नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्य, विस्तार, लाभ, फायदे, लाभ कसा मिवायचा, नोंदणी कुठे करायची, pmgky official website, लाभ मिळत नसल्यास काय करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात मिळणार आहेत. ही योजना प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे.या योजनेअंतर्गत गरीब लोकांना रेशन सबसिडी दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत ८० कोटी लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या व्यतिरिक्त २०४ लाख मेट्रिक टन किमतीचे खत केंद्र सरकार अंतर्गत गरीब लोकांना पुरवले जाते.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे उद्दिष्ट काय?
देशात बरेच लोक आर्थिकदृष्ट्या दुबळे आहेत. त्यांना दोन वेळेच्या जेवणासाठी रोज कठोर परिश्रम करून जीवन जगत आहेत. त्यामध्ये कोरोनाविषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात हातावरचे पोट असणाऱ्या गरीब लोकांचे दैनंदिन अर्थव्यवस्था डगमगली होती. ही समस्या पाहून पीएम रेशन सबसिडी योजना जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील लोक सबसिडीवर प्रतिमहा रेशन मिळू शकतात. या योजनेद्वारे देशातील गरीब जनता लॉकडाऊनच्या काळात चांगले आयुष्य जगू शकते.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना pmgky official website
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाचा विस्तार –
- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा चौथा टप्पा सरकारने सुरू केलेला आहे. त्याअंतर्गत दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना अतिरिक्त अन्नधान्य वाटप करण्याची घोषणा करण्यात येईल. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेली आहे. २३ जून २०१९ रोजी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता. ७ जून २०२१ रोजी पंतप्रधानांनी घोषणा केली होती की, ही योजना दिवाळीपर्यंत वाढवली जाईल.
- पहिली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कोरोना संसर्गामुळे दोन महिन्यांसाठी सुरू करण्यात आली होती. ज्यासाठी २६,६०२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना चा संपूर्ण खर्च केंद्र सरकार अंतर्गत होतो. या योजनेअंतर्गत जून महिन्यात ६ कोटी ५८ लाख आणि जुलै महिन्यात ५ कोटी ६० लाख रुपयांचा लाभ शिधापत्रिकाधारकांना देण्यात आलेला आहे.
- गहू आणि तांदळाचे वाटप अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत केले जाते. प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन, ही योजना विस्तारली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत अन्न मिळेल. गेल्यावर्षी देखील या योजनेद्वारे ८० कोटी लाभार्थ्यांना ८ महिन्यांसाठी ५ किलो अन्नधान्य देण्यात आले होते.
Recent Updates PMGKY प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना –
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना द्वारे सर्व लाभार्थ्यांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे. या योजनेच्या कक्षेत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. सरकारने या योजनेची व्याप्ती दिवाळीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, ही माहिती श्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भाषणात दिलेली आहे. ज्या अंतर्गत नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळणार आहे.
रेशन सबसिडीचा लाभ कुठून मिळवायचा?
- सर्व शिधापत्रिकाधारकांना ५ किलो धान्य पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत मिळणार आहे. यासाठी सरकारकडून २६,००० कोटी रुपये खर्च केले जातील.
- हे धान्य रेशन कार्ड मध्ये नोंदणीकृत असलेल्या नावांना दिले जाईल. हे धान्य दर महिन्याला मिळणार.
- हे इतर रेशन धान्यापेक्षा वेगळे असेल, याचा अर्थ असा की तुम्हाला एक महिन्यात रेशन कार्ड वर ५ किलो अन्नधान्य मिळाले, तर आत्ता तुम्हाला १० किलो अन्नधान्य दिले जाईल. तुम्ही हे धान्य त्याच रेशन दुकानदाराकडून घेऊ शकता, जिथून तुम्ही प्रत्येक महिन्याला रेशन घेत आहात.
PM अंत्योदय अन्न योजना PDF 2024: लाभ, उद्देश्य, दस्तावेज़, आवेदन पूरी जानकारी
PMGKY अंतर्गत वाटप किती धान्य वाटप केले जाते?
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत नोव्हेंबर पर्यंत देशातील सर्व रेशन कार्ड धारक कुटुंबांना प्रति व्यक्ती ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ केंद्र सरकारकडून मोफत देण्यात येईल.या योजनेअंतर्गत जुलै महिन्यात लाभार्थ्यांना ३५.८४ लाख टन धान्य देण्यात आले आहे. त्याचा लाभ देशातील एकूण ७१.६८ कोटी लाभार्थ्यांनी घेतला आहे.
पीएम गरीब कल्याण योजना चे फायदे कोणते?
या योजनेअंतर्गत रेशन दुकानांमध्ये तीन महिन्यांसाठी गहू २/- रुपये किलो दराने आणि तांदूळ ३/- रुपये किलो दराने दिला जाईल. देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना सरकारकडून तीन महिन्यासाठी ७ किलो वजनाचे धान्य दिले जाईल. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ५.२९ कोटी लोकांना २.५६५ मेट्रिक टन धान्य रेशन स्वरूपात देण्यात आलेले आहे.
PMGKY Online Apply 2024
देशातील गरीब लोकांना ज्यांना सरकारकडून या योजनेअंतर्गत सबसिडीवर रेशन मिळवायचे आहे, त्यांना कोणतीही नोंदणी प्रक्रिया नाही. तर देशातील इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत २/- रुपये प्रति किलो दराने गहू आणि ३/- रुपये प्रति किलो दराने तांदूळ मिळवायचा आहे. ते रेशन दुकानात जाऊन त्यांच्या रेशन कार्ड द्वारे मिळू शकतात.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत नसल्यास काय करावे?
देशात अनेक संस्था आहेत, ज्यांनी या योजनेसाठी घोषणापत्र भरले नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईसीआर सादर करणे आवश्यक आहे. अशा अनेक संस्था आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत ईसीआर सादर केलेला नाही. अशा संस्थांना गरीब कल्याण योजना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ज्या संस्थांनी अद्याप ईसीआर दाखल केलेला नाही. त्यांनी लवकरात लवकर ईसीआर दाखल करून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र व्हावे.
ज्या सदस्यांनी गरीब कल्याण योजनाच्या अंमलबजावणीपूर्वी ईसीआर भरलेले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. असे अनेक सदस्य आहेत ज्यांनी आधार केवायसी अपडेट केलेली नाही, अशा सदस्यांशी संपर्क साधून त्यांचे आधार अपडेट करण्यासाठी विभागाकडून माहिती दिली जात आहे. त्यामुळे त्या सर्व सदस्यांचे केवायसी अपडेट उपलब्ध नसल्यामुळे या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यामुळे आधार केवायसी अपडेट करून घ्यावे आणि या योजनेच्या लाभास पात्र व्हावे.
- Yamuna Authority Plots: YEIDA Plot Scheme 2024 निवेश का सही समय? ये बातें आपको पता होनी चाहिए
- कृषी उन्नत्ती योजना GR
- YEIDA Plot Scheme 2024 Online Apply: Extended Dates, PDF, आवेदन कैसे करें और जानें सारी जानकारी
- तुमच्या मोबाईलमधून करा तुमचे मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार लिंक
- दूध उत्पादक शेतकरी GR 2024 | Dudh Utpadak Shetkari Subsidy Scheme GR