आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत देशातील नागरिकांना एक डिजिटल हेल्थ कार्ड मिळेल त्यामध्ये नागरिकांची आरोग्याची माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाईल. आता देशात एक समग्र व सर्वसमावेशक आरोग्य मॉडेल वर काम सुरू आहे. या मॉडेलमध्ये आजारांपासून बचाव, सुलभ व माफक उपचार, प्रतिबंधक आरोग्यसेवा इत्यादींवर भर देण्यात येणार आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्रात बदल घडून वैद्यकीय शिक्षणातही सुधारणा होत आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज देशात वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत.