E Pik Pahani 2025 Online: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण ई पीक पाहणी कशी करायची त्यासंबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये ई पीक पाहणीचे महत्त्व काय आहे, त्याचे फायदे कोणते आहेत, e pik pahani app कसे वापरायचे, ई पीक पाहणी नोंदणी कशी करायची (E Pik Pahani Online Registration), आवश्यक कागदपत्र कोणती, त्याचप्रमाणे e पीक पाहणीचे लेटेस्ट अपडेट या संबंधीची सविस्तर माहिती आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
E Pik Pahani 2025 Online नोंदणी सुरु
मित्रांनो खरीप हंगाम जवळ येत असताना ई पीक पाहणी करणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं काम असतं. 1 ऑगस्टपासून शेतकरी इ पिक पाहणी ॲपचा वापर करून त्यांच्या पिकांची नोंदणी करतात. जे की गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेला आहे. ही नोंदणी कशी करायची त्या संबंधित स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई पीक पाहणी अँप द्वारे पीक माहिती नोंदवावी लागते. शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार असतो. अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना या इ पिक पाहणीच्या नोंदी द्वारे मिळणार असतो. त्यामुळे लवकरात लवकर तुमची इ पिक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्या. ही नोंदणी 1 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे.
ई पीक पाहणीचे महत्व
ई पीक पाहणी अँप शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांच्या तपशिलांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याचे एक मुख्य साधन आहे. महाराष्ट्र सरकारने या डिजिटल उपक्रमामुळे शेतकरी स्वतः त्याच्या शेतातील पिकांच्या नोंदी ऑनलाईन करू शकतात. जेणेकरून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकेल.
Pik Pera Form PDF 2025-25: पिक पेरा प्रमाणपत्र PDF डाउनलोड
पिक विमा योजनेत होणार बदल
केंद्र सरकारने पूर्वी पारदर्शक पिक विमा योजना लागू केलेली होती, ज्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. मात्र आता खाजगी कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. याची चौकशी देखील लवकरच केली जाणार आहे. कृषिमंत्र्यांनी उपस्थित लवकरच बैठक घेऊन पीक विमा योजनेत बदल केले जाणार आहेत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेले आहे.
ई पीक पाहणी नोंदणी कशी करायची?
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन इ पीक पाहणी असं सर्च करा त्याची लिंक तुम्हाला खाली देखील दिले जाणार आहे. तेथून जाऊन देखील तुम्ही ते ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे.
- अँप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचे आहे. आता तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ज्यामध्ये तुमचा विभाग जिल्हा, तालुका आणि गाव निवडावा लागेल. त्याचप्रमाणे तुमचे नाव, खाते क्रमांक आणि गट क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागेल. आणि आवश्यक ती माहिती भरून पुढे जा या बटणावर क्लिक करावे लागेल.
- तुमचा खाते क्रमांक आणि गट क्रमांक निवडल्यानंतर पिकाचे वर्ग, प्रकार, नाव व क्षेत्र इत्यादी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. त्याचप्रमाणे सिंचनाचे साधन आणि लागवडीची तारीख देखील त्या ठिकाणी निवडावी लागणार आहे.
- हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतातील पिकाचा फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला भरलेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी स्वघोषणापत्र करावं लागणार आहे.
तुम्हाला ही माहिती अवघड वाटत असल्यास तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुमच्या पिकाची माहिती ऑनलाईन अपडेट करू शकता. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑनलाइन इ पिक पाहणी कशी करायची.
E Pik Pahani Online Kashi Karavi?
E Pik पाहणी चे फायदे कोणते?
- एम एस पी मिळवण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमाल विक्री करण्यासाठी हा डेटा वापरला जाऊ शकतो.
- तुम्हाला पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवलेले पीक आणि पीक पाहणीतील पीक हे अंतिम मानले जाते. त्यानुसार तुम्हाला त्या पिकासंबंधीत जर नैसर्गिक आपत्तीमुळे त्या पिकाचे नुकसान झाले, तर त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाते.
- पीक कर्जाच्या पडताळणीसाठी बँक शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाच्या कर्जाची पडताळणी या इ पिक पाहणी मध्ये केलेल्या पिकांची तपशील पाहून तुम्हाला पीक कर्ज देखील दिले जाते.
ई पीक पाहणी अटी तात्पुरत्या रद्द प्रत्यक्ष पंचनामे करून शेतकऱ्यांना मिळणार मदत
महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीसाठी आवश्यक असलेली एपिक पाहणीच्या अटी तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पंचनामे करताना येणारी अडचण दूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळू शकणार आहे.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली जाणार आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची अट ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रद्द करण्याची मागणी केली होती. तांत्रिक अडचणीमुळे नुकसान पंचनामी रखडले गेलेले होते, त्यामुळे विखे पाटील यांनी यावर्षी पिक पाहण्याची तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तलाठी, कृषी सहाय्यक प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करणार आहेत. कोणताही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करण्यात येणार आहे.
पीक पाहणी महत्वाच्या लिंक
- ई-पीक पाहणी अँप (e pik pahani app)
- ई पीक पाहणी नोंदणी (E pik pahani online registration Guide PDF Link)
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana