मराठा आरक्षण GR : नमस्कार मित्रांनो आज आपण मराठा समाजातील कुणबी मराठा जात प्रमाणपत्र कुणाला दिलं जाणार आहे? मराठा आरक्षणासंबंधीचा महत्त्वपूर्ण असा जीआर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. या GR मध्ये काय नमूद केला गेलेला आहे? मराठा कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती कोणती आहे? कोणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीचा जीआरची संपूर्ण अशी माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Maratha Aarkshan GR 2023 | मराठा आरक्षण जीआर
मित्रांनो, हा जीआर 7 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. राज्याच्या मराठवाडा विभागात मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यात येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन. समाजास कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी शासनास शिफारस करण्यासाठी. अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली. दिनांक 29 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती स्थापन करण्यात आली आहे.
तथापि, मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या विषयास अनुसरून अंतिम करावयाची कार्यपद्धती प्रशासकीय दृष्टीने सुयोग्य होण्यासाठी अधिक प्रभावी उपायोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनानेखाली शासन निर्णय दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी घेतलेला आहे.
Maratha Aarkshan 2023 GR | मराठा आरक्षण News
Maratha Aarkshan 2023 शासन निर्णय जीआर
मराठा समाजातील ज्या व्यक्तिनी कुणबी मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली आहे. अशा व्यक्तीनी सादर केलेल्या निजामखाली महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात, त्याचप्रमाणे समर्थनीय अनुषंगीक अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख कुणबी असा असेल. तर अशा व्यक्तीना सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करून कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे, असे या शासन निर्णयामध्ये नमूद केले गेलेली आहे.
त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी मराठा जातीची जातप्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांशी प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीनंतर पात्र व्यक्तींना कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठीं मा. न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील पात्र जोडप्यांना ₹50,000 पर्यंत विवाह प्रोत्साहन Matrimonial Incentives Scheme
समितीची कार्यकक्षा.
मराठवाडा विभागातील मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंबंधित व्यक्तिनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संबंधसंदर्भात सादर केलेले पुरावे असणे गरजेचे आहे. जे की खालील प्रमाणे असणार आहेत.
मराठा आरक्षण कागदपत्रं पुरावे | कुणबी मराठा जात प्रमाणपत्र कागदपत्र पुरावे
- निजामकालीन पुरावे.
- वंशावली.
- शैक्षणिक पुरावे.
- महसुली पुरावे.
- निजाम काळात झालेले करार.
- निजामखाली संस्थानिकांनी दिलेल्या सनदी.
- राष्ट्रीय दस्तावेज.
वरील पुराव्यांची प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती मराठा कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करणे हे या समितीचे काम असणार आहे.
समितीचा कार्यकाल.
या समितीने एक महिन्यात अहवाल तयार करून शासनाला सादर करणे अनिवार्य आहे, असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलं गेलेलं आहे.
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2023 महाराष्ट्र माहिती
- या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी ३०,०००/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी २०,०००/-कामगार योजना २०२३ महाराष्ट्र फायदे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना शासन निर्णय GR PDF
- ६२.५० कोटी कांदाचाळ उभारणी प्रकल्प निधी मंजूर जीआर
- समाज कल्याण हॉस्टेल योजना GR