Majhi Kanya Bhagyashree Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शासन परिपत्रक GR, काय आहे हि योजना, उद्दिष्ट्य लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. मित्रांनो जर तुम्हला लहान मुलगी असेल तर हि योजना तिच्यासाठीच आहे. या योजनेचे लाभ हे सर्वाधिक मिळणारे आहेत. त्यामुळे या योजनेचे लाभ नक्कीच वाचा. पात्र असल्यास अवश्य या योजनेचा लाभ घ्या.
माझी कन्या भाग्यश्री योजना
राज्यात १३ फेब्रुवारी २०१४ रोजी सुकन्या योजना सुरू करण्यात आली. सुकन्या योजनेचा लाभ दिनांक १ जानेवारी २० पासून जन्मणाऱ्या मुलींकरता अनुज्ञेय राहणार आहे. केंद्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाव योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या केंद्रपुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद व जालना यांची निवड करण्यात आलेली आहे. मुलींचा जन्मदर १,००० मुलांच्या मागे ८९४ इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे आणि मुलांनी एकाच मुलींचाही जन्मदर वाढविणे या उद्दिष्टाने बेटी बचाव बेटी बेटी पढाव या योजनेच्या धर्तीवर मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, अशा सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री ही एक नवीन योजना राबविण्यात येत आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट्ये –
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट्ये प्रमाणे असतील.
- महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा करणे.
- त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे.
- मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे.
- बालिका भ्रूणहत्या रोखणे.
- बालविवाह रोखणे.
- मुलांनी इतकाच मुलींचा ही जन्मदर वाढवणे.
सुकन्या समृद्धि योजना (PMSSY)मराठी माहिती benefits,bank list, eligibility
Majhi Kanya Bhagyashree Yojana शासन निर्णय –
राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयान्वये सुकन्या योजना दिनांक १ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल. अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे.
माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना की विलीन करण्यात आलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत खालील तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे लाभ देण्यासाठी तसेच दारिद्र रेषेखालील एपीएल रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला येणार्या प्रत्येक मुलीसाठी तक्ता क्रमांक दोन मधील एक लाभ देण्यात येणार आहेत.
माझी कन्या भाग्यश्री योजना लाभार्थी पात्रता –
- जर एकुलती एक मुलगी असेल, आणि मातेने कुटुंब नियोजन केले असेल, तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
- जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना माहिती मराठी महाराष्ट्र Benefits Eligibility
माझी कन्या भाग्यश्री योजना अटी आणि लाभ काय आहेत?
१.मुलीच्या जन्माच्या वेळी
सध्याच्या परंपरेनुसार कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला जातो. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मुलीचा जन्मोत्सव साजरा करण्यास प्रेरित होतील. जनमानसाच्या मानसिकतेत बदल होईल.
२. मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी –
कुटुंबामध्ये मर्यादित उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध असल्यामुळे, त्या स्रोतांचा उपयोग मुलांच्या पालन पोषणासाठी केला जातो. काही वेळा मुलींकडे याबाबतीत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आर्थिक मदत दिल्यामुळे मुलींच्या पालन पोषणासाठी त्यांच्या आरोग्य दर्जा उंचावणे तसेच त्या मुलीस करावयाचे लसीकरण व इतर खर्चासाठी कुटुंबास मदत होईल.
३. मुलगी इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता ६ वी ते १२ वीत आर्थिक मदत –
या आर्थिक मदतीचे उद्दिष्ट्य मुलींचे शिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून पुढील मातांची पिढी सुशिक्षित होईल. त्यामुळे त्यांची मुले ही आरोग्यसंपन्न असतील. तसेच त्या शिक्षित मुली मुलामुलींमध्ये भेदभाव करणार नाहीत.
४. वयाच्या १८व्या वर्षीची आर्थिक मदत –
या आर्थिक मदतीचा उद्दिष्ट हे मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचे आहे. या शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण माता या आरोग्यसंपन्न मुलास जन्म देतील. त्यांच्या मुलांनादेखील शिक्षित करतील आणि मुला-मुलींना सामान ठेवतील.
५. मुलीचा जन्म झाल्यानंतर आजी-आजोबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार –
समाजातील बऱ्याच कुटुंबातील सासू-सासरे यांच्याकडून मुलगाच पाहिजे, असा दबाव सुनेवर टाकला जातो. त्यासाठी जन्म देणाऱ्या मातेच्या सासु-सासर्यांना एक सोन्याचे नाणे (रुपये ५,००० मर्यादेपर्यंत) आणि प्रमाणपत्र देऊन माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन किंवा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन किंवा राष्ट्रीय बालिका दिन किंवा महिला दिन अशा प्रसंगी सत्कार करण्यात येईल. यामुळे कुटुंबाचा समाजात आदर वाढेल.
६. गावाचा गौरव –
या योजनेअंतर्गत समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी ज्या गावांमध्ये मुला मुलीचे लिंग गुणोत्तर एक हजार पेक्षा जास्त असेल, अशा गावास माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्यामार्फत रुपये ५ लाखाचे पारितोषिक दिले जाईल. संबंधित मिळालेली रक्कम ग्रामपंचायतीने गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक राहील.
PMMVY प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे
बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन GR माहिती कागदपत्रे फॉर्म eligibility
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी आणि शर्ती –
सुकन्या योजनेचा समावेश नव्याने सुरू करण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेत करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये लागू करण्यात येत आहेत. तसेच सुकन्या योजनेतील मुलींना माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
- अर्जदार बालिकेचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील एपीएल पांढरे रेशन कार्डधारक दोन मुलींना लागू असेल.
- विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तिने इयत्ता दहावीचे परीक्षा उत्तीर्ण होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेची जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र असतील.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना अनुज्ञेय राहील.
- एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष सहा किंवा सहा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- प्रकार एक च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व प्रकार दोनच्या लाभार्थी कुटुंबास दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
- सदर योजनेअंतर्गत १८ वर्षानंतर जी रक्कम रुपये १ लाख मिळणार आहे, त्यापैकी किमान रुपये १०,०००/- हे मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात ती स्वतःच्या पायावर उभा असेल.
प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan form
माझी भाग्यश्री कन्या योजना 2024 ची कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 साठी अर्ज कसा करावा?
राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या MKBY 2024 च्या अंतर्गत अर्ज करायचा असेल, तर त्यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज पीडीएफ महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे नाव, आई-वडिलांचे नाव, मुलीची जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी भरावी लागेल.सर्व माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मशी जोडून तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावी लागतील. अशा प्रकारे आपला माझा कन्या भाग्यश्री योजना मधील अर्ज करावा लागेल.
- सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2 ऑनलाइन अर्ज Link, फॉर्म, फायदे
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PDF, Online रजिस्ट्रेशन, Official Website
- ladki bahin.maharashtra.gov.in Online Registration वर लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा स्टेप बाय स्टेप माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link