नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना २०२२ (Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2022) संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्य, पात्रता, लाभ, कागदपत्रे, अर्ज कुठे व कसा करायचा,अंतर जाति विवाह लाभ अर्ज फार्म PDF, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना २०२२ महाराष्ट्र –
महाराष्ट्र राज्यातील सामान्य प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जातीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्यास त्यांना आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील त्या जोडप्यांना मिळेल. ज्यांनी हिंदू विवाह कायदा, १९५५ किंवा विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत आपले विवाह नोंदणीकृत केले आहेत त्या जोडप्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना २०२१ अंतर्गत, लाभार्थी जोडप्यांना देण्यात येणारा निधी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे दिला जाईल. या रकमेच्या ५०% रक्कम केंद्र आणि ५०% रक्कम राज्य सरकार देईल. या योजनेअंतर्गत लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र २०२१ चे उद्दिष्ट काय?
राज्यात अस्पृश्यता निवारण करण्याचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबवली जाते. आंतरजातीय विवाह योजना २०२१ द्वारे जातीभेद कमी करून सर्व धर्मांमध्ये समानता आणणे.आपल्या देशात निरनिराळ्या जातीच्या लोक राहतात. जातीच्या बाबतीत लोकांमध्ये खूप भेदभाव सुरु आहेत.हा भेदभाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सदर योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार रु.५०,०००/- पर्यंत प्रोत्साहन रक्कम देईल. या महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना २०२१ द्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबत भेदभाव कमी करणे. ही योजना समाजातील आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणार नाही, तर पात्र आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक रक्कम दिली जाईल.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना २०२१ लाभ कोणते?
- या योजनेमध्ये लाभार्थ्याला राज्य सरकारकडून ५०,०००/- रुपये आणि डॉ.आंबेडकर फाउंडेशनद्वारे अडीच लाख रुपये मिळून एकूण ३ लाख रुपये दिले जातील.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.त्यामुळे लाभार्थीचे बँक खाते असावे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- या योजनेत लाभार्त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही रद्द करण्यात आली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोक आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेऊ शकतील.
समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र २०२१ साठी पात्रता काय आहे?
- आंतरजातीय विवाह योजना २०२१ लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
- विवाहित तरुणाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्ष्यापेक्षा कमी नसावे.
- विवाहित जोडप्यांपैकी कोणीही एकाने म्हणजेच मुलीने किंवा मुलाने अनुसूचित जाती किंवा जमातीचे असणे अनिवार्य आहे.
- ही रक्कम त्या तरुण मुलांना किंवा मुलीला दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जाती किंवा जमातीतील तरुणाशी किंवा तरुणीशी लग्न केले आहे.
- विवाहित जोडप्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन रक्कम मिळवण्यासाठी कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे.
- अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य प्रवर्गातील तरुण किंवा मुलीशी लग्न केले तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
नाबार्ड डेअरी लोन योजना मराठी। Online Apply। Loan Application Form 2021
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र २०२१ लाभार्थी कोण ?
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदुलिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर आतरंजातीय विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना २०२१ ची कागदपत्रे –
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकार फोटो
- कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट(विवाह नोंदणी दाखला)
- वर वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले
- दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे
- वधु वराचे एकत्रित फोटो.
- बँक खाते पासबुक
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र साठी अर्ज कसा व कुठे करावा?
आंतरजातीय विवाह योजना २०२१ चा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज सादर करावा.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना महाराष्ट्र २०२२ संपर्क कुठे करायचा?
आम्ही या योजनेसंबंधित सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी अद्याप तुम्हला आंतरजातीय विवाह योजनेच्या संबंधित काही शंका असतील, तर अधिक माहितीसाठी तुम्ही संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारी, बृहमुंबई, चेंबूर येथे किंवा समाज कल्याण महाराष्ट च्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क करू शकता.