biogas बायोगॅस gober gas projech image

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत योजनेअंतर्गत सन २०२१-२२ वर्ष्यासाठी शासन अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सेंद्रिय शेतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सेंद्रिय शेती म्हणजे काय ? राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत योजनेअंतर्गत सन २०२०-२१ वर्ष्यासाठी शासन अनुदान माहिती, सेंद्रिय शेतीचे उपयोग कोणते? सेंद्रिय आणि रासायनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती कोणत्या तत्वावर आधारित आहे? सेंद्रिय खताचे प्रकार कोणते ? तसेच सेंद्रिय खतांचा जमिनीवर होणारे चांगले परिणाम कोणते? या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

Contents hide

सेंद्रिय शेती म्हणजे काय ?

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त रासायनिक खते , औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.

हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत.सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत आलेली शेती पद्धती होय. शेती करताना रासायनिक खते आणि औषधांचा वापर न करता फक्त शेतातील पिकांचे काढणीनंतरचे अवशेष, गोमूत्र , शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून केली जाणारी शेती पद्धती आहे.

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत योजनेअंतर्गत सन २०२०-२१ वर्ष्यासाठी शासन अनुदान माहिती –

इंधनाची बचत व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत घटकांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारण्याचे आवाहन केले आहे. सदर अनुदान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारणीस मदत म्हणून खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

  • बायोगॅस संयंत्राला जोडून शौचालय उभारणीसाठी १६००/- रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १२०००/- रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
  • अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी १३०००/- रुपयाचे अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.

सदर अनुदान उपक्रम हा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणार आहे.

पोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना

boigas बायोगॅस gobar gas image

सेंद्रिय शेतीचे उपयोग कोणते?

या प्रकारच्या शेतीमुळे पिकांची गुणवत्ता वाढते. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ चांगली होऊन आरोग्यास पोषक असण्याऱ्या आणि उच्च प्रतीच्या उत्पादनाची निर्मिती होण्यास मदत होते.

सेंद्रिय आणि रासायनिक शेती पद्धती –

हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात रासायनिक शेतीमुळे शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न शेतकऱयाला मिळू लागले मात्र नंतर जमीन कठीण होऊ लागली. आधीच्या काळात जमिनीची मशागत ही लाकडी नांगराने करत असत. ती नंतरच्या काळात शेतीची मशागत लोखंडी नागाराने नांगरावी लागली जाऊ लागली कारण जमीन जास्तच कठीण होऊ लागली. त्यानंतर शेतीची मशागत ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली.म्हणजेच रासायनिक औषधामुळे जमीन कठीण होऊन मृत होत चालली होती. सेंद्रीय पद्धतीने शेती हरितक्रांतीपर्यंत केली गेली.

शेतकरी जास्त उत्पन्न मिळावे, या उद्देशाने रसायनांचा खतांचा अतिवापर करीत आहेत.त्याचा वाईट परिणाम म्हणून कॅन्सरसारख्या घातक आजाराचा प्रश्नांना देशाला सामोरे जावे लागत आहे. (सधोधन शास्त्रज्ञ, डॉ. रश्मी सांघि (आय.आय.टी. कानपूर) यांनी सांगितले की, रासायनिक खते वापरून केल्या गेलेल्या शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले गेलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीवर भर देण्यात यावा.

महाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करणेबाबत निर्णय २७ ऑगस्ट २०२१

सेंद्रिय शेती कोणत्या तत्वावर आधारित आहे?

A. पर्यावरणीय तत्त्व –

सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून असायला हवी. जेणेकरून जीवसृष्टीला धरून चालणारी हवी. या प्रकारच्या शेतीमुळे कोणत्याही पराकारचे प्रदूषण होत नाही.

B.आरोग्यायचे तत्त्व –

पशू, पक्षी, माती, हवा, माती, धान्याची रोपे, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा प्रामुख्याने उपयोग आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊन मानवाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

C. संगोपनाचे तत्त्व –

सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरीत्या होण्यास मदत होते. जेणेकरून, सध्याच्या आणि पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य योग्य रितीने राखले जाण्यास मदत होईल.

डॉ. पंजाबराव देशमुख अंतर्गत राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती अंतर्गत जैविक शेती मिशन

सेंद्रिय खताचे प्रकार कोणते ?

प्राणी व वनस्पती अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे खाटिकखान्याचे खत, शेणखत, तेलबियांची पेंड, हिरवळीची खते, माश्यांचे खत, हाडांचे खत, गांडूळ खते, कंपोस्ट इत्यादींपासून सेंद्रिय खत तयार होते. या खतांमध्ये कोणत्या गोष्टी शेतीला आवश्यक आहेत तसेच हे खत कसे तयार करायची तेही आपण पाहणार आहोत.

A. गांडूळ खत –

गांडूळ खतात गांडुळाची अंडीपुंज, गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, आणि अनेक जमिनीला उपयुक्त जीवाणूंचा समावेश करून टायर करण्यात आलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.

B. शेणखत –

शेणखतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. गोठ्यातील पालापाचोळा, गाईम्हशींचे शेण, मूत्र, इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. तसेच शेणाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्माण कारण्यासाठी हि केला जातो . त्यामधून उर्वरित शिल्लक राहिलेले शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक घटक म्हणून वापरले जाऊ शकते.

C. हिरवळीची खते –

या खतांपासून जमिनीचा पोत सुधारतो जमिनीला नत्र मिळते, व ती जमीन सुपीक बनते.हिरवळीची खते तयार करण्यासाठी लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. अशा प्रकारे तयार केल्या जाणाऱ्या खतांना हिरवळीचे खत म्हणतात.मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडून तयार झालेल्या हिरवळीच्या खतामुळे गव्हाच्या उत्पादनात भरगोस वाढहोण्यास मदत होते. त्या गाडलेल्या पिकांना कुजून खत होण्यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. शेवरी, गवार, धैच्या, मूग, चवळी, ताग, बरसीम, ग्लीिरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.

D. माशाचे खत –

समुद्रकिनारी वाया गेलेल्या आणि खराब माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या माश्यांचे अनावश्यक अवशेषापासून जे खत तयार होते त्या खतांना माशाचे खत म्हणतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या जमिनीला अत्यावश्यक घटकांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे जमिनीला या खताचे उपयोग जमीन सुपीक होण्यास आणि जमिनीचा पोत सुधारून भरगोस उप्त्पादन येण्यासाठी मदत होते.

E. कंपोस्ट खत –

कंपोस्ट खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते. कंपोस्ट खत हे पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, शेतातील गवत, कापसाची धसकट, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात.

F. खाटीकखान्याचे खत –

या प्रकारच्या खतांमध्ये नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.खाटीकखान्यात जनावरांच्या अवशेषापासून जे खत तयार केले जाते, त्या खताला खाटीकखान्याचे खत म्हणतात.

G. गोमूत्र –

गोमूत्र चा उपयोग १:२० प्रमाणात केल्याने कीट नियंत्रण होते व पिकांची वाढ चांगल्या रीतीने होण्यास मदत होते. रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास ते रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश करतात .

 केंद्र पुरस्कृत सेंद्रिय गट शेती योजना

सेंद्रिय खतांचा जमिनीवर होणारे चांगले परिणाम कोणते?

  • सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.
  • कमी तापमानात जमीन गरम ठेवणे आणि उष्ण तापमानात शेतजमिनीला जमिनीला थंड करणे हे सेंद्रिय खतामुळे शक्य होते त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर जास्तितजास्त प्रमाणावर केला जावा.
  • सेंद्रिय खतांमुळे मातीवर नैसर्गिक खतांचा थरामुळे जमीनीचे तापमान कमी राखण्यास मदत होते.
  • सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात.
  • रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published.