८८ कोटी ४४ लाख निधी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना मंजुरी शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ८ मार्च २०२१ रोजीचा शासन निर्णय माहिती पाहणार आहोत. हि योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकाराव लागत. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात . जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. त्यामुळे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता , महाराष्ट्र सरकारने हि योजना २००५-०६ सुरु केली तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते ते बदलून ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली.

 

८ मार्च २०२१ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हि विमा कंपनीला विमा हप्त्याचे प्रदान केल्यापासून १२ महिन्यांच्या कालावधीसाठी चालू ठेवण्याच्या निर्णयाला शासनाने मान्यता दिली आहे. सदर योजना २०२१-२२ मध्ये राबवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सदर योजना संपूर्ण राज्यात दि युनिव्हर्सल सोम्पो जेनेरळ इन्शुरन्स कंपनी ली. या विमा कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष रु. २९.०७ इतक्या विमा हप्ता दराने ( विना ब्राकरेज ) आणि ऑक्सालिअम ब्रोकींग प्रा. ली. या विमा सल्लागार कंपनीमार्फत नागपूर, ठाणे, नाशिक व अमरावती या महसूल विभागासाठी ०.०६५% तर औरंगाबाद व पुणे या महसूल विभागासाठी ०.०७० % इतका विमा ब्राकरेज दराने राबवण्यास शासनाने ८ मार्च २०२१ च्या शासन निर्णयात मंजुरी दिली आहे.

चालू वर्ष २०२१-२२ मध्ये विमा हप्ता रकमेचे विमा कंपनीला प्रदान झाल्यापासून १२ महिन्याच्या कालावधीकरिता राज्यातील सर्व खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील विहितधारक म्हणून नोंद नसलेला एक सदस्य यांना विविध अपघातांपासून संरक्षण देण्यासाठी विमा कंपनी सल्लागार कंपनीला आणि विमा कंपनीला विमा ब्राकरेज आणि विमा हप्ता रक्कम तसेच कृषी कार्यालयीन खर्चासाठी मंजूर रक्कम खालील तक्त्यात दर्शवलेली आहे.

gopinath munde shetkari apghat vima

वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे १२ महिने कालावधीसाठी विमा ब्राकरेज रक्कम, विमा हप्ता आणि कृषी आयुक्त कार्यालयीन खर्च असा एकूण रु. ८८ कोटी ४४ लाख ४ हजार सहाशे ६२/- एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदर शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खालील GR पहा बटनावर क्लिक करा.

1 thought on “८८ कोटी ४४ लाख निधी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना मंजुरी शासन निर्णय”

  1. 27/1/21chy g r nusar gopinath munde setkari apghat vimyasathi 2 compnyana Kam file hote 8/12/19te7/12/20 ass kalavadhi hota pan 8/12/20 te 6/4/21darmya ZaleLya clieam banat Kay nirnay ghetla

    Reply

Leave a Comment

Translate »