महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना २०२२ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बियाणे वितरण अनुदान 2022 योजनेसंबंधित या लेखात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते, पिके कोणती, पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेयचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा. कारण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी पेरणीसाठी औषध, बियाणे, खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वरती सुरू आहेत.

केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत समाविष्ट जिल्हे आणि पिके –

 • राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
 • राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
 • राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
 • राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
 • राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
mahadbt portal farmer schemes 2021

अ) बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
ब)ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
क) ऊस – (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
ड) कापूस – (अमरावती विभाग) – अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ.
(नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
इ) रागी – ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
(लातूर विभाग) – उस्मानाबाद,नांदेड, लातूर,परभणी,हिंगोली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?

 • जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस या अंतर्गत कोणत्याही घटकासाठी अर्ज करत असेल, तर वर दिलेले जिल्हे त्यासाठी अनिवार्य आहेत.
 • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
 • जर लाभार्थ्याला या पीक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात गळीत धान्य पीक असणे आवश्यक आहे आणि जर वृक्ष तेलबियापिक या मधून लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.

बियाणे वितरण अनुदान योजनेचा लाभ योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा?

बियाणं वितरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा. तो अर्ज कसा करावा याच्या सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

बियाणे वितरण अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

 • अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र
 • ७/१२ उतारा
 • ८-अ प्रमाणपत्र
 • पूर्वसंमती पत्र
 • हमीपत्र

अश्याच आणखी नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत चला,आणि आपल्या दुसऱ्या शेतकरी मित्राला लाभ घेता यावा यासाठी नक्कीच शेअर करायला विसरू नका

Leave a Comment

Your email address will not be published.