Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

[Updated]मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना:अर्ज, कागदपत्रे, पात्रता, PDF संपूर्ण माहिती

Posted on January 21, 2023January 22, 2023 by Mahasarkari Yojana

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 महाराष्ट्र संबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? अनुदान किती आहे? ठिबक सिंचनाची मापदंड किती? त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठीची मापदंड किती ? संच कुठून खरेदी करायचा? त्यासाठीची आवश्यक पात्रता काय? या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

mahadbt portal farmer schemes 2021
Contents hide
1 १५० कोटी अनुदान मंजूर !! पहा कोणत्या प्रलंबित निवड झालेल्या लाभार्त्यांना अनुदानाच होणार लाभ !!
2 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 अनुदान किती दिलं जाईल?
2.1 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 व्याप्ती
2.2 लाभ घेण्यासाठी क्षेत्र मर्यादा किती?
3 लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय?
3.1 कागदपत्रे कधी सादर करायची?
3.2 सोडतीनंतर सादर करावयाची कागदपत्रे कोणती?
4 संचासाठी मापदंड
4.1 ठिबक संचासाठी
4.2 तुषार संचासाठी
5 संच कुठून खरेदी करावा?
5.1 संच खरेदी केल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे कोणती?
6 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
6.1 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना PDF
6.2 Related

१५० कोटी अनुदान मंजूर !! पहा कोणत्या प्रलंबित निवड झालेल्या लाभार्त्यांना अनुदानाच होणार लाभ !!

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 अनुदान किती दिलं जाईल?

या योजनेअंतर्गत जे शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत. त्यांना 55% तर इतर शेतकऱ्यांना 45% क्षेत्र मर्यादेपर्यंत पाच हेक्टर एवढ्या क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 व्याप्ती

या योजनेअंतर्गत राज्यातील संपूर्ण 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करून लाभ घेता येणार आहे.

लाभ घेण्यासाठी क्षेत्र मर्यादा किती?

जे पात्र आणि इच्छुक शेतकरी यांना जास्तीत जास्त पाच हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादित या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय?

ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कृषी सिंचन संचाचा लाभ घ्यायचा आहे. त्या शेतकऱ्यांनी खालील अटीची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ त्यांना देता येणार नाही.

  • शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा उतारा आणि आठ अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी आणि त्याची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये असावी.
  • सातबारा उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी बाबत शेतकऱ्याकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे.
  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • एखादा लाभधारक योजनेत सहभागी होण्यास पात्र आहे, मात्र त्याच्याकडे आधार क्रमांक नाही. अशा लाभार्थ्यांना आधार क्रमांक प्राप्त होईपर्यंत आधार नोंदणी पावती किंवा मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा शासकीय कर्मचारी असल्याचे ओळखपत्र किंवा बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक किंवा नरेगा कार्ड किंवा किसान फोटो यांपैकी पुरावा सादर केल्यास योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे.

कागदपत्रे कधी सादर करायची?

  • संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतकरी गट व एफइओ यांची ज्याबाबतीसाठी व ज्या योजनेअंतर्गत निवड झाली असेल. त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर सादर म्हणजेच अपलोड करण्याबाबत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस कळविण्यात येईल. शेतकऱ्यांनी सदर कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर सोडती मध्ये निवड झाल्यानंतर तीस दिवसात अपलोड करावयाची आहेत.
  • सोडती मध्ये निवड झाल्यानंतर तीस दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. अशा अर्जदारांना ते योजनेचे लाभ घेण्याबाबत इच्छुक आहे किंवा नाही अशी सात दिवसाची लेखी स्वरूपात नोटीस देण्यात येते.
  • तदनंतर ही प्रतिसाद न मिळाल्यास असे अर्ज तालुका कृषी अधिकारी स्तरावरून कारण देऊन रद्द करण्यात येतील.
  • ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असल्यामुळे लघु संदेशाद्वारे म्हणजेच एसएमएस द्वारे मागविलेल्या कागदपत्राशिवाय कोणत्याही इतर कागदपत्रांची शेतकऱ्याकडे मागणी करण्यात येणार नाही.

सोडतीनंतर सादर करावयाची कागदपत्रे कोणती?

  • सातबारा उतारा स्वतःच्या (मालकी हक्कासाठी)
  • आठ अ उतारा (एकूण क्षेत्राच्या माहितीसाठी)
  • सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान मागणीसाठी अर्ज केला असल्यास ते ज्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवणार आहेत त्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवण्यास तसेच त्यांच्या नावे अनुदान वर्ग करण्यास हरकत नसल्याबाबत इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक आहे. ते साध्या कागदावर घेण्यात यावे.
  • लाभार्थी किंवा संस्था यांना शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास मालकी हक्क असलेल्या सातबारा, आठ अ आणि लाभार्थ्यांनी अर्ज मंजूर झाल्याच्या दिनांक पासून सात ते दहा वर्षासाठी शेतमालकासोबत असलेल्या कराराचे पत्र.
  • शेतकरी गट/सहकारी संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी/पंचायत राज संस्था यांनी अनुदान मागणीसाठी अर्ज केला असल्यास, संस्था प्रमुख किंवा गटप्रमुख ज्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवणार आहेत. त्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविण्यास तसेच त्यांचे नावे अनुदान देण्यास हरकत नसल्याबाबत इतर सदस्यांचे सहमती पत्र.

संचासाठी मापदंड

ठिबक संचासाठी

मापदंड/हे. रुपये
1.5x 1.5 मी97245 रु
1.2x 0.6 मी127501 रु.
5x 5 मी39378 रु.
6x 6 मी 39378 रु.
10x 10 मी26181 रु.

तुषार संचासाठी

मापदंडरुपये
75 मिमी पाइप करिता रु.24194
63 मिमी पाइप करिता रु. 21588

संच कुठून खरेदी करावा?

ठिबक सिंचन संच आणि तुषार सिंचन संच हा शेतकरी लाभार्थ्याला कृषी विभागाकडील नोंदणीकृत वितरकाकडून खरेदी करावा लागेल.

संच खरेदी केल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे कोणती?

  • शेतकऱ्याची हमीपत्र
  • देयकाची मूळ प्रत (टॅक्स इन्व्हाईस)
  • कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन संच आराखडा व प्रमाणपत्र

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज शेतकरी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा संगणक किंवा सीएससी सेंटर किंवा ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र या ठिकाणी देखील करू शकतो.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना PDF

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने संबंधित चा पीडीएफ पाहू शकता.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना PDF

  • online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती
  • PMMVY 2023 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे?
  • १३ कोटी ७३ लाख प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना शासन निर्णय
  • अर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2023 संपूर्ण माहिती
  • प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme scheme)2021-2025

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow Us

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Recent Posts

  • online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती
  • PMMVY 2023 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे?
  • १३ कोटी ७३ लाख प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना शासन निर्णय
  • अर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2023 संपूर्ण माहिती
  • प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme scheme)2021-2025
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा नवीन महाराष्ट्र शासन जी.आर.३३३३ लक्ष निधी मान्यता
  • अर्ज सुरु डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 संपूर्ण माहिती
  • (Crop Loan)पीक कर्ज योजना: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना माहिती
  • Health Id Card – Online Digital Health ID Registration
  • पीक कर्ज योजना: शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज व्याज सवलत योजना

Categories

  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • अर्ज कसा करावा
  • आदिवासी योजना
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2023
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • मराठी माहिती
  • महाडीबीटी फार्मर स्कीम 2022
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2022
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2023 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme