरकार (जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन) थेट पुरवठादार संस्थेला देईल
चारा उत्पादन 100% अनुदान GR PDF
Vairan Vikas Yojana 2026 अर्ज कसा करावा? Subsidy Scheme Maharashtra – Apply Online
१) सदर योजनासाठी लाभार्थी निवडताना जिल्हानिहाय सर्वसाधारण/अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
२) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत.
३) प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
Dairy Farming Business Subsidy Apply Online: ₹8.5 लाख अनुदान दुधाळ गाय / म्हैस पालन पशुधन योजना
४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, अशा लाभार्थ्यांना प्रतीक्षाधीन ठेवले जाणार आहे.
५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविले जाणार आहेत. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
६) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन क्लस्टर निश्चित केले जाणार आहे.
ही योजना पशुपालक शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. कारण:
- चारा उत्पादनासाठी थेट मदत मिळते
- १००% अनुदान मिळते
- पशुधनासाठी कायमस्वरूपी चाऱ्याची सोय होते
जर तुमच्याकडे ३-४ जनावरे असतील आणि शेतीसोबत पशुपालन करत असाल, तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी उपयोगाची आहे.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
