यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना 2022 महाराष्ट्र समाज कल्याण योजना

नमस्कार मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या मागासवर्गीय आणि अपंग घरकुल योजना संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राज्यात ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. या योजनेचा लाभ मुख्यतः भटक्या विमुक्त जाती जमातीच्या कुटुंबांना देण्यात येतो. या लेखात आपण काय आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, योजनेचे उद्दिष्ट्य, लाभ, अटी, पात्रता, GR, अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

 समाज कल्याण मागासवर्गीय आणि अपंग घरकुल योजना महाराष्ट्

बऱ्याचदा भटक्या आणि विमुक्त जमातीचे लोक लाभास पात्र असूनही,अश्या योजनांपासून वंचित राहतात. आणि अश्या योजनांसाठी मंजूर निधी अखर्चित राहतो. त्यामुळे अश्या जमातीच्या लोकांना या योजनेसंबंधित माहिती मिळावी आणि ते अश्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हेच आमचे उद्दिष्ट्य असते. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त पात्र लोकांपर्यंत पोहचावा हेच ध्येय बाळगून आम्ही काम करतो.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना उद्दिष्ट्य कोणते?

 • राज्यामध्ये भटक्या जमातीचे राहणीमान उंचावणे
 • भटक्या जमातीचा विकास करणे.
 • भटक्या जमाती जीवनात स्थिरता प्राप्त करणे.
 • भटक्या जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे.
 • त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे.
maharashtra samaj kalyan vibhag official portal

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनेचे लाभार्थी कोण?

 • गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक
 • विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक

यशवंतराव अपंग घरकुल योजनाच्या अटी कोणत्या?

 • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावी.
 • अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचे घर नसावे.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • अर्जदार कच्च्या घरात झोपड्यांमध्ये राहणारा असावा.
 • लाभार्थी कुटुंबाने या आधी कोणत्याही राज्यातील कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • या योजनेचा लाभ पात्र कुटुंबात एकाच व्यक्तिला मिळेल.
 • लाभार्थी कुटुंब भूमिहीन असावे.
 • लाभार्थी सहा महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
 • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही फक्त ग्रामीण भागासाठी लागू आहे.
 • १० पात्र लाभार्थी कुटुंबासाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास लाभ देण्यात येईल.
 • २० कुटुंबासाठी १ हेक्टर जमीन उपलब्ध नसल्यास सदर अटी शिथिल करण्याचे अधिकार तालुका स्तरावरील समितीस आहेत.
 • वैयक्तिक लाभ घ्यायचा असेल, तर रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ मिळेल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना योजना अंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल?

 • गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे लोक
 • अपंग
 • महिला
 • पूरग्रस्त क्षेत्र
 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
 • विधवा
 • परितक्ता यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना लाभाचे स्वरूप काय आहे?

 • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबास प्रत्येकी ५ गुंठे जमीन देऊन त्यांना २६९ चौरस फूट चे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
 • भूखंड कोणालाही हस्तांतरीत करता येणार नाही किंवा विकता येत नाही किंवा भाडेतत्वावर देता येणार नाही.
 • प्रति वर्षी ३४ जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावे निवडून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
 • झोपडीत राहणारे दारिद्र रेषेखालील कुटुंब ज्यांच्या घरात कमावणारा व्यक्ती नाही अशा विधवा अपंग, महिला आणि पूरग्रस्त कुटुंबे यांना या योजनेअंतर्गत प्राधान्याने निवड करून लाभ देण्यात येतो.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना अंमलबजावणी प्रक्रिया –

 • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करण्यात येते करण्यात येते.
 • ही समिती तालुका स्तरावर निर्माण केली जाते.
 • त्याद्वारे शासकीय जमिनीची निवड करण्यात येते.
 • जर शासकीय जमीन उपलब्ध नसेल, तर खाजगी जमीन खरेदी केली जाते.
 • त्यानंतर लाभार्थ्यांची निवड केली जाते.
 • लेआऊट तयार करून घर बांधून दिले जाते.
 • तसेच पायाभूत सुविधा म्हणजेच रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा सेप्टिक टँक, गटार, इत्यादी सेवा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
 • या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांद्वारे स्वयंरोजगाराच्या संध्या देखील उपलब्ध करून दिल्या जातात

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना अर्ज कुठे करावा?

या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या अर्जदारांनी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी. आवश्यक कागदपत्रांची आणि या योजने संबंधित अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाजकल्याण कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावेत.

Leave a Comment

Your email address will not be published.