नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजनेची माहिती आणि शासन निर्णय नवीन आर्थिक वर्ष्याच्या gr पाहणार आहोत. मित्रांनो जर तुमच्याकडे फळबाग शेती असेल तर , तुम्ही हे आर्टिकल संपूर्ण वाचा तुम्हला नक्कीच हे माहितीपूर्ण राहील. चला तर मग मित्रांनो पाहुयात कोणत्या फळपिकांसाठी आहे हि योजना, किती क्षेत्रांपर्यंत विमा काढता येईल, फळपीक विमासाठी कोणत्या अटी लागू असणार आहेत, किती रक्कम संरक्षित असेल, प्रति हेक्टरी किती विमा हप्ता भरावा लागेल, विमा हप्ता भरण्याच्या कधी आणि कुठे भरायचा आणि शासनाच्या gr ची माहिती पाहणार आहोत.
कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख समावेश आहे. बदलत्या हवामानच्या धोक्यांमुळे फळपीकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होवुन उत्पादनात घट येते आणि शेतकऱ्यांना नुकसान स्वीकारावे लागेते . त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून राज्य शासनामार्फत पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना शासनमार्फत राबविण्यात येते.
कोणत्या घटकांचा विचार करून फळपीक विमा नुकसान भरपाई दिली जातो?
हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग,आर्द्रता इ . माहिती स्वयंचलित रित्या नोंदवली जाते. या माहिती च्या आधारे अवेळी पाउस, कमी जास्त तापमान, वारा वेग त्याच प्रमाणे गारपीट या हवामान धोक्यां पासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी यांना फळपिकांसाठी विमा संरक्षण मिळते. सदर हवामान धोके लागू झाल्यानंतर विमा धारक शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते.

फळपीक विमा योजनेची प्रमुख उद्दीष्ट कोणती?
१. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे.
२. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण देणे.
३. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थेर्य अबाधित राखण्यास मदत करणे.
४. कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राचा विकास आणि गतिमान स्पर्धेतत्मक वाढ , पिकांचे विविधिकरण हे हेतू साधता येतील.
कोणत्या फळपिकांसाठी विमा योजना लागू असणार ?
प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळपीक योजना सन २०२०-२१ पासून ते २०२२२-२३ या ३ वर्सढ्यांसाठी असणार आहे .त्यामध्ये मृग बहारसाठी संत्रा,मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू व लिंबू ही ६ फळपिकांसाठी १८ जिल्यांमध्ये तर,अंबिया बहारसाठी संत्रा मोसंबी, डाळिंब, काजू, आंबा, केळी, द्राक्षे व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी या ८ फळपीकांचा २३ जिल्यांमध्ये समावेश करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
PMFBY-खरीप आणि रब्बी हंगाम पीक विमा २०२०-२१ पासून ३ वर्ष्यांसाठी माहिती
फळपीक विमा योजनेला अर्ज करण्यासाठी लागू असणाऱ्या अटी कोणत्या?
किती क्षेत्र मर्यादेपर्यंत कोणत्या फळपिकासाठी किती वर्ष्याच्या विमा असेल हा विचार करत असाल, तर फळपीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त ४ हेक्टर पर्यन्त विमा नोंदणी करता येणार आहे.
आणि एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारा पैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा अर्ज करता येईल.
विमा अर्ज करण्यासाठी फळबागांचे वय खालीलप्रमाणे असले तरच अर्ज करता येणार आहे.
- आंबा काजू चिकू- ५ वर्ष
- संत्रा मोसंबी पेरू- ३ वर्ष.
- लिंबू-४वर्ष
- द्राक्षे डाळिंब-२ वर्ष
यापेक्षा कमी वय असणाऱ्या बागांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद अर्ज करण्यापूर्वी घ्यावी.
फळपीक विमा भरण्याच्या शेवटची तारिख किती?
मृग बहार-
- मोसंबी, चिकू- ३०जुन
- डाळिंब- १४ जुलै
- संत्रा, पेरू, लिंबू- २० जुन २०२० ( २०२१आणि २०२२ साठी १४ जुन)
अंबिया बहार-
- स्ट्रॉबेरी- १४ ऑक्टोबर
- द्राक्षे- १५ ऑक्टोबर
- केळी,मोसंबी – ३१ऑक्टोबर
- आंबा, संत्रा , काजू (कोकण)- ३० नोव्हेंबर
- डाळिंब, आंबा (इतर जिल्हे)- ३१ डिसेंबर
प्रती हेक्टरी किती विमा हप्ता किती भरायचा?
फळबाग पीक शेतकऱ्याला विमा संरक्षित रकमेच्या ५% रक्कम विमा हप्ता म्ह्णून भरावी लागेल. आपापल्या फळपीक घटकाप्रमाणे खालीलप्रमाणे शेतकऱ्याला फळपीक विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- संत्रा, मोसंबी रु. ४०००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- डाळिंब रु६५००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- द्राक्षे १७०००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- स्ट्रॉबेरी रु.१००००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- लिंबू रु.३५००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- काजू रु. ५०००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- आंबा ,केळी रु. ७०००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
- पेरू चिकू रु.३०००/-विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
अंबिया बहारासाठी गारपीट या हवामान धोक्या साठी अतिरिक्त विमा हप्ता रक्कम भरावी लागेल. संत्रापिकाकरीता रु.१३३३/- इतका विमा हप्ता असुन केळी पिकासाठी रु. २३३३/- इतका विमा हप्ता आहे.
योजनेचा हप्ता कुठे भरावा-
या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था, तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा.
विमा कंपनीचा पत्ता-
HDFC ergo general insurance co.ltd.
पहिला मजला, एचडीएफसी हाऊस, 165-166 backbay reclamation, एच टी पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई-४०००२०.
ग्राहक सेवा क्र.-०२२-६२३४६२३४
दुरध्वनी क्र.- ०२२- ६६३८ ३६००
ई-मेल- shailesh.thakur@hdfcergo.com
shekhar.kapale@hdfcergo.com
- Old Age Pension List 2023 -24: पात्रता, दस्तावेज़ |वृद्धावस्था पेंशन योजना
- विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2023:Widow Pension Scheme कागदपत्रे, Form PDF
- Tejaswini Yojana Maharashtra PDF । तेजस्विनी योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती
- PMMVY 2023 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे?
- सीखो कमाओ योजना महाराष्ट्र: शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना सक्षम बनवणे