Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

रोजगार हमी योजना (नरेगा) जॉब कार्ड List महाराष्ट्र Online Registration 2023

Posted on March 16, 2023 by Mahasarkari Yojana

Nrega Maharashtra 2022: नमस्कार मित्रांनो, आज आपण महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा योजना) जॉब कार्ड महाराष्ट्र २०२२ ची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये आपण महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा योजना) काय आहे, maha nrega job card list 2022, nrega job card apply online 2022, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) जॉब कार्ड योजनेचे उद्दिष्ट, (मनरेगा) अंतर्गत कामे/उपक्रम, मनरेगा जॉब कार्ड पात्रता, नरेगा सोबतीची निवड आणि पात्रता, जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, नरेगा जॉब कार्ड (list) यादी महाराष्ट्र २०२२ लिस्ट कशी बघायची,जॉब कार्ड साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि अर्ज कसा करावा, मनरेगा जॉब कार्ड योजना ऑफलाईन अर्ज नोंदणी (Registration) प्रक्रिया काय आहे, अधिक माहिती साठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा योजना) जॉब कार्ड PDF, जॉब कार्ड हेल्पलाईन नंबर (संपर्क) कुठे करायचा, अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हला या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हीही या केंद्र सरकारच्या रोजगार हमी (जॉब कार्ड) योजनेचा लाभ घेऊ इच्छिता, तर हा लेख नक्की संपूर्ण वाचा.

Contents hide
1 रोजगार हमी योजना (नरेगा योजना) काय आहे?
1.1 ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत कामे/उपक्रम कोणते?
1.2 नरेगा जॉब कार्ड अंतर्गत राबविण्यात येणारी कामे कोणती?
1.2.1 संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना संपूर्ण माहिती
2 (नरेगा) जॉब कार्ड योजनेचे उद्दिष्ट काय?
2.1 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) योजनेअंतर्गत केली जाणारी प्रमुख कामे कोणती?
2.1.1 श्रेणी-१ :
2.1.2 श्रेणी-२ :
2.1.3 श्रेणी-३ :
2.1.4 श्रेणी-४ :
2.2 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा सोबतीची निवड आणि पात्रता –
2.3 मनरेगा जॉब कार्ड पात्रता काय आहे?
2.4 नरेगा अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
3 नरेगा जॉब कार्ड योजना ऑफलाईन अर्ज नोंदणी 2022 (Registration) प्रक्रिया काय आहे?
4 (nrega job card apply online 2022) नरेगा जॉब कार्ड साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि अर्ज कसा करावा?
4.1 जॉब कार्ड (हेल्पलाईन नंबर) संपर्क कुठे करायचा?
4.2 Related

रोजगार हमी योजना (नरेगा योजना) काय आहे?

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा योजना) भारतात ७ सप्टेंबर २००५ पासून लागू करण्यात आली. जे सार्वजनिक कामाशी संबंधित अकुशल श्रम करण्यास इच्छुक असतात, अश्या कोणत्याही ग्रामीण कुटुंबातील सदस्यांना या योजनेअंतर्गत शंभर दिवसांचा रोजगार प्रदान केला जातो. सन २०१०-११ या आर्थिक वर्षात मनरेगा योजनेसाठी केंद्र सरकारचा खर्च ४०,१०० कोटी रुपये होता.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा योजना) जॉब कार्ड महाराष्ट्र २०२१

ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत कामे/उपक्रम कोणते?

मनरेगा ग्रामीण विकास आणि रोजगार मिळवून देण्याचे दुहेरी ध्येय साध्य करते. मनरेगा मध्ये नमूद केलेली कामे ग्रामीण विकास उपक्रमांकडे केंद्रित असतात. ज्यामध्ये ग्रामीण कनेक्टिव्हिटी, जलसंधारण, पूरनियंत्रण आणि संरक्षण बांध तसेच दुरुस्ती सीपेज टाक्या, लहान बंधारे, वनीकरण, उत्खनन, नवीन तलाव इत्यादी कामांवर भर दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारास जमीन सपाटीकरण, वृक्षारोपण यांसारखी देखील कामे दिली जातात.

नरेगा जॉब कार्ड अंतर्गत राबविण्यात येणारी कामे कोणती?

नरेगा जॉब कार्ड ही केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते. यामध्ये असुरक्षित कुटुंब ज्यांना स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध नाही. तसेच विधवा महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे देशातील नागरिक यांच्यासाठी उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत मिळवून देण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने राबविली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाने वैयक्तिक कामगार लाभार्थ्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित करून त्यांना कंपोस्ट खड्डे खोदणे, विहीर खाणने किंवा दुरुस्त करणे, वृक्षलागवड करणे, कृषी क्षेत्राचे दुरुस्ती करणे ही कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात. ग्रामीण विकास कार्यक्रम महात्मा गांधी रोजगार हमी कायदा २०१५ नुसार ग्रामीण भागात राबवले जातात.

संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना संपूर्ण माहिती

(नरेगा) जॉब कार्ड योजनेचे उद्दिष्ट काय?

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) या जॉब कार्ड द्वारे ग्रामीण भागातील लोकांना शंभर दिवसांची रोजगार हमी दिली जाते. या योजनेअंतर्गत अकुशल ग्रामीण नागरिकांना रोजगार दिला जातो. ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते आणि ते त्यांच्या कुटुंबाचे स्वावलंबी पणाने पालनपोषण करू शकतात. केंद्र सरकारच्या मनरेगा योजना ही एक ग्रामीण भागातील गरीब नागरिकांसाठीची रोजगार योजना आहे. या योजनेचा लाभ गावातील आणि शहरातील लोक घेऊ शकतात त्यासाठी त्यासाठी अर्ज कारण्याचीपद्धत या लेखात खाली दिलेली आहे ती तपासावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) योजनेअंतर्गत केली जाणारी प्रमुख कामे कोणती?

मनरेगा योजनेअंतर्गत केली जाणारी कामे ही चार श्रेणीमध्ये आहेत ती खालील प्रमाणे:

श्रेणी-१ :

या श्रेणीमध्ये सार्वजनिक आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाशी निगडित असणारी कामे सामाविष्ट केली गेली आहेत. ज्यामध्ये पारंपारिक जलस्रोत आणि पुनरुज्जीवन, पाणलोट व्यवस्थापन, सूक्ष्म आणि लघु सिंचन सुविधांची कामे, जलसंधारण संरक्षण, कुरण विकास इत्यादी कामे समाविष्ट केली गेली आहेत.

श्रेणी-२ :

या श्रेणीमध्ये मासेमारी, पशुसंवर्धन, पडीक क्षेत्र विकसित करणे, इंदिरा गांधी आवास योजनेत काम करणारे कामगार इत्यादी संबंधित कामे समाविष्ट आहेत.

श्रेणी-३ :

या श्रेणीमध्ये कृषी उत्पादनाच्या साठवणुकीसाठीची कामे महिला बचत गटांसाठी केली जातात. तसेच कृषी उत्पादकता वाढवणे, भौतिक संसाधनांच्या निर्मितीची कामे व खतांची रचना इत्यादी कामे समाविष्ट केली गेली आहेत.

श्रेणी-४ :

या श्रेणीमध्ये क्रीडा मैदान, बांधकाम कार्य, ग्रामीण स्वच्छता कार्य, आपत्कालीन व्यवस्थापन, इमारत बांधकाम, रस्ता इत्यादी संदर्भातील कामे केली जातात.

समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा सोबतीची निवड आणि पात्रता –

नरेगा सोबतीची निवड अधिकारी करतात. यासाठी अर्जदाराने ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा लागतो. यानंतर अर्जाची पडताळणी होते आणि नरेगा सोबतीची भरती ग्रामपंचायत द्वारे केली जाते. या सोबतींची संख्या ही ग्रामपंचायतीमधील नरेगा कामगारांच्या संख्येवर अवलंबून असते. यांची निवड प्रक्रिया पात्रता पुरुष असल्यास, किमान आठवी पास आणि महिला देखील आठवी पास असणे आवश्यक आहे. जर या अर्जामध्ये आठवी पास स्त्री उपलब्ध नसेल, तर पाचवी पास महिलेची नरेगा सोबती म्हणून निवड केली जाते.

मनरेगा जॉब कार्ड पात्रता काय आहे?

  • अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
  • या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अकुशल श्रमिक असणे आवश्यक आहे.

नरेगा अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
नरेगा जॉब कार्ड scheme online apply

नरेगा जॉब कार्ड योजना ऑफलाईन अर्ज नोंदणी 2022 (Registration) प्रक्रिया काय आहे?

  • नरेगा योजना अंतर्गत ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्य ज्यांचे नाव, वय व पत्ता ग्रामपंचायतीत सादर करावी लागतात.
  • त्यानंतर या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते.
  • पडताळणीनंतर घरांची पंचायत नोंदणी आणि जॉब कार्ड सदस्याच्या तपशील आणि फोटो सहित जॉब कार्ड जारी करण्यात येते.
  • नोंदणीकृत व्यक्ती काम करण्यासाठी पंचायत किंवा कार्यक्रम अधिकारी यांना किमान १४ दिवस सतत काम करण्यासाठी लेखी अर्ज सादर करू शकतो.
  • अर्ज केल्यानंतर त्या अर्जदाराला दररोज बेरोजगारी भत्ता दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत सुनिश्चित झालेल्या कायद्याअंतर्गत स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. त्यामुळे स्त्री आणि पुरुषाला समान रोजगार मिळतो.
  • सर्व प्रौढ नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र शेतकरी अनुदान योजना  माहिती 

(nrega job card apply online 2022) नरेगा जॉब कार्ड साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि अर्ज कसा करावा?

  • नरेगा जॉब कार्ड साठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक अर्जदाराने मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे त्याची लिंक खाली दिलेली आहे
  • नरेगा जॉब कार्ड नोंदणी (nrega official portal)  – nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx
  • या मुखपृष्ठावर ग्रामपंचायत विभाग असे तुम्हाला दिसेल या विभागातून डेटा एंट्री च्या समोरील रजिस्ट्रेशन पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे दुसरे पृष्ठ उघडेल. ज्या पृष्ठावर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
  • राज्य निवडल्यानंतर एक नवीन पृष्ठ तुमच्यासमोर उघडेल. ज्यामध्ये लॉगिन फॉर्म असेल या लॉगिन फॉर्म मध्ये तुम्हाला आर्थिक वर्ष, जिल्हा, ब्लॉक, पंचायत, यूजर आयडी, पासवर्ड, कॅपच्या अशी माहिती भरून बटनावर लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल.
Job Card Online Registration Apply
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे दुसरे पृष्ठ उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला नोंदणी आणि जॉब कार्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यानंतर बीपीएल डेटाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल ज्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव, कुटुंब प्रमुखाचे नाव, घर क्रमांक, नोंदणीची तारीख, श्रेणी, अर्जदाराचे नाव व अशी सर्व माहिती भरावी लागेल.
  • ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • ही माहिती सेव झाल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पृष्ठ उघडेल
  • या पृष्ठावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल आणि तुम्हाला तेथे फोटो अपलोड करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची नरेगा अंतर्गत जॉब कार्ड ची नोंदणी पूर्ण होईल.
  • तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन देखील तुम्ही जॉब कार्ड साठी अर्ज करू शकता.

जॉब कार्ड (हेल्पलाईन नंबर) संपर्क कुठे करायचा?

या योजनेअंतर्गत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून कोणताही मजूर काम मिळू शकतो. तसेच या योजनेअंतर्गत स्थलांतरित झालेले मजूर देखील हेल्पलाइन क्रमांक ९४५४४५४९९९ आणि ९४५४४०५५५५ या क्रमांकावर संपर्क साधून काम मिळू शकतात. या मजुरांना जिल्हा पंचायत क्षेत्र, पंचायत, ग्रामपंचायत तसेच इतर विभागांमार्फत काम दिले जाईल. अथवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीकडे देखील संपर्क करून तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

  • ट्रॅक्टर अनुदान आलं!! Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023 GR
  • कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free
  • राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2023 माहिती
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2023
  • PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2023

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Recent Posts

  • ट्रॅक्टर अनुदान आलं!! Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023 GR
  • कुणाच्या नावावर किती हेक्टर क्षेत्र आहे कस बघायचं ! तेही अगदी Free
  • राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2023 माहिती
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2023
  • PMEGP लोन योजना एप्लीकेशन फॉर्म 2023
  • पशु किसान क्रेडिट कार्ड अप्लाई 2023
  • Online 2023-24 अर्ज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान संपूर्ण माहिती
  • (PMJDY)प्रधानमंत्री जन धन योजना 2023 बँक खाते मराठी माहिती :फायदे, Form
  • (पोखरा अंतर्गत) ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना अर्ज 2023
  • हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती

Categories

  • Mahadbt Farmer Scheme List
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • अर्ज कसा करावा
  • आदिवासी विकास विभाग योजना
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2023
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2023
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2023 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme