नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो आपण त्यामध्ये पीक नुकसान भरपाई योजनेची उद्दिष्ट्ये, फायदे, पात्रता, लाभ, शासन निर्णय सन च्या महाराष्ट्र सरकार योजनेविषयीची सर्व माहिती माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना पिकाच्या नुकसानापासून होणाऱ्या आर्थिक संकटांपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजना साली अमलात आणली.
पीक विमा योजना उद्दिष्ट्य-
केंद्र सरकारने पीक विमा योजना घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा प्रदान केला आहे. जेणेकरून पूर , दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तरी त्यांना त्याची चिंता करण्याची गरज भासणार नाही. पीक विमा नुकसान भरपाईच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱयांना आर्थिक स्थेर्य मिळत आहे, जेणेकरून काही नौसर्गिक दुर्घटनामुळे त्यांची पिके नष्ट झाल्यास त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा नव्याने शेतीची मशागत करण्यासाठी पुरेसा निधी मिळेल.ही योजना शेतकर्यांच्या आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने सर्वात मोठी दिलासा देणारी योजना असल्याचे सिद्ध होईल
पीक विमा योजनेचे फायदे-
आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केल्यानुसार पीक नुकसान भरपाईचे बरेच फायदे आहेत. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱयांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रोत्साहनामुळेच , शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना जीवनाविषयी कोणतेही चुकीचे निर्णय घेता येणार नाही. आणि आत्महत्येचे प्रमाणदेखील कमी होईल.
PMFBY-खरीप आणि रब्बी हंगाम पीक विमा २०२०-२१ पासून ३ वर्ष्यांसाठी माहिती
पिक विमा नुकसान भरपाई पात्रता निकष-
या योजनेस पात्र होण्यासाठी आपण खाली दिलेल्या पात्रतेच्या निकषांचे अनुसरण करणे आवश्यक आहे: –
- अर्जदार हा भारताचा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजनेसाठी वयोमर्यादा आवश्यक नाही.
- अर्जदार दारिद्र्य रेषेखालील गटातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे जास्तीत जास्त उत्पन्न शेतीतून असणे आवश्यक आहे.
पिक विमा मंजूर यादी
पिक विमा नुकसान भरपाई आवश्यक कागदपत्रे –
जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्हला विमा योजनेसाठी अर्ज करत असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: –
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- किसान बँक पासबुक
- बँकेचा तपशील
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जमीन कागदपत्रे ७/१२ उतारा, ८-अ प्रमाणपत्र
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
पिक विमा नुकसान भरपाई संपर्काची माहिती-
एम.एस. सेंट्रल बिल्डिंग 3 मजला, पुणे 411 001
कृषी विभाग: 1800-2334000
किसान कॉल सेंटर: 1800-1801551
ईमेल commagricell@gmail.com