निशुल्क गॅस शेगडी कनेक्शन योजना (PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२२ अर्ज

नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री उज्वला या केंद्र सरकारच्या योजनेची माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, लाभ,अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हाला ही या योजनेअंतर्गत गॅस शेगडी कनेक्शन घेयचे असेल, तर हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२२

केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जाहीर केली. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे देशातील सर्व कुटुंबांना सुरक्षित स्वयंपाक इंधन पुरवण्याचे उद्दिष्ट होते. कारण अजूनही ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी असुरक्षित इंधन वापरले जाते. त्याच्या होणाऱ्या धुराच्या त्रासामुळे देशातील गरीब महिलांना डोळ्यांच्या आजारांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे भारत सरकार देशातील एपीएल आणि बीपीएल रेशन कार्ड धारक महिलांना या योजनेअंतर्गत घरगुती एलपीजी गॅस पुरवत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्याअंतर्गत ही योजना राबवली जात आहे.

सन २०२१-२२ अर्थसंकल्पातुन प्रधानमंत्री उज्वला योजनेचा विस्तार केला जाणार आहे. या योजनेत एक कोटी नवीन ग्राहक जोडले जाणार आहेत. जेणेकरून प्रदूषणमुक्त इंधन ग्रामीण भागातील महिलांना मिळेल आणि त्यांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळले जातील.

ujjawala yojana official website apply online 2021

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय?

 • या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे देशातील गरीब स्त्रियांना अशुद्ध इंधन सोडून स्वच्छ एलपीजी इंधनाला प्रोत्साहन देणे आणि गरीब महिलांच्या आरोग्यावर धुरामुळे होणारे परिणाम यांपासून त्यांचे रक्षण करणे हे आहे.
 • तसेच यामुळे पर्यावरणाला दूषित होण्यापासून देखील वाचवले जाईल.
 • देशातील गरीब कुटुंबातील महिलांना लाकूड एकत्र करून त्या लाकडांवर रोजचे अन्न शिजवावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात लाकूड ओले असल्यामुळे त्या महिलांना अन्न शिजवताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच त्या लाकडांपासून होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अमलात आणली गेली आहे.
 •  या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅस च्या वापरामुळे महिलांचे आणि लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येईल आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देखील देण्यात येईल. या सर्व उद्दिष्टांचा विचार करून प्रधानमंत्री उज्वला योजना देशात राबवली जात आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी कोण?

 • मागासवर्गीय कुटुंब बेटावर राहणारे लोक
 • चहाची लागवड करणारी टोळी
 • दारिद्र रेषेखालील आणि लोकअंत्योदय योजनेत समाविष्ट असणारे लोक
 • प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबातील लोक
 • वनवासी

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे (PMUY) लाभ कोणते?

 • या योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखाली येणाऱ्या महिलांना म्हणजेच एपीएल आणि बीपीएल शिधापत्रिका असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
 • एका महिन्यात एक मोफत सिलेंडर देण्यात येईल. पहिल्या-दुसऱ्या हप्त्याची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जाईल. त्यानंतर तिसरा हप्ता दिला जाईल. दुसऱ्या सिलेंडर रिफीलमध्ये पंधरा दिवसांचे अंतर असावे ही अट आहे.
 • एक एप्रिलपासून मोफत गॅस सिलेंडर पहिल्या हप्त्याची रक्कम पाठवणे सुरू केलेले आहे.

PMUY कनेक्शनसाठी रोख मदत भारत सरकारद्वारे प्रदान केली जाते – १४.२ किलो सिलेंडरसाठी १,६०० रुपये / ५ किलो सिलेंडरसाठी १,१५० रुपये.ही रक्कम घरातील महिलांच्या खात्यात जमा केली जाईल. या रोख सहाय्यामध्ये खालील घटक समाविष्ट आहेत –

 • सिलिंडरसाठी सिक्युरिटी डिपॉझिट – १४.२ किलो सिलेंडरसाठी १,२५०/- रुपये, ५ किलो सिलेंडरसाठी ८००/- रुपये.
 • प्रेशर रेग्युलेटर – १५०/- रु
 • एलपीजी नळी – १००/- रु
 • याव्यतिरिक्त, PMUY लाभार्थ्यांना व्याजमुक्त कर्जाची सुविधा देखील तेल विपणन कंपन्या (OMCs) द्वारे प्रदान केली जाते. या कर्जामध्ये एलपीजी स्टोव्हचे शुल्क (१ बर्नर स्टोव्हसाठी ५६५/- रुपये, २ बर्नर स्टोव्हसाठी ९९०/- रुपये) आणि कनेक्शनच्या वेळी मिळालेल्या पहिल्या एलपीजी सिलेंडरची रिफिल किंमत समाविष्ट आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) अटी आणि पात्रता काय?

 • या योजनेअंतर्गत लाभ मिळवू इच्छिणाऱ्या कुटुंबातील महिलांचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
 • अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला असणे आणि ती दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
 • अर्ज केलेल्या महिलेकडे आधीपासूनच एलपीजी गॅस कनेक्शन असू नये, असल्यास त्या अर्जदार महिलेला लाभ मिळणार नाही.

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?

 • जात प्रमाणपत्र
 • बीपीएल एपीएल प्रमाणपत्र
 • आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
 • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक
 • बँक पासबुक आणि आईएफएससी कोड
 • निवासी प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
 • अर्जदाराच्या स्वाक्षरीसह घोषणा पत्र
 • उज्ज्वला कनेक्शनसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे (आसाम आणि मेघालयसाठी अनिवार्य नाही).

PMUY इम्पॉर्टन्ट लिंक्स –

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी पात्र आणि इच्छुक अर्जदार महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी. जसे की आधार कार्ड, नाव, पत्ता, मोबाईल नंबर, इत्यादी माहिती व्यवस्थितरित्या भरावी. त्यानंतर वरील आवश्यक कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावीत आणि तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे तो अर्ज कागदपत्रांसहित जमा करावा. तुमचा अर्ज आणि गॅस एजन्सी अधिकाऱ्याने सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचे गॅस कनेक्शन दहा ते पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला मिळेल.

प्रधानमंत्री उज्वला योजना संपर्क कुठे करायचा?

आम्ही अधिकाधिक माहिती तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील, तर त्यांचे निरसन करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता आणि तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

 • एलपीजी हेल्पलाईन नंबर – १९०६
 • टोलफ्री हेल्पलाईन नंबर – १८००-२३३३-५५५५
 • उज्ज्वला हेल्पलाईन नंबर – १८००-२६६-६९६

Leave a Comment

Your email address will not be published.