अर्ज बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती

शेतीसाठी मुख्य गोष्ट म्हणजे पाणी ,जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती  योजना अनुसूचित जमातीच्ग्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे . या योजनेमुळे कोरडवाहू  शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार आहे . पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे पाणी स्वतःच्या शेतात करायला मदत मिळणार आहे . या योजनेद्वारे राज्य सरकारने कृषी सिंचनाला प्राधान्य दिले आहे आणि कमी पाण्याच्या शेताला जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित केले आहे . 

Contents hide
5 वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे वेगवेगळी असणार आहेत त्यासाठी खालील लेख वाचावा.

महाडीबीटी शेतकरी योजना 2022 अर्ज सुरु –

मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घेयचा असेल,तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर ,कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा या प्रश्नाच्या उत्तरे आम्ही आज तुम्हला देणार आहोत. त्यासाठी लवकरच रेजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या. रजिस्ट्रेशन पासून ते अर्ज भरून पेमेंट पर्यंतची सर्व माहिती पाहण्यासाठी खालील विडिओ नक्की पहा. आणि अर्ज करून योजनांचा लाभ नक्की घ्या.

महाडीबीटी लॉटरी मध्ये नाव आहे का नाही कसे पाहायचे?

जर तुम्ही २०२०-२१ साठी महाडीबीटीवर अर्ज केलेला होता, लॉटरीत नाव आले का नाही, पूर्वसंमती मिळाली का नाही ते कसे बघायचे, ते असे पाहायचे आणि कागदपत्रे कधी अपलोड करायची अशे प्रश्न तुम्हला नक्कीच पडले असतील, त्यासाठी खालील विडिओ पहा.

नाव लॉटरीत आले आहे, कागपत्रे कशी अपलोड करायची?

मित्रांनो, जर तुम्ही महाडीबीटीवर शेतकरी योजनांसाठी अर्ज केलेला असेल, त्यामुळे तुमचे नाव जर सोडतीमध्ये आले असेल आणि तुम्हला ,महाडीबीटी कडून मॅसेज आला असेल, तर तुम्ही लवकरात लवकर तुमची कागदपत्रे अपलोड करा. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाडीबीटी पोर्टल ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद राहील अशी सूचना आली आहे . कागदपत्रे कशी अपलोड करायची ते पाहण्यासाठी खालील विडिओ पहा.

navin vihir yojana maharashtra

या योजनेअंतर्गत राज्य शासन खालील प्रमाणे कृषी जलसिंचनावर शेतकऱ्याला अनुदान देणार आहे:

 • या योजनेअंतर्गत नवीन विहीर साठी रु. २. ५० लाख एवढे अनुदान देण्यात येईल.
 • इनवेल बोअरींग साठी रु. २० हजार एवढे अनुदान देणार आहे
 • पम्प संचासाठी रु. २० हजार एवढे अनुदान देण्यात येईल.
 • वीज जोडणीसाठी रु १० हजार एवढे अनुदान देण्यात येईल.
 • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी रु. १ लाख व सूक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच रु. ५० हजार किंवा तुषार सिंचन संच रु. २५ हजार ) एवढे अनुदान देण्यात येईल.
 • पीव्हीसी पाईप वर रु. ३० हजार एवढे अनुदान देण्यात येईल.
 • परसबाग यावर रु. ५०० एवढे अनुदान देण्यात येईल.

नोट –

 • बिरसा मुंडा कृषी सिंचन योजना मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.
 • लाभार्थी शेतकरी अनुसूचित जमातीचा असल्यासच अर्ज करावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे –

 • ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यावयाचा हाये त्याच्याकडे जातीचा दाखल असणे बंधनकारक आहे,. तसेच ७/१२ व ८-अ चा उतारा असणे हेसुद्धा आवश्यक आणि बंधनकारक आहे.
 • वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असलेल्या शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • उत्पन्नाचा चालू वर्षाचा दाखल;या सादर करणे शिव बंधनकारक आहे.
 • जमीन ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०. ४० हेक्टर ) असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचं एकदा लाभ घेतल्यास पुढील ५ वर्ष या योजनेचा लाभ त्या लाभार्त्याला किव्हा त्याच्या कुटुंबाला घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.

वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे  वेगवेगळी असणार आहेत त्यासाठी खालील लेख वाचावा. 

नवीन विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे:

१. ७/१२ व ८-अ चा उतारा
२. जातीचा दाखल
३. उत्पन्नाचा दाखला
४. कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
५. ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो विशिष्ट खुणा सहित लाभार्थ्यासह.
६. गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
७. अपंग असल्यास प्रमाणपत्र
७. लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
९. ग्रामसभेचा ठराव
१०. या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
११. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग साठी आवश्यक कागदपत्रे –

१. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
२. जमीन धारणेचा अदयावत ७/१२ दाखला व ८अ उतारा.
३. तलाठ्याकडचा एकूण क्षेत्राचा दाखला (० .२० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर ४. 
असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
४. कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
५. ज्या विहीरीचे काम करून घ्यायचे आहे, त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा 
फोटो विशिष्ट खुणा सहित लाभार्थ्यासह. 
६. अपंग असल्यास प्रमाणपत्र
७. तहसीलदाराकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न दाखला ( रु. १,५०,०००/- पर्यंत ) 
८. किंवा दारिद्रयरेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL 
९. ग्रामसभेचा ठराव.
१०. लाभार्थीचे बंधपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर).
११. गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
१२. इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील report.

शेततळ्यास अस्तरीकरण किंवा जोडणी आकार किंवा सूक्ष्म सिंचनासाठी आवश्यक कागदपत्रे –

१. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
२. तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. १,५०,०००/- पर्यंत ) किंवा दारिद्रय 
३. रेषेखालीअसलेबाबतचे प्रमाणपत्र किंवा BPL कार्ड (लागू असलेस).
४. ७/१२ दाखला व ८-अ उतारा.
५. तलाठी यांचेकडील एकूण क्षेत्राबाबतचा दाखला. (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत असणार आहे ). 
६. शेततळे अस्तरीकरण पुर्ण झाल्याचे हमीपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
७. विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व ८. मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
८. ग्रामसभेची शिफारस किंवा मंजूरी
९. काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो विशिष्ट खुणा सहित लाभार्थ्यासह. 
१०. योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र गरजेचे आहे.

महाडीबीटीवरील सर्व योजनांची संपूर्ण माहिती –

महाडीबीटी अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या सविस्तर माहितीसाठी म्हणजेच अटी,पात्रता ,कागदपत्रे , अनुदान कोणत्या घटकासाठी किती असणार , यांची माहिती तुम्ही खालील योजनांच्या लिंक वर जाऊ शकता आणि पात्र असणाऱ्या संबंधित योजनांची संपूर्ण माहिती घेऊ शकता .
Recent Posts

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.

Leave a Comment

Translate »