नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे पीकाचे नियोजन कसे करायचे याची कांदा पिकासाठी खत आणि फवारणी व्यवस्थापन माहिती पाहणार आहोत. पिकाचे नियोजन म्हणजे पिकासाठी कोणती खते कधी व कोणत्या दिवशी कोणती खते टाकावीत तसेच कोणते औषध कोणत्या दिवशी फवारावे म्हणजे कांद्याचे उत्पन्न भरगोस येईल आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा घेता येईल. चला तर मग मित्रानो ,पाहुयात कांद्याचे नियोजन कसे करायचे . हे नियोजन आपण दोन भागांमध्ये विभागणारी आहोत त्यामध्ये ड्रीपने खते टाकण्याचे वेळापत्रक आणि कोणती फवारणी कधी करायची याची पूर्ण माहिती पाहू आणि हे टेस्टेड वेळापत्रक आहेत त्यामुळेच नक्कीच तुम्हाला अश्या पद्धतीने कांद्याचे नियोजन केले तर अधिक फायदा घेता येईल.
प्रति एकर ड्रीपच्या खतांचे वेळापत्रक –
- कांद्याची लागवड केल्यानंतर पाच दिवस कांद्याला कोणतेही खात देयचे नाही , सहाव्या दिवशी प्रति एकर नोव्हाटेक N -२१ ( २ किलो )आणि ह्युमीस्टार WG / SL (२०० ग्राम / १ लिटर )आणि इनटेक (२०० मिली) एवढे खत प्रति एकर कांद्याला ड्रीपने द्यावे.
- हे खत टाकल्यानंतर लागवडीच्या २० व्या दिवशी नोव्हाटेक १४:४८ (२.५० किलो प्रति एकर ) हे खत ड्रीपद्वारे कांदयाला द्यावे.
- त्यानंतर लागवडीच्या ३० व्या दिवशी नोव्हाटेक १४:४८ (२.५० किलो प्रति एकर ) हे खत परत एकदा कांदयाला द्यावे.
- हायड्रोस्पीड CaB (२.५० किलो प्रति एकर ) हे ३५ व्या दिवशी कांद्याला द्यावे.
- ४५ व्या दिवशी न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६/नोव्हाटेक १४:८:३० (२.५० किलो प्रति एकर ) ड्रीपने कांदयाला द्यावे.
- ५० व्या दिवशी हायड्रोस्पीड CaB (२.५० किलो प्रति एकर ) हे कांद्याला द्यावे.
- ६० व्या दिवशी न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६/नोव्हाटेक १४:८:३० (२.५० किलो प्रति एकर ) ड्रीपने कांदयाला द्यावे.
- ७० व्या दिवशी न्यूट्रिकॉम्प्लेक्स गोल्ड ०:९:४६/नोव्हाटेक १४:८:३० (२.५० किलो प्रति एकर ) ड्रीपने कांदयाला द्यावे.
हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती
वरील प्रमाणे कांदयाचे खत व्यवस्थापन करावे. बऱ्याच वेळा असे होते कि शेतकरी एखाद्या पिकाची लागवड करतो, पण त्याला कोणते खत कधी टाकायचे हेच समजत नाही. मग तो खत दुकानदाराकडे जातो आणि तो देईल ते खते घेतो, पण शेतकऱ्याला गरज आहे ती शेतीत स्वतः साक्षर होण्याची आणि स्वतःच्या मनाने हि औषधे घेण्याची. वरील दिलेली खते वेळापत्रक हे पूर्णपणे टेस्टेड आहेत. तुम्ही एक वेळा वापर करून पहा, उत्पन्न नक्कीच जास्त निघेल.काही खत विक्रते तुम्ही सांगितलेली औषधे न देता स्वतः सांगतील हे चांगले आहेत हे घ्या पण ते त्यांचा लाभ त्यामध्ये पाहणार असतात, हे मित्रांनो लक्ष्यात ठेवा.
सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे.
कांद्याच्या फवारणीचे वेळापत्रक –
- 1. बासफोलिअर अल्गी/ बासफोलिअर केल्प + बासफोलिअर झिंक +फेट्रिलॉन कॉम्बी-२ या खत औषधाची ( २.५ मिली + ०.५० ग्रॅम + ०.५० ग्रॅम (प्रति लिटर पाण्यात)) लागवडीनंतर २० व्या दिवशी फवारणीद्वारे द्यावे.
- 2. बासफोलिअर झिंक + बासफोलिअर कव्हर + फिलग्रीन २०० हि औषधे (०.५० ग्रॅम + २ मिली + २ मिली (प्रति लिटर पाण्यात )) २५व्या दिवशी फवारणी द्वारे द्यावे.
- 3. ट्रॅफॉस Cu + इनटेक (२.५ मिली + २मिली (प्रति लिटर पाण्यात )) ३० व्या दिवशी फवारणी द्वारे कांद्याला द्यावे.
- 4. फिलग्रीन २०० + बासफोलिअर कव्हर + बासफोलिअर बोरो (२मिली + २मिली + ०.५० मिली (प्रति लिटर पाण्यात)) ३५ व्या दिवशी फवारावे.
- 5. बासफोलिअर कोलर/ ऑमिफॉल K + बासफोलिअर झिंक + इनटेक (२.५ ग्रॅम / २.५ मिली + ०.५० ग्रॅम + २ मिली (प्रति लिटर पाण्यात)) ४५ व्या दिवशी कांद्याला फवारावे.
- 6. बासफोलिअर कोलर / ऑमिफॉल K + ट्रॅफॉस Cu (२.५ ग्रॅम / २.५ मिली + २.५ मिली (प्रति लिटर पाण्यात)) ५० व्या दिवशी कांद्याला फवारावे.
रब्बी हंगाम कांदा व्यवस्थापन कसे करायचे ?
रब्बी हंगाम कांदा व्यवस्थापन तंत्रज्ञान ,सेंदीय खताचा मुबलक वापर , रासायनिक खताचा नियंत्रित वापर , पाणी व्यवस्थापन इत्यादी ची माहिती आपण पाहणार आहोत .
https://www.youtube.com/watch?v=9s_oeakmVFA&t=68s
अश्या प्रकारे कांद्याच्या खताचे आणि फवारणीचे व्यवस्थापन करावे. कोणत्या दिवशी कोणते खत टाकावे आणि कोणती फवारणी कोणत्या दिवशी करावी लक्ष्यात राहत नसल्यास आपल्या कॅलेंडरवर त्याची नोंद करून ठेववि कोणत्या दिवशी कोणते खत टाकले आणि फवारले. अश्या रीतीने कांद्याचे वेळापत्रक अधिक चांगल्या रीतीने लक्ष्यात ठेवता येईल. अश्या पद्धतीने व्यवस्थापन करा आणि नक्कीच कांद्याचे भरगोस उत्पन्न मिळेल . आणि कोणत्या पिकाचे व्यवस्थान तुम्हला पाहिजे आहे ते कंमेंट द्वारे नक्की आमच्यापर्यंत पोहचावा ,आम्ही तुमच्यासाठी नक्की त्याची माहिती देऊ.