पोटहिस्स्यांची मोजणी GR: राज्यातील सर्व पोटहिस्स्यांची मोजणी करून नकाशे व 7/12 अभिलेख अद्ययावत करण्यात येणार आहेत.
तसेच प्रत्येक भूभागास भु आधार क्रमांक (ULPIN – Unique Land Parcel Identification Number) देण्यात येणार आहे.
प्रकल्पाची उद्दिष्टे
- राज्यातील सर्व सर्वे नंबर / गट नंबरमधील पोटहिस्स्यांची मोजणी करणे
- 7/12 व नकाशा अद्ययावत करून एकसंध करणे
- प्रत्येक भूभागास ULPIN देणे
प्रकल्पाचे फायदे
- 7/12 नुसार स्वतंत्र पोटहिस्सा नकाशे उपलब्ध होतील
- धारकांचे क्षेत्र व सीमा स्पष्ट होईल
- जमीन वाद कमी होतील
- 7/12 व नकाशा यांचा मेळ साधला जाईल
- नकाशे व अभिलेख यांचे एकत्रीकरण (Integration) होईल
- शेतकरी, बँका व विमा कंपन्यांसाठी अद्ययावत डेटाबेस उपलब्ध होईल
- पीक विमा व नुकसान भरपाई अचूक मिळेल
- खरेदीपूर्व मोजणी प्रक्रिया सुलभ होईल
राज्यस्तरीय समिती
अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध विभागांचे अधिकारी सदस्य म्हणून कार्य करतील.
कार्य
- प्रकल्पाचे समन्वयन व नियंत्रण
- प्रगतीचा आढावा
- आवश्यक मार्गदर्शन व प्रशासकीय मान्यता
भुमी अभिलेख: सरकारी जमीन मोजणी संपूर्ण माहिती
कार्यकारी मंडळ
जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले आहे.
कार्य
- प्रकल्पाची अंमलबजावणी
- आर्थिक नियंत्रण
- राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे
Maharashtra Pandan Raste GR Update | ग्रामीण रस्त्यांना मिळणार नवे क्रमांक
जिल्हास्तरीय समिती
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती असेल.
कार्य
- विविध विभागांमध्ये समन्वय
- प्रकल्पाची अंमलबजावणी
- जनजागृती
- अडचणींचे निराकरण
तालुका स्तरावरील समिती
उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती कार्यरत असेल.
कार्य
- प्रत्यक्ष मोजणीचे नियोजन
- गावनिहाय कार्यक्रम राबविणे
- स्थानिक अधिकाऱ्यांचा सहभाग
- साप्ताहिक प्रगती अहवाल सादर करणे
- तक्रारींचे निराकरण
राज्यातील सर्व पोटहिस्स्यांची मोजणी GR PDF
शेतजमिनीच्या पोटहिस्स्यांची अचूक मोजणी करून 7/12 आणि नकाशा अद्ययावत करण्याचा हा प्रकल्प राज्यातील जमीन व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुसंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होईल आणि जमीन संबंधित वाद कमी होतील.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
